< १ तीम. 2 >

1 तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
Exhorto, pues, ante todo, a que se hagan peticiones, oraciones, súplicas y acciones de gracias por todos los hombres,
2 आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
por los reyes y por todos los que están en autoridad, para que llevemos una vida tranquila y sosegada en toda piedad y reverencia.
3 कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
Porque esto es bueno y agradable a los ojos de Dios, nuestro Salvador,
4 त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
que desea que todos los hombres se salven y lleguen al pleno conocimiento de la verdad.
5 कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
Porque hay un solo Dios y un solo mediador entre Dios y los hombres, el hombre Cristo Jesús,
6 त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
que se entregó a sí mismo en rescate por todos, el testimonio a su debido tiempo,
7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
para el cual fui designado predicador y apóstol — digo la verdad en Cristo, no miento —, maestro de los gentiles en la fe y la verdad.
8 म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
Deseo, pues, que los hombres oren en todo lugar, levantando las manos santas, sin ira ni duda.
9 त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
De la misma manera, que también las mujeres se adornen con ropa decente, con modestia y propiedad, no con cabellos trenzados, oro, perlas o ropa costosa,
10 १० तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
sino con buenas obras, lo cual es apropiado para las mujeres que profesan la piedad.
11 ११ स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.
Que la mujer aprenda en tranquilidad con plena sumisión.
12 १२ मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे.
Pero no permito que la mujer enseñe, ni que ejerza autoridad sobre el hombre, sino que esté en quietud.
13 १३ कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा.
Porque primero fue formado Adán y luego Eva.
14 १४ आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
Adán no fue engañado, pero la mujer, siendo engañada, ha caído en la desobediencia;
15 १५ तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
pero se salvará por medio de sus hijos, si continúan en la fe, el amor y la santidad con sobriedad.

< १ तीम. 2 >