< योहान 19 >

1 नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले.
Tad Pilatus Jēzu ņēma un Viņu šauta.
2 तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला.
Un tie karavīri nopina ērkšķu kroni un to uzlika uz Viņa galvu un Tam apvilka purpura mēteli,
3 आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या.
Un sacīja: “Esi sveicināts, Tu Jūdu Ķēniņ!” un Viņam sita vaigā.
4 म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो.”
Tad Pilatus atkal izgāja ārā un uz tiem saka: “Redziet, es jums To vedu ārā, lai jūs zināt, ka es nekādas vainas pie Tā neatrodu.”
5 तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
Tad Jēzus izgāja ārā, to ērkšķu kroni un to purpura drēbi nesdams, un Pilatus uz tiem saka: “Redziet, kāds cilvēks!”
6 मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.”
Kad nu tie augstie priesteri un sulaiņi Viņu redzēja, tad tie brēca un sacīja: “Sit Viņu krustā!” Pilatus uz tiem saka: “Ņemiet jūs Viņu un sitiet Viņu krustā; jo es nekādas vainas pie Viņa neatrodu.”
7 यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”
Tad tie Jūdi viņam atbildēja: “Mums ir bauslība, un pēc mūsu bauslības Viņam būs mirt; jo Viņš pats Sevi par Dieva Dēlu darījis.”
8 पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला;
Kad nu Pilatus šo vārdu dzirdēja, tad viņš vēl vairāk bijās,
9 आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही.
Un atkal iegāja tiesas namā un saka uz Jēzu: “No kurienes Tu esi?” Un Jēzus viņam nekā neatbildēja.
10 १० पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?”
Tad Pilatus uz Viņu saka: “Vai Tu ar mani nerunā? Vai Tu nezini, ka man ir vara, Tevi krustā sist un vara, Tevi palaist?”
11 ११ येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.”
Jēzus atbildēja: “Tev nebūtu nekādas varas pār Mani, ja tā tev nebūtu dota no augšienes. Tāpēc tam, kas Mani tev nodevis, ir tas lielākais grēks.”
12 १२ यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.”
No tā brīža Pilatus meklēja viņu palaist. Bet tie Jūdi brēca un sacīja: “Ja tu Šo laidīsi vaļā, tad tu neesi ķeizara draugs. Jo kas pats ceļas par ķēniņu, tas ķeizaram pretinieks.”
13 १३ म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात.
Kad nu Pilatus šo vārdu dzirdēja, tad viņš Jēzu izveda ārā un nosēdās uz soģa krēslu tai vietā, ko sauc par akmeņu bruģi, ebrejiski gabbatu.
14 १४ तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
Bet tā bija tā sataisāmā diena uz Lieldienu, ap sesto stundu. Un viņš uz tiem Jūdiem saka: “Redziet, jūsu Ķēniņš!”
15 १५ यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.”
Bet tie brēca: “Nost! nost! sit To krustā.” Pilatus uz tiem saka: “Vai man jūsu Ķēniņu būs sist krustā?” Tie augstie priesteri atbildēja: “Mums nav ķēniņa, tik vien ķeizars.”
16 १६ मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले.
Tad viņš tiem To nodeva, ka To sistu krustā; un tie Jēzu ņēma un To aizveda.
17 १७ तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
Un Viņš izgāja un nesa Savu krustu uz to vietu, ko sauc pieres vietu, ebrejiski Golgatu.
18 १८ तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.
Tur tie Viņu sita krustā un līdz ar Viņu divus citus vienā un otrā pusē un Jēzu vidū.
19 १९ आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते.
Un Pilatus rakstīja virsrakstu un to lika krusta galā, un tur bija rakstīts: Jēzus no Nacaretes, tas Jūdu Ķēniņš.
20 २० येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता.
Šo virsrakstu daudz Jūdu lasīja, jo tā vieta, kur Jēzus tapa krustā sists bija tuvu pie pilsētas. Un tas bija rakstīts ebrejiski, grieķiski un latiniski.
21 २१ तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.”
Tad tie Jūdu augstie priesteri uz Pilatu sacīja: “Neraksti: tas Jūdu Ķēniņš, bet ka Viņš sacījis: Es esmu Jūdu Ķēniņš.”
22 २२ पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.”
Pilatus atbildēja: “Ko esmu rakstījis, to esmu rakstījis.”
23 २३ मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता.
Kad nu tie karavīri Jēzu bija krustā situši, tad tie ņēma Viņa drēbes un lika četrās daļās, ikvienam karavīram vienu daļu, un arī tos svārkus. Bet tie svārki bija nešūti, no augšienes caur caurim austi.
24 २४ म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या.
Tad tie savā starpā sacīja: “Tos nedalīsim, bet metīsim kauliņus par tiem, kam tie piederēs;” - ka tie raksti taptu piepildīti, kas saka: “Tie Manas drēbes ir izdalījuši savā starpā un kauliņus metuši par Maniem svārkiem.” Un to tie karavīri darīja.
25 २५ पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या.
Bet tur pie tā krusta stāvēja Jēzus māte un Viņa mātes māsa, Marija, Kleopas sieva, un Marija Maddaļa.
26 २६ येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.”
Kad nu Jēzus Savu māti redzēja un to mācekli, ko Viņš mīlēja, klāt stāvam, tad Viņš saka uz Savu māti: “Sieva, redzi, tavs dēls!”
27 २७ मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
Pēc tam Viņš saka uz to mācekli: “Redzi, tava māte!” Un tai pašā stundā tas māceklis to ņēma pie sevis!
28 २८ मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले.
Pēc tam Jēzus zinādams, ka jau viss bija pabeigts, lai tie raksti taptu piepildīti, saka: “Man slāpst.”
29 २९ तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.
Bet tur stāvēja trauks, pilns etiķa. Un tie sūkli pildīja ar etiķi un to uzdūra īzapa stiebram un Viņam sniedza pie mutes.
30 ३० येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
Kad nu Jēzus to etiķi bija ņēmis, tad Viņš sacīja: “Tas ir piepildīts.” Un, galvu nokāris, Viņš izlaida garu.
31 ३१ तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे.
Tad tie Jūdi, lai svētā dienā tās miesas nepaliktu pie krusta, tāpēc ka tā bija sataisāma diena (jo tā pati svētku diena bija īpaši liela) Pilatu lūdza, ka viņu lieli taptu salauzīti un tie taptu noņemti.
32 ३२ तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले.
Tad tie karavīri nāca un tam pirmajam salauza lielus un tam otram, kas līdz ar To bija krustā sists.
33 ३३ परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत.
Bet kad tie nāca pie Jēzus un redzēja, ka Viņš jau bija nomiris, tad tie Viņam lielus nelauza.
34 ३४ तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
Bet viens no tiem karavīriem Viņam sānos iedūra ar šķēpu, un tūdaļ iztecēja asinis un ūdens.
35 ३५ आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.
Un kas to redzējis, tas to apliecinājis, un viņa liecība ir patiesīga, un viņš zin, ka viņš runā taisnību, lai arī jūs ticat.
36 ३६ कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या.
Jo tas noticis, ka tas raksts taptu piepildīts: Nevienu no Viņa kauliem nebūs salauzt.
37 ३७ आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.”
Un atkal cits raksts saka: tie redzēs To, iekš kā tie dūruši.
38 ३८ यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले.
Pēc tam Jāzeps no Arimatijas, kas bija Jēzus māceklis, bet slepeni, no tiem Jūdiem bīdamies, lūdza Pilatu, ka viņš Jēzus miesas varētu noņemt, un Pilatus to ļāva; un tas nāca un noņēma Jēzus miesas.
39 ३९ आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला.
Bet arī Nikademus nāca, kas citu reiz naktī bija nācis pie Jēzus, un atnesa dārgas svaidāmas zāles, mirres un alvejas sajauktas kādas simts mārciņas.
40 ४० मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले.
Tad tie Jēzus miesas ņēma, un tās ar tām zālēm ietina linu autos, kā tie Jūdi mēdz glabāt.
41 ४१ त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते.
Un tanī vietā, kur Viņš bija krustā sists, bija dārzs un tanī dārzā jauns kaps, kur vēl neviens nebija ielikts.
42 ४२ तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.
Tur tie Jēzu ielika Jūdu sataisāmas dienas dēļ, jo tas kaps bija tuvu klāt.

< योहान 19 >