< मार्क 7 >

1 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले.
AND there gathered to him Pharishee and Sophree, who had come from Urishlem;
2 आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले.
and they saw some of his disciples eating bread with their hands not washed; and they complained.
3 कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.
For all the Jihudoyee and Pharishee, unless they carefully wash their hands, do not eat, because they hold the tradition of the elders;
4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात.
and (coming) from the market, unless they lave, they eat not. And many other of those (things) there are which they have received to observe, (as) the baptisms of cups, and of measures, and of brasen utensils, and of beds.
5 मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
And the Sophree and Pharishee questioned him, Why do not your disciples walk according to the tradition of the elders; but, while their hands are not washed, eat bread?
6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
But he said to them, Well prophesied concerning you Eshaia the prophet, you hypocrites; as it is written, This people with their lips honour me, but their heart is very far from me.
7 ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’
But in vain do they reverence me while they teach the teachings of the commandments of men.
8 तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.”
For you have abandoned the commandment of God and hold the tradition of men, as the baptisms of cups and measures, and many things like these.
9 आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे.
He said to them (moreover), You decently suppress the commandment of God, that you may establish your tradition.
10 १० मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’
For Musha hath said, Honour thy father and thy mother; and whosoever curseth father and mother, the death he shall die.
11 ११ परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’
But you say, If a man shall say to his father, or to his mother, My oblation, (be that) whatever from me thou mayest profit;
12 १२ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.
and you permit him not to do any thing for his father and his mother.
13 १३ अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”
But you reject the word of Aloha for the sake of the tradition which you have delivered: and many similar (observances) to these you practise.
14 १४ तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
And Jeshu called the whole multitude, and said to them, Hear me, all of you, and understand:
15 १५ बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
It is not that which is without the man, and which entereth into him, that can defile him: but that which proceedeth from him, that defileth a man.
16 १६
He who hath ears to hear, let him hear.
17 १७ लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्यास या दाखल्याविषयी विचारले,
But when Jeshu had gone into the house (apart) from the multitude, his disciples asked him concerning that parable.
18 १८ तो त्यांना म्हणाला, “तुम्हास देखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का?
He said to them, How dull are even you! Know you not, that nothing from without that entereth a man can defile him,
19 १९ कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते.” असे सांगून सर्वप्रकारचे अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
because it entereth not into his heart, but into his belly, and is cast out in the purgation which all food purgeth?
20 २० आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते.
But that which proceedeth from a man, that polluteth a man.
21 २१ कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून,
For from within, from the heart of the sons of men, go forth evil thoughts, adultery, fornication, robbery, murder,
22 २२ व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,
rapacity, malice, fraud, obscenity, an evil eye, blasphemy, vain-glory, folly;
23 २३ या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात.”
all these evils come from within, and they defile a man.
24 २४ येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते.
FROM thence Jeshu arose and went to the confine of Tsur and of Tsaidon, and entered into a certain house: and he was unwilling that any man should know of him, but he could not conceal.
25 २५ पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
For immediately heard a certain woman concerning him, whose daughter had an unclean spirit; and she came, (and) fell before his feet.
26 २६ ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
But that woman was a Gentile of Phuniki of Suria, and she prayed of him to cast out the demon from her daughter.
27 २७ तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.”
But Jeshu said to her, Let the children first be filled; for it is not well to take the bread of the children and cast it to the dogs.
28 २८ परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
But she answering said to him, Yes, my Lord, yet the dogs also from beneath the table eat the crumbs of the children.
29 २९ तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
Jeshu saith to her, Go; on account of that word, the demon hath gone forth from thy daughter.
30 ३० मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
And she went to her house, and found her daughter lying on the couch, and the demon had gone out from her.
31 ३१ येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला.
Jeshu again departed from the confine of Tsur and of Tsaidon, and came to the sea of Galila, on the confine of the Ten Cities;
32 ३२ तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली.
and they brought to him a blind man, a stammerer, and besought him to lay upon him the hand.
33 ३३ येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला.
And he took him aside from the crowd by himself, and put his fingers in his ears, and spat, and touched his tongue.
34 ३४ त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे, “मोकळा हो.”
And he looked up to heaven, and sighed, and said to him, Be opened:
35 ३५ आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले.
and in that hour his ears were opened, and the bond of his tongue was loosed, and he spake plainly.
36 ३६ तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले.
And he charged them that to no man they should tell this. But so much as he charged them, they the more proclaimed it;
37 ३७ ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
and they were exceedingly astonished, and said, He doeth every thing well; the deaf he maketh to hear, and them who spoke not, to speak.

< मार्क 7 >