< लेवीय 3 >

1 जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
A jeśli ktoś będzie chciał złożyć ofiarę pojednawczą, a byłaby ze stada – czy to samca, czy samicę – niech złoży ją bez skazy przed PANEM.
2 त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
I położy rękę na głowie swojej ofiary, i zabije ją przed wejściem do Namiotu Zgromadzenia. I synowie Aarona, kapłani, pokropią krwią z wierzchu dokoła ołtarz.
3 परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
Potem z ofiary pojednawczej złoży PANU ofiarę ogniową: tłuszcz okrywający wnętrzności i cały tłuszcz, który jest na nich;
4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
Obie nerki z tłuszczem, który jest na nich i na lędźwiach, i płat tłuszczu na wątrobie oddzieli wraz z nerkami.
5 व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
I synowie Aarona spalą to na ołtarzu razem z ofiarą całopalną, która jest na drwach leżących na ogniu. To jest ofiara ogniowa na miłą woń dla PANA.
6 परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
Jeśli zaś jego ofiara na ofiarę pojednawczą dla PANA będzie z trzody, czy to samiec, czy samica, niech złoży ją bez skazy.
7 जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
Jeśli składa owcę na swoją ofiarę, niech złoży ją przed PANEM.
8 त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
I położy rękę na głowie swojej ofiary, i zabije ją przed Namiotem Zgromadzenia. I synowie Aarona pokropią jej krwią z wierzchu dokoła ołtarz.
9 अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
I z ofiary pojednawczej złoży PANU ofiarę ogniową: jej tłuszcz, cały ogon, który odetnie przy samej kości ogonowej, tłuszcz okrywający wnętrzności oraz cały tłuszcz na wnętrznościach;
10 १० दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
Obie nerki z tłuszczem, który jest na nich i na lędźwiach, i płat tłuszczu na wątrobie, który oddzieli wraz z nerkami.
11 ११ मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.
I kapłan spali to na ołtarzu. To [jest] pokarm ofiary ogniowej dla PANA.
12 १२ “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
Jeśli zaś jego ofiara będzie kozą, niech złoży ją przed PANEM.
13 १३ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
Położy rękę na jej głowie i zabije ją przed Namiotem Zgromadzenia. I synowie Aarona pokropią jej krwią ołtarz dokoła.
14 १४ त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
I złoży z niej PANU swoją ofiarę na ofiarę ogniową: tłuszcz okrywający wnętrzności i cały tłuszcz na wnętrznościach;
15 १५ दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
Obie nerki z tłuszczem, który jest na nich i na lędźwiach, i płat tłuszczu na wątrobie, który oddzieli wraz z nerkami.
16 १६ मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
I kapłan spali to na ołtarzu. To [jest] pokarm ofiary ogniowej na miłą woń. Wszelki [bowiem] tłuszcz należy do PANA.
17 १७ तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”
To jest wieczna ustawa dla waszych pokoleń, we wszystkich waszych mieszkaniach: Nie będziecie jeść żadnego tłuszczu ani żadnej krwi.

< लेवीय 3 >