< अनुवाद 17 >

1 परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.
Não sacrificarás ao Senhor teu Deus, boi ou gado miudo em que haja defeito ou alguma coisa má; pois abominação é ao Senhor teu Deus.
2 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,
Quando no meio de ti, em alguma das tuas portas que te dá o Senhor teu Deus, se achar algum homem ou mulher que fizer mal aos olhos do Senhor teu Deus, traspassando o seu concerto,
3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,
Que se fôr, e servir a outros deuses, e se encurvar a elles, ou ao sol, ou á lua, ou a todo o exercito do céu; o que eu não ordenei;
4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,
E te fôr denunciado, e o ouvires; então bem o inquirirás: e eis que, sendo verdade, e certo que se fez tal abominação em Israel.
5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा.
Então tirarás o homem ou a mulher que fez este maleficio, ás tuas portas, sim, o tal homem ou mulher: e os apedrejarás com pedras, até que morram.
6 त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
Por bocca de duas testemunhas, ou tres testemunhas, será morto o que houver de morrer: por bocca d'uma só testemunha não morrerá.
7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
A mão das testemunhas será primeiro contra elle, para matal-o; e depois a mão de todo o povo: assim tirarás o mal do meio de ti.
8 एखादे खूनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हास आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
Quando alguma coisa te fôr difficultosa em juizo, entre sangue e sangue, entre demanda e demanda, entre ferida e ferida, em negocios de pendencias nas tuas portas, então te levantarás, e subirás ao logar que escolher o Senhor teu Deus;
9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
E virás aos sacerdotes levitas, e ao juiz que houver n'aquelles dias, e inquirirás, e te annunciarão a palavra que fôr do juizo.
10 १० परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
E farás conforme ao mandado da palavra que te annunciarão do logar que escolher o Senhor; e terás cuidado de fazer conforme a tudo o que te ensinarem.
11 ११ तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.
Conforme ao mandado da lei que te ensinarem, e conforme ao juizo que te disserem, farás: da palavra que te annunciarem te não desviarás, nem para a direita nem para a esquerda.
12 १२ जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा. त्यास मृत्यूदंड द्या. इस्राएलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा.
O homem pois que se houver soberbamente, não dando ouvidos ao sacerdote, que está ali para servir ao Senhor teu Deus, nem ao juiz, o tal homem morrerá: e tirarás o mal de Israel:
13 १३ हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
Para que todo o povo o ouça, e tema, e nunca mais se ensoberbeça.
14 १४ तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे रहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल.
Quando entrares na terra, que te dá o Senhor teu Deus, e a possuires, e n'ella habitares, e disseres: Porei sobre mim um rei, assim como teem todas as gentes que estão em redor de mim:
15 १५ तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तीची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
Porás certamente sobre ti como rei aquelle que escolher o Senhor teu Deus: d'entre teus irmãos porás rei sobre ti: não poderás pôr homem estranho sobre ti, que não seja de teus irmãos
16 १६ त्याने स्वत: साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
Porém não multiplicará para si cavallos, nem fará voltar o povo ao Egypto, para multiplicar cavallos; pois o Senhor vos tem dito: Nunca mais voltareis por este caminho.
17 १७ तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
Tão pouco para si multiplicará mulheres, para que o seu coração se não desvie: nem prata nem oiro multiplicará muito para si.
18 १८ राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत: साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
Será tambem que, quando se assentar sobre o throno do seu reino, então escreverá para si um traslado d'esta lei n'um livro, do que está diante dos sacerdotes levitas.
19 १९ नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
E o terá comsigo, e n'elle lerá todos os dias da sua vida; para que aprenda a temer ao Senhor seu Deus, para guardar todas as palavras d'esta lei, e estes estatutos, para fazel-os;
20 २० म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
Para que o seu coração não se levante sobre os seus irmãos, e não se aparte do mandamento, nem para a direita nem para a esquerda: para que prolongue os dias no seu reino, elle e seus filhos no meio de Israel.

< अनुवाद 17 >