< होशेय 1 >

1 होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.
शाहान — ए — यहूदाह उज़्ज़ियाह और यूताम और आख़ज़ और हिज़क़ियाह और शाह ए — इस्राईल युरब'आम — बिन — यूआस के दिनों में ख़ुदावन्द का कलाम होसे'अ — बिन — बैरी पर नाज़िल हुआ।
2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.”
जब ख़ुदावन्द ने शुरू' में होसे'अ के ज़रिए' कलाम किया, तो उसको फ़रमाया, “जा, एक बदकार बीवी और बदकारी की औलाद अपने लिए ले, क्यूँकि मुल्क ने ख़ुदावन्द को छोड़कर बड़ी बदकारी की है।”
3 म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
तब उसने जाकर जुमर बिन्त दिबलाईम को लिया; वह हामिला हुई, और बेटा पैदा हुआ।
4 परमेश्वर होशेयला म्हणाला, त्याचे नाव इज्रेल ठेव, कारण काही वेळानंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.
और ख़ुदावन्द ने उसे कहा, उसका नाम यज़र'एल रख, क्यूँकि मैं 'अनक़रीब ही याहू के घराने से यज़र'एल के खू़न का बदला लूँगा, और इस्राईल के घराने की सल्तनत को ख़त्म करूँगा।
5 त्या दिवशी मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.
और उसी वक़्त यज़र'एल की वादी में इस्राईल की कमान तोडूँगा।
6 गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
वह फिर हामिला हुई, और बेटी पैदा हुई। और ख़ुदावन्द ने उसे फ़रमाया, कि “उसका नाम लूरहामा रख, क्यूँकि मैं इस्राईल के घराने पर फिर रहम न करूँगा कि उनको मु'आफ़ करूँ।
7 तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.
लेकिन यहूदाह के घराने पर रहम करूँगा, और मैं ख़ुदावन्द उनका ख़ुदा उनको रिहाई दूँगा और उनको कमान और तलवार और लड़ाई और घोड़ों और सवारों के वसीले से नहीं छुड़ाऊँगा।”
8 मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला.
और लूरहामा का दूध छुड़ाने के बा'द, वह फिर हामिला हुई और बेटा पैदा हुआ।
9 मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नांव लो-अम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही.
और उसने फ़रमाया, कि उसका नाम लो'अम्मी रख; क्यूँकि तुम मेरे लोग नहीं हो, और मैं तुम्हारा नहीं हूँगा।
10 १० जरी इस्राएलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल जी मोजता येत नाही हे असे घडेल की, जिथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
तोभी बनी — इस्राईल दरिया की रेत की तरह बेशुमार — ओ — बेक़ियास होंगे, और जहाँ उनसे ये कहा जाता था, तुम मेरे लोग नहीं हो, ज़िन्दा ख़ुदा के फ़र्ज़न्द कहलाएँगे।
11 ११ यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.
और बनी यहूदाह और बनी — इस्राईल आपस में एक होंगे, और अपने लिए एक ही सरदार मुक़र्रर करेंगे। और इस मुल्क से खुरूज करेंगे, क्यूँकि यज़र'एल का दिन 'अज़ीम होगा।

< होशेय 1 >