< लूक 14 >

1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.
अनन्तरं विश्रामवारे यीशौ प्रधानस्य फिरूशिनो गृहे भोक्तुं गतवति ते तं वीक्षितुम् आरेभिरे।
2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.
तदा जलोदरी तस्य सम्मुखे स्थितः।
3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”
ततः स व्यवस्थापकान् फिरूशिनश्च पप्रच्छ, विश्रामवारे स्वास्थ्यं कर्त्तव्यं न वा? ततस्ते किमपि न प्रत्यूचुः।
4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.
तदा स तं रोगिणं स्वस्थं कृत्वा विससर्ज;
5 मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
तानुवाच च युष्माकं कस्यचिद् गर्द्दभो वृषभो वा चेद् गर्त्ते पतति तर्हि विश्रामवारे तत्क्षणं स किं तं नोत्थापयिष्यति?
6 आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
ततस्ते कथाया एतस्याः किमपि प्रतिवक्तुं न शेकुः।
7 नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला,
अपरञ्च प्रधानस्थानमनोनीतत्वकरणं विलोक्य स निमन्त्रितान् एतदुपदेशकथां जगाद,
8 “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
त्वं विवाहादिभोज्येषु निमन्त्रितः सन् प्रधानस्थाने मोपावेक्षीः। त्वत्तो गौरवान्वितनिमन्त्रितजन आयाते
9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल.
निमन्त्रयितागत्य मनुष्यायैतस्मै स्थानं देहीति वाक्यं चेद् वक्ष्यति तर्हि त्वं सङ्कुचितो भूत्वा स्थान इतरस्मिन् उपवेष्टुम् उद्यंस्यसि।
10 १० पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल.
अस्मात् कारणादेव त्वं निमन्त्रितो गत्वाऽप्रधानस्थान उपविश, ततो निमन्त्रयितागत्य वदिष्यति, हे बन्धो प्रोच्चस्थानं गत्वोपविश, तथा सति भोजनोपविष्टानां सकलानां साक्षात् त्वं मान्यो भविष्यसि।
11 ११ कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
यः कश्चित् स्वमुन्नमयति स नमयिष्यते, किन्तु यः कश्चित् स्वं नमयति स उन्नमयिष्यते।
12 १२ मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.
तदा स निमन्त्रयितारं जनमपि जगाद, मध्याह्ने रात्रौ वा भोज्ये कृते निजबन्धुगणो वा भ्रातृृगणो वा ज्ञातिगणो वा धनिगणो वा समीपवासिगणो वा एतान् न निमन्त्रय, तथा कृते चेत् ते त्वां निमन्त्रयिष्यन्ति, तर्हि परिशोधो भविष्यति।
13 १३ पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
किन्तु यदा भेज्यं करोषि तदा दरिद्रशुष्ककरखञ्जान्धान् निमन्त्रय,
14 १४ म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
तत आशिषं लप्स्यसे, तेषु परिशोधं कर्त्तुमशक्नुवत्सु श्मशानाद्धार्म्मिकानामुत्थानकाले त्वं फलां लप्स्यसे।
15 १५ मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.”
अनन्तरं तां कथां निशम्य भोजनोपविष्टः कश्चित् कथयामास, यो जन ईश्वरस्य राज्ये भोक्तुं लप्स्यते सएव धन्यः।
16 १६ मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले.
ततः स उवाच, कश्चित् जनो रात्रौ भेाज्यं कृत्वा बहून् निमन्त्रयामास।
17 १७ भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले.
ततो भोजनसमये निमन्त्रितलोकान् आह्वातुं दासद्वारा कथयामास, खद्यद्रव्याणि सर्व्वाणि समासादितानि सन्ति, यूयमागच्छत।
18 १८ ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’
किन्तु ते सर्व्व एकैकं छलं कृत्वा क्षमां प्रार्थयाञ्चक्रिरे। प्रथमो जनः कथयामास, क्षेत्रमेकं क्रीतवानहं तदेव द्रष्टुं मया गन्तव्यम्, अतएव मां क्षन्तुं तं निवेदय।
19 १९ दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’
अन्यो जनः कथयामास, दशवृषानहं क्रीतवान् तान् परीक्षितुं यामि तस्मादेव मां क्षन्तुं तं निवेदय।
20 २० आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
अपरः कथयामास, व्यूढवानहं तस्मात् कारणाद् यातुं न शक्नोमि।
21 २१ तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
पश्चात् स दासो गत्वा निजप्रभोः साक्षात् सर्व्ववृत्तान्तं निवेदयामास, ततोसौ गृहपतिः कुपित्वा स्वदासं व्याजहार, त्वं सत्वरं नगरस्य सन्निवेशान् मार्गांश्च गत्वा दरिद्रशुष्ककरखञ्जान्धान् अत्रानय।
22 २२ नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’
ततो दासोऽवदत्, हे प्रभो भवत आज्ञानुसारेणाक्रियत तथापि स्थानमस्ति।
23 २३ मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.
तदा प्रभुः पुन र्दासायाकथयत्, राजपथान् वृक्षमूलानि च यात्वा मदीयगृहपूरणार्थं लोकानागन्तुं प्रवर्त्तय।
24 २४ कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”
अहं युष्मभ्यं कथयामि, पूर्व्वनिमन्त्रितानमेकोपि ममास्य रात्रिभोज्यस्यास्वादं न प्राप्स्यति।
25 २५ मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,
अनन्तरं बहुषु लोकेषु यीशोः पश्चाद् व्रजितेषु सत्सु स व्याघुट्य तेभ्यः कथयामास,
26 २६ “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
यः कश्चिन् मम समीपम् आगत्य स्वस्य माता पिता पत्नी सन्ताना भ्रातरो भगिम्यो निजप्राणाश्च, एतेभ्यः सर्व्वेभ्यो मय्यधिकं प्रेम न करोति, स मम शिष्यो भवितुं न शक्ष्यति।
27 २७ जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
यः कश्चित् स्वीयं क्रुशं वहन् मम पश्चान्न गच्छति, सोपि मम शिष्यो भवितुं न शक्ष्यति।
28 २८ जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
दुर्गनिर्म्माणे कतिव्ययो भविष्यति, तथा तस्य समाप्तिकरणार्थं सम्पत्तिरस्ति न वा, प्रथममुपविश्य एतन्न गणयति, युष्माकं मध्य एतादृशः कोस्ति?
29 २९ नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,
नोचेद् भित्तिं कृत्वा शेषे यदि समापयितुं न शक्ष्यति,
30 ३० या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!
तर्हि मानुषोयं निचेतुम् आरभत समापयितुं नाशक्नोत्, इति व्याहृत्य सर्व्वे तमुपहसिष्यन्ति।
31 ३१ किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?
अपरञ्च भिन्नभूपतिना सह युद्धं कर्त्तुम् उद्यम्य दशसहस्राणि सैन्यानि गृहीत्वा विंशतिसहस्रेः सैन्यैः सहितस्य समीपवासिनः सम्मुखं यातुं शक्ष्यामि न वेति प्रथमं उपविश्य न विचारयति एतादृशो भूमिपतिः कः?
32 ३२ जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.
यदि न शक्नोति तर्हि रिपावतिदूरे तिष्ठति सति निजदूतं प्रेष्य सन्धिं कर्त्तुं प्रार्थयेत।
33 ३३ त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
तद्वद् युष्माकं मध्ये यः कश्चिन् मदर्थं सर्व्वस्वं हातुं न शक्नोति स मम शिष्यो भवितुं न शक्ष्यति।
34 ३४ मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?
लवणम् उत्तमम् इति सत्यं, किन्तु यदि लवणस्य लवणत्वम् अपगच्छति तर्हि तत् कथं स्वादुयुक्तं भविष्यति?
35 ३५ ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
तद भूम्यर्थम् आलवालराश्यर्थमपि भद्रं न भवति; लोकास्तद् बहिः क्षिपन्ति।यस्य श्रोतुं श्रोत्रे स्तः स शृणोतु।

< लूक 14 >