< प्रेषि. 22 >

1 बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
“Hermanos y padres, escuchad la defensa que ahora os hago”.
2 तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले.
Cuando oyeron que les hablaba en lengua hebrea, se callaron aún más. Dijo:
3 मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
“En verdad soy judío, nacido en Tarso de Cilicia, pero criado en esta ciudad a los pies de Gamaliel, instruido según la estricta tradición de la ley de nuestros padres, siendo celoso de Dios, como lo sois todos vosotros hoy.
4 पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.
Perseguí a este Camino hasta la muerte, atando y entregando en las cárceles tanto a hombres como a mujeres,
5 त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.
como también lo atestiguan el sumo sacerdote y todo el consejo de ancianos, de quienes también recibí cartas para los hermanos, y viajé a Damasco para llevar también a Jerusalén a los que estaban allí atados para ser castigados.
6 मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
“Mientras hacía mi viaje y me acercaba a Damasco, hacia el mediodía, una gran luz brilló a mi alrededor desde el cielo.
7 तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.
Caí al suelo y oí una voz que me decía: “Saulo, Saulo, ¿por qué me persigues?”
8 मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”
Respondí: “¿Quién eres, Señor?” Me dijo: “Yo soy Jesús de Nazaret, a quien tú persigues”.
9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
“Los que estaban conmigo, en efecto, vieron la luz y tuvieron miedo, pero no entendieron la voz del que me hablaba.
10 १० मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”
Yo dije: “¿Qué debo hacer, Señor? El Señor me dijo: ‘Levántate y ve a Damasco. Allí se te informará de todo lo que está previsto que hagas’.
11 ११ त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
Cuando no podía ver por la gloria de aquella luz, siendo conducido de la mano de los que estaban conmigo, entré en Damasco.
12 १२ मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
“Un tal Ananías, hombre piadoso según la ley, del que tenían buena fama todos los judíos que vivían en Damasco,
13 १३ तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
se acercó a mí y, de pie, me dijo: “Hermano Saulo, recibe la vista”. En aquella misma hora le miré.
14 १४ मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Me dijo: “El Dios de nuestros padres te ha designado para que conozcas su voluntad, para que veas al Justo y oigas la voz de su boca.
15 १५ कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
Porque serás testigo de él ante todos los hombres de lo que has visto y oído.
16 १६ तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
Ahora, ¿por qué esperáis? Levántate, bautízate y lava tus pecados, invocando el nombre del Señor’.
17 १७ मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
“Cuando volví a Jerusalén y mientras oraba en el templo, caí en un trance
18 १८ तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.”
y vi que me decía: ‘Date prisa y sal de Jerusalén rápidamente, porque no recibirán el testimonio de ti sobre mí’.
19 १९ तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे.
Le dije: ‘Señor, ellos mismos saben que yo encarcelé y golpeé en todas las sinagogas a los que creían en ti.
20 २० तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
Cuando se derramó la sangre de Esteban, tu testigo, yo también estaba de pie, consintiendo su muerte y guardando los mantos de los que lo mataron.’
21 २१ तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”
“Me dijo: ‘Vete, porque te enviaré lejos de aquí a los gentiles’”.
22 २२ या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.
Le escucharon hasta que dijo eso; entonces levantaron la voz y dijeron: “¡Limpia la tierra de este tipo, porque no es apto para vivir!”
23 २३ ते ओरडत व आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.
Mientras gritaban, se quitaban los mantos y arrojaban polvo al aire,
24 २४ सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.
el comandante mandó que lo llevaran al cuartel, ordenando que lo examinaran mediante la flagelación, para saber por qué delito gritaban así contra él.
25 २५ मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
Cuando le ataron con correas, Pablo preguntó al centurión que estaba allí: “¿Os es lícito azotar a un hombre que es romano y no ha sido declarado culpable?”
26 २६ हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे.
Cuando el centurión lo oyó, se dirigió al oficial al mando y le dijo: “¡Cuidado con lo que vas a hacer, porque este hombre es un romano!”
27 २७ तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
El oficial al mando se acercó y le preguntó: “Dime, ¿eres romano?” Dijo: “Sí”.
28 २८ सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
El comandante respondió: “Compré mi ciudadanía a un gran precio”. Pablo dijo: “Pero yo nací romano”.
29 २९ ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते.
Inmediatamente se apartaron de él los que iban a interrogarle, y también el comandante tuvo miedo al ver que era romano, porque le había atado.
30 ३० यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.
Pero al día siguiente, deseando saber la verdad sobre el motivo por el que era acusado por los judíos, le liberó de las ataduras y mandó reunir a los jefes de los sacerdotes y a todo el consejo, e hizo bajar a Pablo y lo presentó ante ellos.

< प्रेषि. 22 >