< याको. 3 >

1 माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे.
LET there not be many teachers among you, my brethren, but know that a greater condemnation we incur.
2 कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
For (in) many we all offend. Every one who in word offendeth not, this is a perfect man, who is able to make subject also all his body.
3 पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो.
For, behold, bridles into the mouth of horses we throw that we may make them submissive to us, and their whole body we turn.
4 तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.
Also the mighty ships, while the furious winds drive them, by a little wood are turned about to the region which the will of him who guideth doth contemplate.
5 त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते.
So also the tongue is a small member, and uplifteth itself. A little fire also burneth many forests;
6 आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. (Geenna g1067)
and the tongue is a fire, a world of sin, like a forest is the tongue itself among our members; it defileth all of our body, and burneth the course of our generations which run (forward) as a wheel, and kindleth also itself with fire. (Geenna g1067)
7 कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत.
For every nature of animals, and of birds, and reptiles of the sea, and of the dry land, have been subjected to the human nature;
8 पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे.
but the tongue no one can subdue; this is an evil not ordered, (and) full of the poison of death.
9 आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो.
For by it we bless the Lord and the Father, and by it we curse men who in the likeness of Aloha were made;
10 १० एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत.
and from the same mouth go forth curses and blessings. My brethren, it is not fit that these should so be done.
11 ११ झर्‍याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
Can it be that one fountain shall send forth waters sweet and bitter?
12 १२ माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
Or can the fig-tree, my brethren, make olives, or the vines figs? thus also salt waters cannot be made sweet.
13 १३ तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
Who of you is wise and instructed? let him show his works in good conversations in meek wisdom.
14 १४ पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका.
But if you have bitter envy among yourselves, or contention be in your hearts, be not inflated against the truth, nor lie;
15 १५ हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.
because this wisdom from above descendeth not; but is earthly, from the reasonings of the soul, and from demons.
16 १६ कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते.
For where there are envy and contention, there also are tumult and every thing that is evil.
17 १७ पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
But the wisdom that is from above is pure, and full of peace, and meekness, and obedience, and full of mercies and good fruits, and is without division, and faces accepteth not.
18 १८ आणि शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
But the fruits of righteousness in quietness are sown by them who make peace.

< याको. 3 >