< यहोशवा 4 >

1 सर्व लोक यार्देन पार करून गेले, तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
जब उस सारी जाति के लोग यरदन के पार उतर चुके, तब यहोवा ने यहोशू से कहा,
2 प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड,
“प्रजा में से बारह पुरुष, अर्थात्–गोत्र पीछे एक-एक पुरुष को चुनकर यह आज्ञा दे,
3 आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”
‘तुम यरदन के बीच में, जहाँ याजकों ने पाँव धरे थे वहाँ से बारह पत्थर उठाकर अपने साथ पार ले चलो, और जहाँ आज की रात पड़ाव होगा वहीं उनको रख देना।’”
4 मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले.
तब यहोशू ने उन बारह पुरुषों को, जिन्हें उसने इस्राएलियों के प्रत्येक गोत्र में से छांटकर ठहरा रखा था,
5 यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या.
बुलवाकर कहा, “तुम अपने परमेश्वर यहोवा के सन्दूक के आगे यरदन के बीच में जाकर इस्राएलियों के गोत्रों की गिनती के अनुसार एक-एक पत्थर उठाकर अपने-अपने कंधे पर रखो,
6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
जिससे यह तुम लोगों के बीच चिन्ह ठहरे, और आगे को जब तुम्हारे बेटे यह पूछें, ‘इन पत्थरों का क्या मतलब है?’
7 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले; कराराचा कोश यार्देन पार करून जात असताना यार्देनेचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी सर्वकाळ स्मारक होतील.”
तब तुम उन्हें यह उत्तर दो, कि यरदन का जल यहोवा की वाचा के सन्दूक के सामने से दो भाग हो गया था; क्योंकि जब वह यरदन पार आ रहा था, तब यरदन का जल दो भाग हो गया। अतः वे पत्थर इस्राएल को सदा के लिये स्मरण दिलानेवाले ठहरेंगे।”
8 यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून बारा धोंडे उचलून इस्राएल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले.
यहोशू की इस आज्ञा के अनुसार इस्राएलियों ने किया, जैसा यहोवा ने यहोशू से कहा था वैसा ही उन्होंने इस्राएली गोत्रों की गिनती के अनुसार बारह पत्थर यरदन के बीच में से उठा लिए; और उनको अपने साथ ले जाकर पड़ाव में रख दिया।
9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.
और यरदन के बीच, जहाँ याजक वाचा के सन्दूक को उठाए हुए अपने पाँव धरे थे वहाँ यहोशू ने बारह पत्थर खड़े कराए; वे आज तक वहीं पाए जाते हैं।
10 १० मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.
१०और याजक सन्दूक उठाए हुए उस समय तक यरदन के बीच खड़े रहे जब तक वे सब बातें पूरी न हो चुकीं, जिन्हें यहोवा ने यहोशू को लोगों से कहने की आज्ञा दी थी। तब सब लोग फुर्ती से पार उतर गए;
11 ११ झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.
११और जब सब लोग पार उतर चुके, तब याजक और यहोवा का सन्दूक भी उनके देखते पार हुए।
12 १२ रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे गेले,
१२और रूबेनी, गादी, और मनश्शे के आधे गोत्र के लोग मूसा के कहने के अनुसार इस्राएलियों के आगे पाँति बाँधे हुए पार गए;
13 १३ युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले.
१३अर्थात् कोई चालीस हजार पुरुष युद्ध के हथियार बाँधे हुए संग्राम करने के लिये यहोवा के सामने पार उतरकर यरीहो के पास के अराबा में पहुँचे।
14 १४ त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.
१४उस दिन यहोवा ने सब इस्राएलियों के सामने यहोशू की महिमा बढ़ाई; और जैसे वे मूसा का भय मानते थे वैसे ही यहोशू का भी भय उसके जीवन भर मानते रहे।
15 १५ तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
१५और यहोवा ने यहोशू से कहा,
16 १६ “कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.”
१६“साक्षी का सन्दूक उठानेवाले याजकों को आज्ञा दे कि यरदन में से निकल आएँ।”
17 १७ त्याप्रमाणे, यहोशवाने याजकांना यार्देनेतून बाहेर येण्याची आज्ञा केली.
१७तो यहोशू ने याजकों को आज्ञा दी, “यरदन में से निकल आओ।”
18 १८ मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
१८और ज्यों ही यहोवा की वाचा का सन्दूक उठानेवाले याजक यरदन के बीच में से निकल आए, और उनके पाँव स्थल पर पड़े, त्यों ही यरदन का जल अपने स्थान पर आया, और पहले के समान तटों के ऊपर फिर बहने लगा।
19 १९ पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला.
१९पहले महीने के दसवें दिन को प्रजा के लोगों ने यरदन में से निकलकर यरीहो की पूर्वी सीमा पर गिलगाल में अपने डेरे डालें।
20 २० यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले.
२०और जो बारह पत्थर यरदन में से निकाले गए थे, उनको यहोशू ने गिलगाल में खड़े किए।
21 २१ तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
२१तब उसने इस्राएलियों से कहा, “आगे को जब तुम्हारे बाल-बच्चे अपने-अपने पिता से यह पूछें, ‘इन पत्थरों का क्या मतलब है?’
22 २२ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले.
२२तब तुम यह कहकर उनको बताना, ‘इस्राएली यरदन के पार स्थल ही स्थल चले आए थे’।
23 २३ आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले.
२३क्योंकि जैसे तुम्हारे परमेश्वर यहोवा ने लाल समुद्र को हमारे पार हो जाने तक हमारे सामने से हटाकर सूखा रखा था, वैसे ही उसने यरदन का भी जल तुम्हारे पार हो जाने तक तुम्हारे सामने से हटाकर सूखा रखा;
24 २४ ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”
२४इसलिए कि पृथ्वी के सब देशों के लोग जान लें कि यहोवा का हाथ बलवन्त है; और तुम सर्वदा अपने परमेश्वर यहोवा का भय मानते रहो।”

< यहोशवा 4 >