< मत्तय 22 >

1 येशू त्यांच्याशी पुन्हा एकदा दाखल्यांनी बोलला, त्यास उत्तर देऊन म्हणाला,
And Jesus answered and spake again in parables unto them, saying,
2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
The kingdom of heaven is likened unto a certain king, who made a marriage feast for his son,
3 त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
and sent forth his servants to call them that were bidden to the marriage feast: and they would not come.
4 नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले, राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या.
Again he sent forth other servants, saying, Tell them that are bidden, Behold, I have made ready my dinner; my oxen and my fatlings are killed, and all things are ready: come to the marriage feast.
5 चाकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी चाकरांकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.
But they made light of it, and went their ways, one to his own farm, another to his merchandise;
6 काहीनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले.
and the rest laid hold on his servants, and treated them shamefully, and killed them.
7 राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठवले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
But the king was wroth; and he sent his armies, and destroyed those murderers, and burned their city.
8 मग राजा त्याच्या चाकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलावले होते ते लायक नव्हते,
Then saith he to his servants, The wedding is ready, but they that were bidden were not worthy.
9 म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.
Go ye therefore unto the partings of the highways, and as many as ye shall find, bid to the marriage feast.
10 १० मग ते चाकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्याठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे चाकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांस जमा केले आणि लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरून गेला.
And those servants went out into the highways, and gathered together all as many as they found, both bad and good: and the wedding was filled with guests.
11 ११ मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला.
But when the king came in to behold the guests, he saw there a man who had not on a wedding-garment:
12 १२ राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना.
and he saith unto him, Friend, how camest thou in hither not having a wedding-garment? And he was speechless.
13 १३ तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल.
Then the king said to the servants, Bind him hand and foot, and cast him out into the outer darkness; there shall be the weeping and the gnashing of teeth.
14 १४ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.”
For many are called, but few chosen.
15 १५ मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
Then went the Pharisees, and took counsel how they might ensnare him in [his] talk.
16 १६ परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही.
And they send to him their disciples, with the Herodians, saying, Teacher, we know that thou art true, and teachest the way of God in truth, and carest not for any one: for thou regardest not the person of men.
17 १७ म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
Tell us therefore, What thinkest thou? Is it lawful to give tribute unto Cæsar, or not?
18 १८ येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात?
But Jesus perceived their wickedness, and said, Why make ye trial of me, ye hypocrites?
19 १९ कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले.
Show me the tribute money. And they brought unto him a denarius.
20 २० तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?”
And he saith unto them, Whose is this image and superscription?
21 २१ त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.”
They say unto him, Cæsar’s. Then saith he unto them, Render therefore unto Cæsar the things that are Cæsar’s; and unto God the things that are God’s.
22 २२ येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
And when they heard it, they marvelled, and left him, and went away.
23 २३ पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले,
On that day there came to him Sadducees, they that say that there is no resurrection: and they asked him,
24 २४ ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल.
saying, Teacher, Moses said, If a man die, having no children, his brother shall marry his wife, and raise up seed unto his brother.
25 २५ आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.
Now there were with us seven brethren: and the first married and deceased, and having no seed left his wife unto his brother;
26 २६ असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले.
in like manner the second also, and the third, unto the seventh.
27 २७ शेवटी ती स्त्री मरण पावली.
And after them all, the woman died.
28 २८ आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.”
In the resurrection therefore whose wife shall she be of the seven? for they all had her.
29 २९ येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही.
But Jesus answered and said unto them, Ye do err, not knowing the scriptures, nor the power of God.
30 ३० तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
For in the resurrection they neither marry, nor are given in marriage, but are as angels in heaven.
31 ३१ तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?
But as touching the resurrection of the dead, have ye not read that which was spoken unto you by God, saying,
32 ३२ ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”
I am the God of Abraham, and the God of Isaac, and the God of Jacob? God is not [the God] of the dead, but of the living.
33 ३३ जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.
And when the multitudes heard it, they were astonished at his teaching.
34 ३४ येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.
But the Pharisees, when they heard that he had put the Sadducees to silence, gathered themselves together.
35 ३५ एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.
And one of them, a lawyer, asked him a question, trying him:
36 ३६ त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
Teacher, which is the great commandment in the law?
37 ३७ येशूने उत्तर दिले, “‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’
And he said unto him, Thou shalt love the Lord thy God with all thy heart, and with all thy soul, and with all thy mind.
38 ३८ ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.
This is the great and first commandment.
39 ३९ हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’
And a second like [unto it] is this, Thou shalt love thy neighbor as thyself.
40 ४० सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
On these two commandments the whole law hangeth, and the prophets.
41 ४१ म्हणून परूशी एकत्र जमले असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.
Now while the Pharisees were gathered together, Jesus asked them a question,
42 ४२ येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
saying, What think ye of the Christ? whose son is he? They say unto him, [The son] of David.
43 ४३ त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो,
He saith unto them, How then doth David in the Spirit call him Lord, saying,
44 ४४ ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.”
The Lord said unto my Lord, Sit thou on my right hand, Till I put thine enemies underneath thy feet?
45 ४५ आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?
If David then calleth him Lord, how is he his son?
46 ४६ तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
And no one was able to answer him a word, neither durst any man from that day forth ask him any more questions.

< मत्तय 22 >