< लूक 9 >

1 मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला,
耶稣召齐十二门徒,赋予他们力量和权力,去制伏一切妖魔,医治各样的疾病。
2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.
然后派遣他们去宣讲上帝之国和医治病人。
3 तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका.
他对他们说:“你们路上什么都不用带,手杖、袋子、食物、银钱或是衣服都不需要。
4 आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा.
无论走进谁家,就住下,直到需要离开为止。
5 जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”
如果那家人不接待你,在离开那座城的时候,就把脚上的灰尘跺下,以此警示他们。”
6 तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले.
于是门徒们就出发走遍各乡,传讲福音,到处医治病人。
7 घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते;
君王希律听到这一切,感到非常困惑,因为有人说:“约翰起死复生了。”
8 आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.”
又有人说:“以利亚显现了。”还有人说:“古时的一位先知复活了。”
9 तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता.
希律说:“毫无疑问我已经将约翰斩头,但他又是谁,我怎么会听到关于他的这些事呢?”于是他就设法要见耶稣。
10 १० मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला.
门徒们回来后把所做之事报告耶稣,于是他带着他们离开,去一个叫做伯赛大城的地方。
11 ११ परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.
民众知道后也跟了去。他接待他们,向他们讲述上帝之国,医好需要救治之人。
12 १२ दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.”
天色将晚,十二门徒来到他跟前,说:“你让众人散了吧,让他们到附近的村庄和农场去,找地方住,找东西吃,因为这里是一片荒野。”
13 १३ पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.”
但耶稣说:“你们可以给他们吃的东西!”他们说:“我们只有五个饼和两条鱼,除非你想让我们去为所有人买食物。”
14 १४ कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,”
这里大概有五千名男人。他对门徒说:“让他们分组坐下,每组大概五十人。”
15 १५ मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले.
门徒就照他的话叫众人坐下。
16 १६ त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.
耶稣拿起这五个饼和两条鱼,望着天,为食物祝福。然后掰开饼,持续不断地递给门徒,与众人分享。
17 १७ तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.
所有人都吃饱了,把剩下的食物收拾起来,装满了十二个篮子。
18 १८ आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?”
还有一次耶稣独自祈祷的时候,只有门徒和他在一起。他问他们:“所有这些民众是怎么看我的?”
19 १९ मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.”
他们回答:“有人说是你是施洗的约翰,有人说你是以利亚,还有人说你是古时的一位先知复活。”
20 २० त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.”
他又问他们:“你们怎么看我?” 彼得回答:“你是上帝的基督。”
21 २१ पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
耶稣严厉地嘱咐他们,不要把这事告诉其他人。
22 २२ आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.”
他说:“人子必须遭受许多苦难,被长老、祭司长和宗教老师拒绝,然后被杀害,但会在第三日复活。”
23 २३ आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे.
耶稣又对众人说:“如果有人愿意跟从我,就必须舍弃自己,天天背着自己的十字架跟从于我。
24 २४ कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
如果你想拯救自己的生命,就必会丢掉生命。但如果你为我牺牲生命,必拯救生命。
25 २५ कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल?
即使赢得全世界,但你最终却迷失或毁灭,又有什么好处呢?
26 २६ जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
如果你因为我和我所授之道而感到耻辱,当人子带着荣耀以及天父和天使的荣耀降临时,也必把你视为耻辱。
27 २७ आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
告诉你们真相,这里的人群中,有人在死亡之前就能看到上帝之国。”
28 २८ आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.
在他说出这番话约八天后,耶稣带着彼得、约翰和雅各上山去祷告。
29 २९ तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले.
在祷告的过程中,他的面貌忽然改变,衣服散发着洁白的光芒。
30 ३० आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते,
摩西和以利亚显现在荣光之中,开始与耶稣交流,
31 ३१ ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते.
谈论他去世的事,这也是他在耶路撒冷需要完成的事情。
32 ३२ तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले.
彼得和同伴都在打盹。醒过来之后,就看见他的荣光,也认出了与耶稣站在一起的那两个人。
33 ३३ मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते.
那二人正要离开他的时候,彼得对耶稣说:“主啊,能来到这里太好了!我们可以搭三个庇护所,一个为你,一个为摩西,一个为以利亚。”但他其实并不知道自己在说什么。
34 ३४ तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.
就在他说话的时候,有一片云笼罩在他们上方,这让门徒们很害怕。
35 ३५ आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.”
云里飘出来一个声音,说:“这是我的天选之子,你们要听从他!”
36 ३६ ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
声音消失后,众人只看到耶稣自己。关于这一刻所见之事,门徒们没有说出去,没有告诉任何人。
37 ३७ आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला.
他们下山后的第二天,有一大群人等在那里迎接耶稣。
38 ३८ तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.
人群中有一个人喊着:“老师,求你看看我儿子吧,他是我的独子。
39 ३९ आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.
一个恶灵附上了他的身体,他会忽然喊叫,身体抽搐,口吐白沫。恶灵会折磨糟践他,不肯放过他。
40 ४० आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.
我求过你的门徒把他赶出去,他们却办不到。”
41 ४१ तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”
耶稣说:“唉!这没有信仰的腐朽世界啊!我还要和你们在一起多久,忍受你们到几时?把你儿子带到这里来吧!”
42 ४२ मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.
那孩子走过来的时候,恶鬼把他摔倒,让他不停抽搐。耶稣斥责那恶灵,然后把孩子医好,交给他父亲。
43 ४३ मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
众人都惊奇上帝的力量。就在大家还在惊讶耶稣所做的一切时,耶稣对门徒说:
44 ४४ “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.”
“仔细听好我将要说的话:人子将遭受人的背叛。”
45 ४५ परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.
门徒不明白,因为这话的真实意思被隐藏起来了,他们无法理解其隐喻之意,也不敢多问。
46 ४६ त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.
后来,门徒之间开始争论谁最伟大。
47 ४७ तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले,
耶稣知道他们在争论什么,就找了一个小孩子过来,叫他站在自己旁边,
48 ४८ आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.”
他对门徒们说:“凡以我之名接待这孩子,就是接待我,凡接待我者,就是接待派我来到这里的上帝。你们中间谁的年龄最小,谁就最伟大。”
49 ४९ तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.”
约翰说:“主啊,我们看见有一个人以你的名驱鬼,我们就制止他,因为他不是我们中的一员。”
50 ५० तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”
耶稣说:“不要制止他,因为没有人能以我之名行神迹,同时又诅咒我。”
51 ५१ आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले.
耶稣升入天堂的日子即将来临,他决意去耶路撒冷。
52 ५२ मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,
他派信使先走一步,造访撒玛利亚的一个村庄,为他做准备。
53 ५३ पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता.
但那里的人不欢迎他,因为他决定去耶路撒冷。
54 ५४ तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?”
他的门徒雅各和约翰看见了,就说:“主啊,你要我们呼唤从天而降的火烧死他们吗?”
55 ५५ परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही;
但耶稣转过身斥责他们。
56 ५६ कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले.
然后一行人就开始去其他的村庄。
57 ५७ आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
在路上,有一个人对耶稣说:“你无论去哪里,我都要跟随你!”
58 ५८ तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.”
耶稣对那人说:“狐狸有洞,飞鸟有窝,人子却没有栖身之地。”
59 ५९ मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,”
他对另一个人说:“跟随我吧!”那人说:“主啊,先让我先回去安葬我的父亲吧。”
60 ६० तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
耶稣说:“让死人去埋葬他们的死人吧,你应该去传扬上帝之国。”
61 ६१ तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे.
又有一个人说:“主啊,我要跟随你,但容我先回去与家人道别。”
62 ६२ पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”
耶稣说:“如果你已经开始耕犁,就不要向后看,否则就不适合进入上帝之国。”

< लूक 9 >