< योहान 16 >

1 “तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
These have I spoken with you, that you may not be offended.
2 ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.
They shall cast you out from their synagogues; and the hour cometh when every one who shall kill you will think that a sacrifice he offereth unto Aloha.
3 त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
And these will they do, because they have not known either my Father or me.
4 मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
THESE have I spoken with you, that when their time hath come you may remember that I told you. But these at first I did not tell you, because with you I was.
5 पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही.
But now I go unto Him who sent me; and no man of you asketh me, Whither goest thou?
6 पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.
For I have told you these, and sorrow hath come and filled your hearts.
7 तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन;
But I the truth say to you, That it is needful for you that I go; for if I go not, the Paraclete cometh not to you. But if I go, I will send him to you.
8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील.
And when he hath come, he will convict the world of sin, and of righteousness, and of judgment.
9 पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.
Of sin, because they believe not in me;
10 १० नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही.
but of righteousness, because unto my Father I go, and you see me not again;
11 ११ आणि न्यायाविषयी; कारण या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे.
but of judgment, because the ruler of this world is judged.
12 १२ मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.
I have yet much to tell you, but you cannot now apprehend;
13 १३ पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्‍या गोष्टी तुम्हास कळवील.
but when the Spirit of Truth hath come, he will lead you into all the truth; for he will not speak of himself; but all that he shall hear he will speak, and the things to come will he make known to you.
14 १४ तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील.
He will glorify me, because of mine he will take and will show you.
15 १५ जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील.
All whatever that the Father hath is mine: on this account I have said to you, That of mine he will take, and will show you.
16 १६ थोड्या वेळाने, मी तुम्हास दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
A LITTLE (time), and you will not see me; and again a little, and you shall see me, because I go to the Father.
17 १७ तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
And the disciples said one to another, What is this that he saith to us? A little (time), and you will not see me; and again a little (while), and you shall see me, and because I go to my Father.
18 १८ ते म्हणत होते, हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.
And they said, What is this little (time of) which he hath spoken?
19 १९ आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय?
We know not what he saith. But Jeshu knew that they sought to ask him; and he said to them, Concerning this do you inquire together that I told you, A little (time), and you will not see me; and again a little, and you shall see me?
20 २० मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
Amen, amen, I tell you, That you will weep and lament, and the world will rejoice; and to you shall be sorrow; but your sorrow shall become joy.
21 २१ स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
A woman, when she travaileth, hath sorrow, that the day hath come for her giving birth; but when she hath borne a son, she remembereth not her anguish, for joy that a child of man hath been born into the world.
22 २२ आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
You also now have sorrow; but again I will see you, and your heart shall rejoice, and your joy no man taketh from you.
23 २३ आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल.
And in that day you will ask me nothing. Amen, amen, I tell you, That whatsoever you shall ask my Father in my name, he will give you.
24 २४ तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
Hitherto you have not asked any thing in my name: ask, and receive, that your joy may be full.
25 २५ या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.
These in parables I have spoken with you; but the hour cometh when I will not speak with you in parables, but manifestly; and I will announce to you concerning the Father.
26 २६ त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही.
In that day you shall ask in my name; and I say not to you that I will ask of the Father for you;
27 २७ कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
for the Father himself loveth you, because you have loved me, and have believed that from the Father I came forth.
28 २८ मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
I came forth from the Father, and came into the world; and again I leave the world, and go unto the Father.
29 २९ त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.
His disciples say to him, Behold, now openly speakest thou, and not one parable hast thou spoken.
30 ३० आता आम्हास कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरुन आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”
Now know we that every thing thou knowest, and thou needest not that any man should ask thee. By this we believe that from Aloha thou hast come forth.
31 ३१ येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आता विश्वास ठेवता काय?
JESHU saith to them, Believe!
32 ३२ पाहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
Behold, the hour shall come, and now cometh, that you will be dispersed (every) man to his place, and you will have left me alone. But I am not alone, because the Father is with me.
33 ३३ माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”
These have I said to you, that in me you may have peace. In the world you shall have distress; but be of heart, I have conquered the world.

< योहान 16 >