< प्रेषि. 21 >

1 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
And when it came to pass, that we having been farewelled by them, embarked, sailing straight forward, we arrived at Cos, and on the following day to Rhodes, and thence to Patara.
2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
And finding a ship sailing into Phoenicia, having embarked, we moved out.
3 तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
And coming in sight of Cyprus, and leaving it on the left, we sailed to Syria, and disembarked at Tyre: for there the ship was delivering her cargo.
4 तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
And finding disciples, we tarried there seven days: who continued to say to Paul through the Spirit, that he should not go to Jerusalem.
5 आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला, त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
And when it came to pass that we refitted during those days, having come out, we departed, all sending us forth, along with the women and children, out of the city: and putting down the knees on the shore, having prayed,
6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
we farewelled one another, and went up into the ship; and they returned to their own homes.
7 सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
And we continuing our voyage from Tyre, we arrived at Ptolemais, and having saluted the brethren, we remained with them one day.
8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.
And on the following day, having come out, we came into Caesarea: and having entered into the house of Philip the evangelist, being one of the seven, we abode with him.
9 त्यास चार मुली होत्या, त्यांची लग्ने झालेली नव्हती, या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते.
And there were to him four virgin daughters, prophesying.
10 १० त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
And we remaining many days, a certain prophet, by name Agabus, came down from Judea;
11 ११ त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला, त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्यास यरूशलेम शहरातील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”
and having come to us, and taking the girdle of Paul, binding his own feet and hands, said, These things says the Holy Ghost, The man whose girdle this is, will the Jews in Jerusalem bind and deliver into the hands of the Gentiles.
12 १२ आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
And when we heard these words, both we, and the citizens, exhorted him not to go up to Jerusalem.
13 १३ पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”
Then Paul responded and said, What are you doing, weeping and breaking my heart? for I am ready not only to be bound, but to die in Jerusalem for the name of the Lord Jesus.
14 १४ यरूशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
And he not being persuaded, we acquiesced, saying, Let the will of the Lord be done.
15 १५ त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो.
And after those days, taking our luggage, we went up to Jerusalem:
16 १६ कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
and some of the disciples from Caesarea went along with us, bringing Mnason a certain Cyprian, an old disciple, with whom we should lodge.
17 १७ आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
And we being in Jerusalem, the brethren received us gladly.
18 १८ दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
And on the following day, Paul goes with us to James; and all the elders assembled.
19 १९ पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
And having saluted them, he related each one of those things which God did among the Gentiles through his ministry.
20 २० जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे.
And they hearing, continued to glorify God, and said to him, You see, brother, how many myriads there are of those who believe; and they are all zealots of the law:
21 २१ या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.
and they have been informed concerning thee, that thou art teaching all the Jews who are among the Gentiles apostasy from Moses, saying that they are not to circumcise their children, nor to walk according to the customs.
22 २२ मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
Then what is it? it is altogether necessary that the multitude come together: for they will hear that you have come.
23 २३ तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
Therefore do this which we tell thee. There are four men among us having a vow upon them;
24 २४ त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
taking them, be purified along with them, and be at charges for them, that they may shave their head: and all shall know that there is nothing of those things they have been informed concerning thee; but that thyself art walking, keeping the law.
25 २५ जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.”
But concerning the Gentiles who have believed, we have sent to them, adjudicating that they keep themselves from idolatry, and blood, and strangulation, and fornication.
26 २६ मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
Then Paul, having taken the men, the next day being purified along with them, enters into the temple, proclaiming the fulfillment of the days of purification, until an offering may be made for each one of them.
27 २७ सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.
And when the seven days were about to have an end, the Jews from Asia, seeing him in the temple, stirred up the whole multitude, and laid hands on him, crying out,
28 २८ ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलाच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
Israelitish men, help: this is the man, teaching all everywhere against the people, and the law, and this place, and he has even yet led Greeks into the temple, and polluted this holy place.
29 २९ ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम शहरातील पाहिले होते, त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता, लोकांस वाटले, पौलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे.
For they saw Trophimus the Ephesian in the city with him, whom they supposed that Paul led into the temple.
30 ३० सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली.
And the whole city was excited, and there was a commotion of the people: and taking Paul, they dragged him out of the temple; and immediately the doors were closed.
31 ३१ ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
And seeking to kill him, the report went up to the chiliarch of the band, that all Jerusalem is in commotion;
32 ३२ ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
who immediately, taking soldiers and centurions, ran to them: and they, seeing the chiliarch and the soldiers, ceased beating Paul.
33 ३३ मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
Then the chiliarch, having come nigh, took Paul, and commanded that he should be bound with two chains; and was making inquiry who he might be, and what he had done.
34 ३४ गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
And they continued to cry aloud in the multitude, some one thing, and some another: and he, being unable to know the certainty on account of the uproar, commanded that he should be led into the castle.
35 ३५ जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले.
Then when he was on the threshold, it happened that he was carried by the soldiers, on account of the violence of the mob;
36 ३६ कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.”
for the multitude of the people were following, crying out, Take him away.
37 ३७ शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय?
And Paul, being about to be led into the castle, says to the chiliarch, Is it lawful for me to say something to thee? And he said, Do you speak Greek?
38 ३८ मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले ज्या मिसरी मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस, त्या मिसरी मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
Are you not that Egyptian who before these days rising up and leading away into the desert four hundred men of daggers?
39 ३९ पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सस नगरात राहणारा मी एक यहूदी आहे, मी एका महत्त्वाच्या शहराचा नागरिक आहे, मी तुम्हास विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
But Paul said, I am indeed a Jewish man, a Tarsean, a citizen of Cilicia, no mean city: but, I pray you, permit me to speak to the people.
40 ४० जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले, जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला.
And he permitting, Paul, standing on the threshold, beckoned with his hand to the people: and there being great silence, he spoke to them in the Hebrew tongue, saying:

< प्रेषि. 21 >