< यहेज्केल 39 >

1 आता “मानवाच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे.
Ty więc, synu człowieczy, prorokuj przeciwko Gogowi i mów: Tak mówi Pan BÓG: Oto jestem przeciwko tobie, Gogu, naczelny księciu w Meszek i Tubal.
2 मी तुला वळविन आणि मी तुला पुढे नेईन; अति उत्तरेकडून मी तुला परत आणीन आणि इस्राएलाच्या पर्वतांशी आणीन.
Zawrócę cię i zostawię z ciebie tylko szóstą część, wyprowadzę cię z północnych stron i wprowadzę cię na góry Izraela.
3 मग मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य उडवून देईन; व तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
Wytrącę twój łuk z twej lewej ręki i wybiję twoje strzały z twej prawej ręki.
4 तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हास पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन.
Na górach Izraela padniesz ty i wszystkie twoje zastępy oraz ludy, które będą z tobą. Wydam cię na pożarcie ptactwu, wszelkim istotom skrzydlatym i zwierzętom polnym.
5 तू शेतातील पृष्टभागावर मरून पडशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Padniesz na otwartym polu, bo ja to wypowiedziałem, mówi Pan BÓG.
6 मग मी, मागोगामध्ये व किनाऱ्यावर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांमध्ये अग्नी पाठवीन. मग त्यांना समजेल ‘मी परमेश्वर आहे.’
I ześlę ogień na Magoga i na tych, którzy bezpiecznie mieszkają na wyspach. I poznają, że ja jestem PANEM.
7 कारण मी माझ्या इस्राएल लोकांमध्ये माझे पवित्र नाव माहीत करून देईन. आणि मी यापुढे आपले पवित्र नाव पुन्हा भ्रष्ट होऊ देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
A dam poznać moje święte imię pośród mojego ludu Izraela i nie pozwolę już zbezcześcić mojego świętego imienia. I poznają narody, że ja jestem PANEM, Święty w Izraelu.
8 पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे.
Oto nadchodzi [to] i spełni się, mówi Pan BÓG. To jest dzień, o którym mówiłem.
9 “तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील.
Wtedy mieszkańcy miast Izraela wyjdą, rozniecą ogień i spalą oręże: tarcze i puklerze, łuki i strzały, oszczepy i włócznie. I będą tym palić ogień przez siedem lat.
10 १० त्यामुळे त्यांना रानातून लाकडे गोळा करावी लागणार नाही किंवा जंगलातून लाकडे तोडावी लागणार नाहीत. तर ही शस्त्रांस्त्रे ते जाळतील. त्यास ज्यांनी लुटले त्यास ते लुटतील. ज्या कोणी त्यांच्याकडून घेतले ते त्याजकडून घेतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Nie będą znosić drwa z pola ani rąbać go w lasach, ale orężem będzie się palić. A złupią tych, którzy ich łupili, i będą plądrować tych, którzy ich plądrowali, mówi Pan BÓG.
11 ११ मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्यास ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील.
I stanie się w tym dniu, że dam Gogowi miejsce na grób, tam w Izraelu, dolinę przechodzących na wschód od morza, która zatka [usta] przechodniów. Pogrzebią tam Goga i całą jego rzeszę i nazwą ją Doliną Hamon-Gog.
12 १२ देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल.
Dom Izraela będzie ich grzebać przez siedem miesięcy, aby oczyścić ziemię.
13 १३ कारण देशातील सर्व लोक त्यांना पुरतील. मी जेव्हा गौरविला जाईन तो दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय होईल.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
A tak będzie ich grzebał cały lud tej ziemi i wyjdzie mu to na chwałę w dniu, w którym będę uwielbiony, mówi Pan BÓG.
14 १४ “हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि तो देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील.
I wyznaczą mężczyzn, którzy będą stale przechodzić po tej ziemi, aby wraz z przechodniami grzebać tych, którzy pozostali na ziemi, by ją oczyścić. Po upływie siedmiu miesięcy zaczną przeszukiwanie.
15 १५ शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थी दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थीला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
A gdy przybysze będą przechodzić przez ziemię, a któryś [z nich] zobaczy kość ludzką, postawią przy niej znak, aż grabarze ją pogrzebią w Dolinie Hamon-Gog.
16 १६ तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
A nazwa tego miasta będzie Hamona. I tak oczyszczą ziemię.
17 १७ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.
A ty, synu człowieczy, tak mówi Pan BÓG: Powiedz ptactwu, wszelkim istotom skrzydlatym i zwierzętom polnym: Zbierzcie się i przyjdźcie, zgromadźcie się zewsząd na moją ofiarę, którą wam przygotowałem, wielką ofiarę na górach Izraela, abyście jedli mięso i pili krew.
18 १८ तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत.
Będziecie jeść mięso mocarzy i pić krew książąt ziemi, baranów, jagniąt, kozłów i cielców, wszystkie tuczniki z Baszanu.
19 १९ कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्यांचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल.
Najecie się tłuszczu do syta i upoicie się krwią z mojej ofiary, którą wam przygotowałem.
20 २० माझ्या मेजावर बसून तुम्हास तेथे घोडे, रथ, योद्धे आणि प्रत्येक लढणारा मनुष्य यांस खाऊन तुमची तृप्ती होईल.” प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
I nasycicie się przy moim stole końmi, jeźdźcami, mocarzami i wszystkimi wojownikami, mówi Pan BÓG.
21 २१ “मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील.
Tak objawię moją chwałę wśród narodów. Wszystkie narody zobaczą mój sąd, który wykonałem, i moją rękę, którą na nie wyciągnąłem.
22 २२ मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
I pozna dom Izraela, że ja jestem PANEM, ich Bogiem, od tego dnia i na zawsze.
23 २३ आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले.
Poznają też narody, że dom Izraela z powodu swojej nieprawości został uprowadzony do niewoli, ponieważ wystąpił przeciwko mnie. [Dlatego] też zakryłem przed nim swoje oblicze i wydałem go w ręce jego wrogów, i polegli wszyscy od miecza.
24 २४ मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.”
Według ich nieczystości i według ich występków postąpiłem z nimi i zakryłem przed nimi swoje oblicze.
25 २५ म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन.
Dlatego tak mówi Pan BÓG: Teraz odwrócę niewolę Jakuba i zmiłuję się nad całym domem Izraela, i będę zazdrosny o moje święte imię;
26 २६ मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील.
Gdy już zniosą swoją hańbę i wszystkie swoje przestępstwa, którymi wystąpili przeciwko mnie, wtedy gdy bezpiecznie mieszkali w swojej ziemi, a nikt ich nie trwożył.
27 २७ मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल.
A gdy sprowadzę ich z narodów i zgromadzę z ziem ich wrogów, i będę w nich uświęcony na oczach wielu narodów;
28 २८ नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्यांना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोडून देणार नाही.
Wtedy poznają, że ja jestem PANEM, ich Bogiem, który uprowadził ich do niewoli wśród narodów, ale teraz zgromadzę ich znowu w ich ziemi, a nie pozostawię tam żadnego z nich.
29 २९ मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
I nie zakryję już przed nimi mojego oblicza, gdyż wyleję mojego ducha na dom Izraela, mówi Pan BÓG.

< यहेज्केल 39 >