< लेवीय 6 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
फिर यहोवा ने मूसा से कहा,
2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.
“यदि कोई यहोवा का विश्वासघात करके पापी ठहरे, जैसा कि धरोहर, या लेन-देन, या लूट के विषय में अपने भाई से छल करे, या उस पर अत्याचार करे,
3 किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;
या पड़ी हुई वस्तु को पाकर उसके विषय झूठ बोले और झूठी शपथ भी खाए; ऐसी कोई भी बात क्यों न हो जिसे करके मनुष्य पापी ठहरते हैं,
4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती.
तो जब वह ऐसा काम करके दोषी हो जाए, तब जो भी वस्तु उसने लूट, या अत्याचार करके, या धरोहर, या पड़ी पाई हो;
5 किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;
चाहे कोई वस्तु क्यों न हो जिसके विषय में उसने झूठी शपथ खाई हो; तो वह उसको पूरा-पूरा लौटा दे, और पाँचवाँ भाग भी बढ़ाकर भर दे, जिस दिन यह मालूम हो कि वह दोषी है, उसी दिन वह उस वस्तु को उसके स्वामी को लौटा दे।
6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
और वह यहोवा के सम्मुख अपना दोषबलि भी ले आए, अर्थात् एक निर्दोष मेढ़ा दोषबलि के लिये याजक के पास ले आए, वह उतने ही दाम का हो जितना याजक ठहराए।
7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.
इस प्रकार याजक उसके लिये यहोवा के सामने प्रायश्चित करे, और जिस काम को करके वह दोषी हो गया है उसकी क्षमा उसे मिलेगी।”
8 परमेश्वर मोशेला म्हणाला,
फिर यहोवा ने मूसा से कहा,
9 अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
“हारून और उसके पुत्रों को आज्ञा देकर यह कह कि होमबलि की व्यवस्था यह है: होमबलि ईंधन के ऊपर रात भर भोर तक वेदी पर पड़ा रहे, और वेदी की अग्नि वेदी पर जलती रहे।
10 १० मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.
१०और याजक अपने सनी के वस्त्र और अपने तन पर अपनी सनी की जाँघिया पहनकर होमबलि की राख, जो आग के भस्म करने से वेदी पर रह जाए, उसे उठाकर वेदी के पास रखे।
11 ११ मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी.
११तब वह अपने ये वस्त्र उतारकर दूसरे वस्त्र पहनकर राख को छावनी से बाहर किसी शुद्ध स्थान पर ले जाए।
12 १२ परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
१२वेदी पर अग्नि जलती रहे, और कभी बुझने न पाए; और याजक प्रतिदिन भोर को उस पर लकड़ियाँ जलाकर होमबलि के टुकड़ों को उसके ऊपर सजा कर धर दे, और उसके ऊपर मेलबलियों की चर्बी को जलाया करे।
13 १३ वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
१३वेदी पर आग लगातार जलती रहे; वह कभी बुझने न पाए।
14 १४ हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;
१४“अन्नबलि की व्यवस्था इस प्रकार है: हारून के पुत्र उसको वेदी के आगे यहोवा के समीप ले आएँ।
15 १५ याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपिठ, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय.
१५और वह अन्नबलि के तेल मिले हुए मैदे में से मुट्ठी भर और उस पर का सब लोबान उठाकर अन्नबलि के स्मरणार्थ इस भाग को यहोवा के सम्मुख सुखदायक सुगन्ध के लिये वेदी पर जलाए।
16 १६ अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
१६और उसमें से जो शेष रह जाए उसे हारून और उसके पुत्र खाएँ; वह बिना ख़मीर पवित्रस्थान में खाया जाए, अर्थात् वे मिलापवाले तम्बू के आँगन में उसे खाएँ।
17 १७ ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.
१७वह ख़मीर के साथ पकाया न जाए; क्योंकि मैंने अपने हव्य में से उसको उनका निज भाग होने के लिये उन्हें दिया है; इसलिए जैसा पापबलि और दोषबलि परमपवित्र हैं वैसा ही वह भी है।
18 १८ या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
१८तुम्हारी पीढ़ी-पीढ़ी में हारून के वंश के सब पुरुष उसमें से खा सकते हैं, यहोवा के हवनों में से यह उनका भाग सदैव बना रहेगा; जो कोई उन हवनों को छूए वह पवित्र ठहरेगा।”
19 १९ परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
१९फिर यहोवा ने मूसा से कहा,
20 २० “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
२०“जिस दिन हारून का अभिषेक हो उस दिन वह अपने पुत्रों के साथ यहोवा को यह चढ़ावा चढ़ाए; अर्थात् एपा का दसवाँ भाग मैदा नित्य अन्नबलि में चढ़ाए, उसमें से आधा भोर को और आधा संध्या के समय चढ़ाए।
21 २१ ते तव्यावर तेलात परतावे त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.
२१वह तवे पर तेल के साथ पकाया जाए; जब वह तेल से तर हो जाए तब उसे ले आना, इस अन्नबलि के पके हुए टुकडे़ यहोवा के सुखदायक सुगन्ध के लिये चढ़ाना।
22 २२ त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.
२२हारून के पुत्रों में से जो भी उस याजकपद पर अभिषिक्त होगा, वह भी उसी प्रकार का चढ़ावा चढ़ाया करे; यह विधि सदा के लिये है, कि यहोवा के सम्मुख वह सम्पूर्ण चढ़ावा जलाया जाए।
23 २३ याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.”
२३याजक के सम्पूर्ण अन्नबलि भी सब जलाए जाएँ; वह कभी न खाया जाए।”
24 २४ परमेश्वर मोशेला म्हणाला,
२४फिर यहोवा ने मूसा से कहा,
25 २५ अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
२५“हारून और उसके पुत्रों से यह कह कि पापबलि की व्यवस्था यह है: जिस स्थान में होमबलि पशु वध किया जाता है उसी में पापबलि पशु भी यहोवा के सम्मुख बलि किया जाए; वह परमपवित्र है।
26 २६ जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
२६जो याजक पापबलि चढ़ाए वह उसे खाए; वह पवित्रस्थान में, अर्थात् मिलापवाले तम्बू के आँगन में खाया जाए।
27 २७ ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे.
२७जो कुछ उसके माँस से छू जाए, वह पवित्र ठहरेगा; और यदि उसके लहू के छींटे किसी वस्त्र पर पड़ जाएँ, तो उसे किसी पवित्रस्थान में धो देना।
28 २८ मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
२८और वह मिट्टी का पात्र जिसमें वह पकाया गया हो तोड़ दिया जाए; यदि वह पीतल के पात्र में उबाला गया हो, तो वह माँजा जाए, और जल से धो लिया जाए।
29 २९ याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;
२९याजकों में से सब पुरुष उसे खा सकते हैं; वह परमपवित्र वस्तु है।
30 ३० आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपामध्ये पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.
३०पर जिस पापबलि पशु के लहू में से कुछ भी लहू मिलापवाले तम्बू के भीतर पवित्रस्थान में प्रायश्चित करने को पहुँचाया जाए उसका माँस कभी न खाया जाए; वह आग में जला दिया जाए।

< लेवीय 6 >