< १ करि. 13 >

1 मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
If I speak with the tongues of men and of angels, but have not love, I am become sounding brass, or a clanging cymbal.
2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
And if I have [the gift of] prophecy, and know all mysteries and all knowledge; and if I have all faith, so as to remove mountains, but have not love, I am nothing.
3 आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
And if I bestow all my goods to feed [the poor], and if I give my body to be burned, but have not love, it profiteth me nothing.
4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
Love suffereth long, [and] is kind; love envieth not; love vaunteth not itself, is not puffed up,
5 प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.
doth not behave itself unseemly, seeketh not its own, is not provoked, taketh not account of evil;
6 प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.
rejoiceth not in unrighteousness, but rejoiceth with the truth;
7 प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
beareth all things, believeth all things, hopeth all things, endureth all things.
8 प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;
Love never faileth: but whether [there be] prophecies, they shall be done away; whether [there be] tongues, they shall cease; whether [there be] knowledge, it shall be done away.
9 कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.
For we know in part, and we prophesy in part;
10 १० पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.
but when that which is perfect is come, that which is in part shall be done away.
11 ११ जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
When I was a child, I spake as a child, I felt as a child, I thought as a child: now that I am become a man, I have put away childish things.
12 १२ आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,
For now we see in a mirror, darkly; but then face to face: now I know in part; but then shall I know fully even as also I was fully known.
13 १३ सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
But now abideth faith, hope, love, these three; and the greatest of these is love.

< १ करि. 13 >