< याको. 3 >
1 १ माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे.
Be not many teachers, my brethren, knowing that we shall receive heavier judgment.
2 २ कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
For in many things we all stumble. If any stumbleth not in word, the same is a perfect man, able to bridle the whole body also.
3 ३ पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो.
Now if we put the horses’ bridles into their mouths, that they may obey us, we turn about their whole body also.
4 ४ तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्याने लोटली जातात, पण ती चालवणार्या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.
Behold, the ships also, though they are so great, and are driven by rough winds, are yet turned about by a very small rudder, whither the impulse of the steersman willeth.
5 ५ त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते.
So the tongue also is a little member, and boasteth great things. Behold, how much wood is kindled by how small a fire!
6 ६ आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. (Geenna )
And the tongue is a fire: the world of iniquity among our members is the tongue, which defileth the whole body, and setteth on fire the wheel of nature, and is set on fire by hell. (Geenna )
7 ७ कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत.
For every kind of beasts and birds, of creeping things and things in the sea, is tamed, and hath been tamed by mankind:
8 ८ पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे.
but the tongue can no man tame; [it is] a restless evil, [it is] full of deadly poison.
9 ९ आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो.
Therewith bless we the Lord and Father; and therewith curse we men, which are made after the likeness of God:
10 १० एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत.
out of the same mouth cometh forth blessing and cursing. My brethren, these things ought not so to be.
11 ११ झर्याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
Doth the fountain send forth from the same opening sweet [water] and bitter?
12 १२ माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
Can a fig tree, my brethren, yield olives, or a vine figs? neither [can] salt water yield sweet.
13 १३ तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
Who is wise and understanding among you? let him shew by his good life his works in meekness of wisdom.
14 १४ पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका.
But if ye have bitter jealousy and faction in your heart, glory not and lie not against the truth.
15 १५ हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.
This wisdom is not [a wisdom] that cometh down from above, but is earthly, sensual, devilish.
16 १६ कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते.
For where jealousy and faction are, there is confusion and every vile deed.
17 १७ पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
But the wisdom that is from above is first pure, then peaceable, gentle, easy to be entreated, full of mercy and good fruits, without variance, without hypocrisy.
18 १८ आणि शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
And the fruit of righteousness is sown in peace for them that make peace.