< प्रेषि. 2 >

1 नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.
AND when the days of pentecost were fulfilled, while they were assembled all together,
2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.
there was suddenly from heaven the voice as of a mighty wind, and all that house in which they were sitting was filled with it;
3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.
and tongues that were divided like fire appeared to them, and sat upon each one of them.
4 तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
And they were all filled with the Holy Spirit, and they began to speak in several tongues as the Spirit gave them to speak.
5 त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते.
But there were men dwelling in Urishlem who feared Aloha; Jihudoyee, from all the peoples who are under heaven.
6 तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.
And when that voice was made, the whole people assembled and were perturbed, because every man of them heard as they spoke in their (several) tongues.
7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना?
(And) they were all astonished, and wondered, saying one to another, These all who speak, behold, are they not Galiloyee?
8 तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
How hear we (then) each in his own tongue in which we were born?
9 पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया,
Parthoyee and Medoyee and Alanoyee, and they who dwell in the Place of Rivers, Jihudoyee and Kapadukoyee, and of the region of Pontos and of Asia;
10 १० फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,
and from the land of Phrygia and of Pamphylia and of Metsreen, and the regions of Lybi neighbouring upon Kyrine, and those who come from Rumi, Jihudoyee, and Proselytes,
11 ११ क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
and from Krete and Arabia, behold, we hear them speaking in our tongues the wonders of Aloha.
12 १२ तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?”
But all of them were amazed and admired, saying one to another, Of whom is this thing?
13 १३ परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.”
But others mocked them, saying, These have drunk new wine, and are inebriate.
14 १४ तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
And afterwards arose Shemun Kipha with the eleven apostles, and lifted up his voice and said to them: Men, Jihudoyee, and all who dwell at Urishlem, be this known to you, and hearken to my words.
15 १५ तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत.
For not as you suppose are these drunken; for, behold, until now are three hours.
16 १६ परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे:
But this is that spoken of by Joel the prophet:
17 १७ देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.
It shall be in the last days, saith Aloha, I will pour my Spirit upon all flesh: And your sons and your daughters shall prophesy, And your youths shall see visions,
18 १८ आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील.
And your elders shall dream dreams: And upon the servants and upon the handmaids Will I pour my Spirit in those days; And they shall prophesy.
19 १९ आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन.
And I will give signs in heaven, And mighty (deeds) on earth; Blood and fire and clouds of smoke:
20 २० परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
The sun shall be turned into darkness, And the moon into blood, Before shall come the day of the Lord, great and fearful;
21 २१ तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.”
And every one who shall call the name Of the Lord shall be saved.
22 २२ “अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे.
MEN, sons of Israel, hear these words; Jeshu Natsroya, the man who from Aloha appeared with you, with powers and mighty acts, which Aloha wrought among you by his hand, (even) as you know,
23 २३ तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
This, who was separated thereunto by the foreknowledge and by the will of Aloha, you delivered into the hands of the wicked, and crucified and slew.
24 २४ त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
But Aloha raised him, and loosed the bands of Shiul, because it was not possible that he should be holden in Shiul.
25 २५ दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे.
For David said concerning him, I have foreseen my Lord at all time, Who is at my right hand that I should not be moved;
26 २६ म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील.
Wherefore my heart is glad, And my glory rejoiceth: And also my body shall sojourn in hope;
27 २७ कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. (Hadēs g86)
For thou wilt not leave my soul in Shiul, Nor give thy Saint to see corruption. (Hadēs g86)
28 २८ जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’”
Thou wilt reveal to me the way of life, Thou wilt fill me with joy with thy presence.
29 २९ “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.
Men, brethren, suffer me to speak openly with you concerning the chief-father David, that he is dead and also buried, and his sepulchre is with us till this day.
30 ३० तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन.
For he was a prophet, and knew that the oath Aloha had sworn to him, Of the fruit of thy loins I will cause to sit upon thy throne:
31 ३१ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. (Hadēs g86)
And he foresaw and spake concerning, the resurrection of the Meshiha, that He would not be left in Shiul, nor would his body see corruption. (Hadēs g86)
32 ३२ त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
This Jeshu hath Aloha raised, and we all are his witnesses.
33 ३३ म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
And he it is who at the right hand of Aloha is exalted, and hath received of the Father the promise of the Holy Spirit, and hath shed forth this gift, which, behold, you see and you hear.
34 ३४ कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
For David hath not ascended into heaven, because he himself hath said, The Lord said unto my Lord, Sit thou at my right hand
35 ३५ मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’”
Until I place thine adversaries the stool of thy feet.
36 ३६ “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”
Assuredly, then, let all the house of Israel know, that Lord and Meshiha hath Aloha made this Jeshu, whom you crucified.
37 ३७ हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”
AND when they heard, they were pierced in their heart, and said to Shemun and to the rest of the apostles, What shall we do, brethren?
38 ३८ पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Shemun saith to them, Repent, and be baptized, every man of you, in the name of the Lord Jeshu, for the remission of sins, and you shall receive the gift of the Holy Spirit.
39 ३९ कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”
For to you is the promise, and to your children, and to all them who are afar off, whom Aloha himself shall call.
40 ४० आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”
And with many other words he testified to them and entreated of them, saying, Save (yourselves) from this perverse generation.
41 ४१ तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली.
And some of them eagerly received his word and believed and were baptized, and there were added in that day as three thousand souls.
42 ४२ ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
And they were faithful in the doctrine of the apostles, and participated in prayer and in the breaking of the eucharist.
43 ४३ तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.
And solemnity was on every soul; and many signs and mighty acts were done by the hand of the apostles in Urishlem.
44 ४४ तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते,
And all those who believed were together, and every thing they had was in common.
45 ४५ ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.
And they who had property sold it, and divided to each according to that which he needed.
46 ४६ ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
And every day they continued in the temple with one soul, and in the house they brake the bread, and took their food rejoicing and in the cleanness of their hearts,
47 ४७ सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.
praising Aloha, (and) given (to be) in favour before all the people. And our Lord added daily them who were saved into the church.

< प्रेषि. 2 >