< प्रेषि. 20 >

1 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला.
And after the tumult had ceased, Paul called to him the disciples, and having embraced them departed to go into Macedonia.
2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला.
And when he had gone through those regions, and had given them much exhortation, he came into Greece.
3 त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.
And when he had stayed three months, a plot having been laid for him by the Jews as he was about to sail for Syria, he resolved to return through Macedonia.
4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया नगराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
And there accompanied him as far as Asia, Sopater, son of Pyrrhus, a Beroean; and of the Thessalonians, Aristarchus and Secundus, and Gaius of Derbe, and Timothy; and of Asia, Tychicus and Trophimus.
5 ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस शहरात आमची वाट पाहू लागली.
These having gone forward waited for us at Troas.
6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
But we set sail from Philippi, after the days of unleavened bread, and came to them at Troas in five days, where we abode seven days.
7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
And on the first day of the week, when we had assembled to break bread, Paul discoursed to them, being about to depart on the morrow, and continued the discourse until midnight.
8 माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
And there were many lamps in the upper room where we had assembled.
9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.
And there sat on the window a certain young man named Eutychus, having fallen into a deep sleep; and as Paul was discoursing at great length, he sank down with sleep, and fell from thee third story, and was taken up dead.
10 १० पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.”
But Paul went down and fell on him, and having embraced him, said, Make no lamentations; for his life is in him.
11 ११ मग पौल वर गेला, त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली, पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला.
And having gone up again, and broken the bread and eaten, he talked a long while even till break of day, and so departed.
12 १२ त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
And they brought the young man alive, and were not a little comforted.
13 १३ तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.
We however, going forward to the ship, put to sea for Assos, intending to take in Paul from that place; for so he had appointed, intending himself to go on foot.
14 १४ जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो.
And when he met us at Assos, we took him on board, and came to Mitylene;
15 १५ दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो.
and sailing thence, we came the following day over against Chios. And the next day we arrived at Samos; and having tarried at Trogyllium, we came the next day to Miletus.
16 १६ कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही, आशियात त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते, तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्यास यरूशलेम शहरात रहावयास हवे होते.
For Paul had determined to sail past Ephesus, that he might not be detained in Asia; for he was hastening, if it were possible for him, to be at Jerusalem on the day of Pentecost.
17 १७ मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
And from Miletus he sent to Ephesus, and called the elders of the church.
18 १८ जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे.
And when they had come to him, he said to them: Ye yourselves know, from the first day that I came into Asia, after what manner I have been with you the whole time,
19 १९ मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली, यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली.
serving the Lord with all humility, and with tears, and trials which befell me by the plots of the Jews;
20 २० जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
how I kept back nothing that was profitable, but have made it known to you, and have taught you publicly, and from house to house;
21 २१ पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.
testifying to both Jews and Greeks repentance toward God, and faith in our Lord Jesus.
22 २२ आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही.
And now behold, I go, bound in my spirit, to Jerusalem, not knowing the things that will befall me there;
23 २३ मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो.
save that the Holy Spirit witnesseth to me in every city, saying that bonds and afflictions await me.
24 २४ मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे.
But I count life of no value to me, so that I may finish my course, and the ministry which I received from the Lord Jesus, to testify the glad tidings of the grace of God.
25 २५ राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे.
And now, behold, I know that ye all, among whom I went about preaching the kingdom, will see my face no more.
26 २६ म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.
Wherefore I testify to you this day, that I am pure from the blood of all men;
27 २७ देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
for I have not shunned to declare to you the whole counsel of God.
28 २८ तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Take heed therefore to yourselves, and to all the flock over which the Holy Spirit made you overseers, to feed the church of the Lord, which he purchased with his own blood.
29 २९ मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत.
For I know this, that after my departure grievous wolves will enter in among you, not sparing the flock.
30 ३० तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
And from among yourselves will men arise speaking perverse things, to draw away the disciples after them.
31 ३१ यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
Therefore be watchful, and remember that for the space of three years, night and day, I ceased not to warn every one with tears.
32 ३२ आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.
And now I commend you to God, and to the word of his grace, who is able to build you up, and to give you an inheritance among all the sanctified.
33 ३३ मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही.
I have coveted no man's silver, or gold, or apparel.
34 ३४ मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे.
Ye yourselves know, that these hands ministered to my necessities, and to those that were with me.
35 ३५ अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”
In all ways I showed you that so laboring ye ought to support the weak, and to remember the words of the Lord Jesus, that he himself said, It is more blessed to give than to receive.
36 ३६ आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
And having thus spoken, he kneeled down, and prayed with them all.
37 ३७ तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.
And they all wept sorely, and fell on Paul's neck, and kissed him;
38 ३८ ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.
sorrowing most of all for the word which he had spoken, that they were to see his face no more. And they accompanied him to the ship.

< प्रेषि. 20 >