< शास्ते 12 >

1 सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.” 2 तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही. 3 तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत: च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो, या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात?” 4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.” 5 तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला, 6 तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली. 7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले. 8 मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला. 9 तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला. 10 १० नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले. 11 ११ आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायाधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला. 12 १२ नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्यास जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले. 13 १३ आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला. 14 १४ आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला. 15 १५ मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.

< शास्ते 12 >