< २ करि. 1 >

1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
Pāvils, caur Dieva prātu Jēzus Kristus apustulis, un Timotejs tas brālis, Dieva draudzei, kas ir Korintū, un visiem svētiem pa visu Akaju:
2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Žēlastība lai ir jums un miers no Dieva, mūsu Tēva, un no Tā Kunga Jēzus Kristus.
3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
Slavēts lai ir Dievs un mūsu Kunga Jēzus Kristus Tēvs, Tas apžēlošanas Tēvs un visas iepriecināšanas Dievs, kas mūs iepriecina visās mūsu bēdās,
4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
Ka mēs tos, kas ir visādās bēdās, varam iepriecināt ar to iepriecināšanu, ar ko mēs paši no Dieva topam iepriecināti.
5 कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
Jo, ka Kristus ciešanas pie mums vairojās, tāpat arī mūsu iepriecināšana caur Kristu vairojās.
6 आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
Bet kad mēs topam apbēdināti, taču tas jums ir par iepriecināšanu un pestīšanu, kas spēcīga rādās to pašu bēdu paciešanā, ko arī mēs ciešam. Vai, kad mēs topam iepriecināti, tad tas jums ir par iepriecināšanu un pestīšanu. Un mūsu cerība par jums ir stipra.
7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
To zinām, ka itin kā jums ir daļa pie ciešanas, tāpat arī pie iepriecināšanas.
8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
Jo negribam jums slēpt, brāļi, savas bēdas, kas mums notikušas Āzijā, ka mēs pārlieku bijām apgrūtināti, vairāk nekā mēs spējām, tā ka jau vairs necerējām dzīvot.
9 खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
Bet mēs paši pie sevis nopratām, ka mums bija jāmirst, lai nepaļaujamies uz sevi pašiem, bet uz Dievu, kas miroņus uzmodina;
10 १० त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
Tas mūs no tādas nāves ir izrāvis un izrauj; uz Viņu ceram, ka Tas mūs arī vēl izraus.
11 ११ तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
Arī caur jūsu piepalīdzību ar lūgšanām par mums, lai par to mums notikušo žēlastību arī notiek no daudz ļaudīm daudz pateikšanas par mums.
12 १२ आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
Jo šī ir mūsu slava, mūsu zināmas sirds liecība, ka mēs iekš vientiesības un Dieva skaidrības, ne iekš miesīgas gudrības, bet iekš Dieva žēlastības esam turējušies pasaulē un visvairāk pret jums.
13 १३ कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
Jo mēs cita nekā jums nerakstām, kā vien, ko jūs lasāt, jeb arī saprotat; un es ceru, ka jūs arī pavisam sapratīsiet:
14 १४ त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
Tā kā jūs kaut cik mūs jau esat sapratuši, ka mēs esam jūsu gods, itin kā arī jūs esat mūsu gods Tā Kunga Jēzus dienā.
15 १५ आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
Un tādā uzticībā es jau papriekš gribēju pie jums nākt, ka jūs atkal dabūtu kādu žēlastību,
16 १६ मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
Un caur jums iet uz Maķedoniju un atkal no Maķedonijas nākt pie jums, un no jums pavadīts tapt uz Jūdu zemi.
17 १७ असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
Vai tad nu to apņemdamies neapdomīgi esmu darījis? Jeb vai pēc miesas prāta to apņemos, ko apņemos, ka pie manis būtu „jā jā“arī „nē nē“?
18 १८ पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
Bet Dievs ir uzticīgs, ka mūsu vārdi uz jums nav bijuši jā un nē.
19 १९ कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
Jo Dieva Dēls, Jēzus Kristus, kas jūsu starpā caur mums ir sludināts, caur mani un Silvanu un Timoteju, nebija jā un nē, bet jā ir bijis iekš Viņa;
20 २० कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
Jo cik ir Dieva apsolīšanu, tās ir iekš Viņa jā un iekš Viņa Āmen, Dievam par godu caur mums.
21 २१ आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
Bet Tas, kas mūs un jūs stiprina iekš Kristus, un kas mūs ir svaidījis, Tas ir Dievs;
22 २२ तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
Tas mūs arī ir apzieģelējis un devis Tā Gara ķīlu mūsu sirdīs.
23 २३ मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
Bet es Dievu piesaucu par liecinieku savai dvēselei, ka es tādēļ vien vēl neesmu nācis uz Korintu, ka es jūs saudzētu.
24 २४ आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.
Ne tā kā mēs valdām par jūsu ticību, bet mēs esam jūsu prieka palīgi; jo jūs stāvat ticībā.

< २ करि. 1 >