< 1 इतिहास 2 >

1 ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
इस्राएल के ये पुत्र हुए; रूबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साकार, जबूलून,
2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
दान, यूसुफ, बिन्यामीन, नप्ताली, गाद और आशेर।
3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
यहूदा के ये पुत्र हुए एर, ओनान और शेला, उसके ये तीनों पुत्र, शूआ नामक एक कनानी स्त्री की बेटी से उत्पन्न हुए। और यहूदा का जेठा एर, यहोवा की दृष्टि में बुरा था, इस कारण उसने उसको मार डाला।
4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
यहूदा की बहू तामार से पेरेस और जेरह उत्पन्न हुए। यहूदा के कुल पाँच पुत्र हुए।
5 हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
पेरेस के पुत्र: हेस्रोन और हामूल।
6 जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
और जेरह के पुत्र: जिम्री, एतान, हेमान, कलकोल और दारा सब मिलकर पाँच पुत्र हुए।
7 जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
फिर कर्मी का पुत्र: आकार जो अर्पण की हुई वस्तु के विषय में विश्वासघात करके इस्राएलियों को कष्ट देनेवाला हुआ।
8 एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
और एतान का पुत्र: अजर्याह।
9 यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
हेस्रोन के जो पुत्र उत्पन्न हुए यरहमेल, राम और कलूबै।
10 १० अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
१०और राम से अम्मीनादाब और अम्मीनादाब से नहशोन उत्पन्न हुआ जो यहूदा वंशियों का प्रधान बना।
11 ११ नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
११और नहशोन से सल्मा और सल्मा से बोअज;
12 १२ बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
१२और बोअज से ओबेद और ओबेद से यिशै उत्पन्न हुआ।
13 १३ इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
१३और यिशै से उसका जेठा एलीआब और दूसरा अबीनादाब तीसरा शिमा,
14 १४ चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
१४चौथा नतनेल और पाँचवाँ रद्दैं।
15 १५ सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
१५छठा ओसेम और सातवाँ दाऊद उत्पन्न हुआ।
16 १६ सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
१६इनकी बहनें सरूयाह और अबीगैल थीं। और सरूयाह के पुत्र अबीशै, योआब और असाहेल ये तीन थे।
17 १७ अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
१७और अबीगैल से अमासा उत्पन्न हुआ, और अमासा का पिता इश्माएली येतेर था।
18 १८ हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
१८हेस्रोन के पुत्र कालेब के अजूबा नामक एक स्त्री से, और यरीओत से बेटे उत्पन्न हुए; और इसके पुत्र ये हुए; अर्थात् येशेर, शोबाब और अर्दोन।
19 १९ अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
१९जब अजूबा मर गई, तब कालेब ने एप्राता को ब्याह लिया; और जिससे हूर उत्पन्न हुआ।
20 २० हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
२०और हूर से ऊरी और ऊरी से बसलेल उत्पन्न हुआ।
21 २१ नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
२१इसके बाद हेस्रोन गिलाद के पिता माकीर की बेटी के पास गया, जिसे उसने तब ब्याह लिया, जब वह साठ वर्ष का था; और उससे सगूब उत्पन्न हुआ।
22 २२ सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
२२और सगूब से याईर जन्मा, जिसके गिलाद देश में तेईस नगर थे।
23 २३ पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
२३और गशूर और अराम ने याईर की बस्तियों को और गाँवों समेत कनात को, उनसे ले लिया; ये सब नगर मिलकर साठ थे। ये सब गिलाद के पिता माकीर के पुत्र थे।
24 २४ हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
२४और जब हेस्रोन कालेब एप्राता में मर गया, तब उसकी अबिय्याह नामक स्त्री से अशहूर उत्पन्न हुआ जो तकोआ का पिता हुआ।
25 २५ यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
२५और हेस्रोन के जेठे यरहमेल के ये पुत्र हुए अर्थात् राम जो उसका जेठा था; और बूना, ओरेन, ओसेम और अहिय्याह।
26 २६ यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
२६और यरहमेल की एक और पत्नी थी, जिसका नाम अतारा था; वह ओनाम की माता थी।
27 २७ यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
२७और यरहमेल के जेठे राम के ये पुत्र हुए, अर्थात् मास, यामीन और एकेर।
28 २८ शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
२८और ओनाम के पुत्र शम्मै और यादा हुए। और शम्मै के पुत्र नादाब और अबीशूर हुए।
29 २९ अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
२९और अबीशूर की पत्नी का नाम अबीहैल था, और उससे अहबान और मोलीद उत्पन्न हुए।
30 ३० सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
३०और नादाब के पुत्र सेलेद और अप्पैम हुए; सेलेद तो निःसन्तान मर गया और अप्पैम का पुत्र यिशी
31 ३१ अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
३१और यिशी का पुत्र शेशान और शेशान का पुत्र: अहलै।
32 ३२ शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.
३२फिर शम्मै के भाई यादा के पुत्र: येतेर और योनातान हुए; येतेर तो निःसन्तान मर गया।
33 ३३ पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
३३योनातान के पुत्र पेलेत और जाजा; यरहमेल के पुत्र ये हुए।
34 ३४ शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
३४शेशान के तो बेटा न हुआ, केवल बेटियाँ हुईं। शेशान के पास यर्हा नामक एक मिस्री दास था।
35 ३५ शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
३५और शेशान ने उसको अपनी बेटी ब्याह दी, और उससे अत्तै उत्पन्न हुआ।
36 ३६ अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
३६और अत्तै से नातान, नातान से जाबाद,
37 ३७ जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
३७जाबाद से एपलाल, एपलाल से ओबेद,
38 ३८ ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
३८ओबेद से येहू, येहू से अजर्याह,
39 ३९ अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
३९अजर्याह से हेलेस, हेलेस से एलासा,
40 ४० एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
४०एलासा से सिस्मै, सिस्मै से शल्लूम,
41 ४१ शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
४१शल्लूम से यकम्याह और यकम्याह से एलीशामा उत्पन्न हुए।
42 ४२ यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
४२फिर यरहमेल के भाई कालेब के ये पुत्र हुए अर्थात् उसका जेठा मेशा जो जीप का पिता हुआ। और मारेशा का पुत्र हेब्रोन भी उसी के वंश में हुआ।
43 ४३ कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
४३और हेब्रोन के पुत्र कोरह, तप्पूह, रेकेम और शेमा।
44 ४४ शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.
४४और शेमा से योर्काम का पिता रहम और रेकेम से शम्मै उत्पन्न हुआ था।
45 ४५ शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
४५और शम्मै का पुत्र माओन हुआ; और माओन बेतसूर का पिता हुआ।
46 ४६ कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
४६फिर एपा जो कालेब की रखैल थी, उससे हारान, मोसा और गाजेज उत्पन्न हुए; और हारान से गाजेज उत्पन्न हुआ।
47 ४७ रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
४७फिर याहदै के पुत्र रेगेम, योताम, गेशान, पेलेत, एपा और शाप।
48 ४८ माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
४८और माका जो कालेब की रखैल थी, उससे शेबेर और तिर्हाना उत्पन्न हुए।
49 ४९ तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
४९फिर उससे मदमन्ना का पिता शाप और मकबेना और गिबा का पिता शवा उत्पन्न हुए। और कालेब की बेटी अकसा थी।
50 ५० ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
५०कालेब के वंश में ये हुए। एप्राता के जेठे हूर का पुत्र: किर्यत्यारीम का पिता शोबाल,
51 ५१ बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
५१बैतलहम का पिता सल्मा और बेतगादेर का पिता हारेप।
52 ५२ किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
५२और किर्यत्यारीम के पिता शोबाल के वंश में हारोए आधे मनुहोतवासी,
53 ५३ आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
५३और किर्यत्यारीम के कुल अर्थात् येतेरी, पूती, शूमाती और मिश्राई और इनसे सोराई और एश्ताओली निकले।
54 ५४ सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
५४फिर सल्मा के वंश में बैतलहम और नतोपाई, अत्रोतबेत्योआब और आधे मानहती, सोरी।
55 ५५ शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.
५५याबेस में रहनेवाले लेखकों के कुल अर्थात् तिराती, शिमाती और सूकाती हुए। ये रेकाब के घराने के मूलपुरुष हम्मत के वंशवाले केनी हैं।

< 1 इतिहास 2 >