< मत्तय 14 >

1 त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली.
U to vrijeme doðe glas do Iroda èetverovlasnika o Isusu;
2 तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.”
I reèe slugama svojijem: to je Jovan krstitelj; on ustade iz mrtvijeh, i zato èini èudesa.
3 हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.
Jer Irod uhvati Jovana, sveza ga i baci u tamnicu Irodijade radi žene Filipa brata svojega.
4 कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.”
Jer mu govoraše Jovan: ne možeš ti nje imati.
5 हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
I šæaše da ga ubije, ali se poboja naroda; jer ga držahu za proroka.
6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.
A kad bijaše dan roðenja Irodova, igra kæi Irodijadina pred njima i ugodi Irodu.
7 त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.
Zato i s kletvom obreèe joj dati šta god zaište.
8 तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.”
A ona nauèena od matere svoje: daj mi, reèe, ovdje na krugu glavu Jovana krstitelja.
9 हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली.
I zabrinu se car; ali kletve radi i onijeh koji se gošæahu s njim, zapovjedi joj dati.
10 १० आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले.
I posla te posjekoše Jovana u tamnici.
11 ११ मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.
I donesoše glavu njegovu na krugu, i dadoše djevojci, i odnese je materi svojoj.
12 १२ मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
I došavši uèenici njegovi, uzeše tijelo njegovo i ukopaše ga; i doðoše Isusu te javiše.
13 १३ मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले.
I èuvši Isus, otide odande u laði u pusto mjesto nasamo. A kad to èuše ljudi, idoše za njim pješice iz gradova.
14 १४ मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
I izišavši Isus vidje mnogi narod, i sažali mu se za njih, i iscijeli bolesnike njihove.
15 १५ मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
A pred veèe pristupiše k njemu uèenici njegovi govoreæi: ovdje je pusto mjesto, a dockan je veæ; otpusti narod neka ide u sela da kupi sebi hrane.
16 १६ परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.”
A Isus reèe im: ne treba da idu; podajte im vi neka jedu.
17 १७ ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
A oni rekoše mu: nemamo ovdje do samo pet hljebova i dvije ribe.
18 १८ तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.”
A on reèe: donesite mi ih ovamo.
19 १९ मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
I zapovjedi narodu da posjedaju po travi; pa uze onijeh pet hljebova i dvije ribe, i pogledavši na nebo blagoslovi, i prelomivši dade uèenicima svojijem, a uèenici narodu.
20 २० ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या.
I jedoše svi, i nasitiše se, i nakupiše komada što preteèe dvanaest kotarica punijeh.
21 २१ जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.
A onijeh što su jeli bješe ljudi oko pet hiljada, osim žena i djece.
22 २२ मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले.
I odmah natjera Isus uèenike svoje da uðu u laðu i naprijed da idu na onu stranu dok on otpusti narod.
23 २३ लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
I otpustivši narod pope se na goru sam da se moli Bogu. I uveèe bijaše ondje sam.
24 २४ पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते.
A laða bješe nasred mora u nevolji od valova, jer bijaše protivan vjetar.
25 २५ तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता.
A u èetvrtu stražu noæi otide k njima Isus iduæi po moru.
26 २६ शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले
I vidjevši ga uèenici po moru gdje ide, poplašiše se govoreæi: to je utvara; i od straha povikaše.
27 २७ पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
A Isus odmah reèe im govoreæi: ne bojte se; ja sam, ne plašite se.
28 २८ पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा.
A Petar odgovarajuæi reèe: Gospode! ako si ti, reci mi da doðem k tebi po vodi.
29 २९ येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
A on reèe: hodi. I izišavši iz laðe Petar iðaše po vodi da doðe k Isusu.
30 ३० पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.”
No videæi vjetar veliki uplaši se, i poèevši se topiti, povika govoreæi: Gospode, pomagaj!
31 ३१ आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
I odmah Isus pruživši ruku uhvati Petra, i reèe mu: malovjerni! zašto se posumnja?
32 ३२ मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला.
I kad uðoše u laðu, presta vjetar.
33 ३३ तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
A koji bijahu u laði pristupiše i pokloniše mu se govoreæi: vaistinu ti si sin Božij.
34 ३४ नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले.
I prešavši doðoše u zemlju Genisaretsku.
35 ३५ तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले.
I poznavši ga ljudi iz onoga mjesta, poslaše po svoj onoj okolini, i donesoše k njemu sve bolesnike.
36 ३६ आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
I moljahu ga da se samo dotaknu skuta od njegove haljine; i koji se dotakoše ozdraviše.

< मत्तय 14 >