< ईयोब 17 >

1 “माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे.
Mój oddech jest skażony, moje dni gasną, groby na mnie [czekają].
2 खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात.
Czy nie szydercy są przy mnie? Czy moje oko nie czuwa przez ich zniewagi?
3 मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?
Złóż więc zastaw za mnie u siebie. Któż jest ten, który za mnie poręczy?
4 तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस.
Ich serce bowiem ukryłeś przed zrozumieniem, dlatego [ich] nie wywyższysz.
5 जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलांचे डोळे जातील.
Kto pochlebia przyjaciołom, tego dzieciom zgasną oczy.
6 त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात.
Uczynił mnie tematem przysłowia wśród ludzi i pośmiewiskiem przed nimi.
7 दु: ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
Moje oko zaćmiło się od smutku, a wszystkie moje członki są jak cień.
8 यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
Prawi zdumieją się nad tym, a niewinny powstanie przeciwko obłudnikowi.
9 पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
Sprawiedliwy będzie trwał przy swojej drodze, a kto ma czyste ręce, nabierze siły.
10 १० पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही.
Lecz wy wszyscy zawróćcie i przyjdźcie; bo mądrego wśród was nie znajduję.
11 ११ माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
Moje dni przeminęły, rozwiały się moje zamiary, myśli mego serca.
12 १२ माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात.
Noc zamieniają w dzień, światłość skraca się z powodu ciemności.
13 १३ थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. (Sheol h7585)
Gdybym czegoś oczekiwał, grób [będzie] moim domem, w ciemności rozłożyłem swoje posłanie. (Sheol h7585)
14 १४ जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’
Powiedziałem do zniszczenia: Jesteś moim ojcem, a robactwu: Moja matko i moja siostro.
15 १५ तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
Gdzie jest więc teraz moja nadzieja? Kto zobaczy moją nadzieję?
16 १६ माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” (Sheol h7585)
Zstąpią do zasuw grobu, gdy razem odpoczniemy w prochu. (Sheol h7585)

< ईयोब 17 >