< I Regum 16 >

1 factus est autem sermo Domini ad Hieu filium Anani contra Baasa dicens
यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
2 pro eo quod exaltavi te de pulvere et posui ducem super populum meum Israhel tu autem ambulasti in via Hieroboam et peccare fecisti populum meum Israhel ut me inritares in peccatis eorum
“तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
3 ecce ego demetam posteriora Baasa et posteriora domus eius et faciam domum tuam sicut domum Hieroboam filii Nabath
तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
4 qui mortuus fuerit de Baasa in civitate comedent eum canes et qui mortuus fuerit ex eo in regione comedent eum volucres caeli
बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
5 reliqua autem sermonum Baasa et quaecumque fecit et proelia eius nonne haec scripta sunt in libro verborum dierum regum Israhel
इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.
6 dormivit ergo Baasa cum patribus suis sepultusque est in Thersa et regnavit Hela filius eius pro eo
बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला.
7 cum autem in manu Hieu filii Anani prophetae verbum Domini factum esset contra Baasa et contra domum eius et contra omne malum quod fecerat coram Domino ad inritandum eum in operibus manuum suarum ut fieret sicut domus Hieroboam ob hanc causam occidit eum
तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.
8 anno vicesimo sexto Asa regis Iuda regnavit Hela filius Baasa super Israhel in Thersa duobus annis
यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.
9 et rebellavit contra eum servus suus Zamri dux mediae partis equitum erat autem Hela in Thersa bibens et temulentus in domo Arsa praefecti Thersa
जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
10 inruens ergo Zamri percussit et occidit eum anno vicesimo septimo Asa regis Iuda et regnavit pro eo
१०जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला.
11 cumque regnasset et sedisset super solium eius percussit omnem domum Baasa et non dereliquit ex eo mingentem ad parietem et propinquos et amicos eius
११जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
12 delevitque Zamri omnem domum Baasa iuxta verbum Domini quod locutus fuerat ad Baasa in manu Hieu prophetae
१२बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला
13 propter universa peccata Baasa et peccata Hela filii eius qui peccaverunt et peccare fecerunt Israhel provocantes Dominum Deum Israhel in vanitatibus suis
१३बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
14 reliqua autem sermonum Hela et omnia quae fecit nonne haec scripta sunt in libro verborum dierum regum Israhel
१४इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
15 anno vicesimo et septimo Asa regis Iuda regnavit Zamri septem diebus in Thersa porro exercitus obsidebat Gebbethon urbem Philisthinorum
१५आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
16 cumque audisset rebellasse Zamri et occidisse regem fecit sibi regem omnis Israhel Amri qui erat princeps militiae super Israhel in die illa in castris
१६जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
17 ascendit ergo Amri et omnis Israhel cum eo de Gebbethon et obsidebant Thersa
१७तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
18 videns autem Zamri quod expugnanda esset civitas ingressus est palatium et succendit secum domum regiam et mortuus est
१८नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
19 in peccatis suis quae peccaverat faciens malum coram Domino et ambulans in via Hieroboam et in peccato eius quo fecit peccare Israhel
१९आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
20 reliqua autem sermonum Zamri et insidiarum eius et tyrannidis nonne haec scripta sunt in libro verborum dierum regum Israhel
२०इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
21 tunc divisus est populus Israhel in duas partes media pars populi sequebatur Thebni filium Gineth ut constitueret eum regem et media pars Amri
२१इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
22 praevaluit autem populus qui erat cum Amri populo qui sequebatur Thebni filium Gineth mortuusque est Thebni et regnavit Amri
२२तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
23 anno tricesimo primo Asa regis Iuda regnavit Amri super Israhel duodecim annis in Thersa regnavit sex annis
२३यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
24 emitque montem Samariae a Somer duobus talentis argenti et aedificavit eam et vocavit nomen civitatis quam extruxerat nomine Somer domini montis Samariae
२४त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
25 fecit autem Amri malum in conspectu Domini et operatus est nequiter super omnes qui fuerant ante eum
२५अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
26 ambulavitque in omni via Hieroboam filii Nabath et in peccatis eius quibus peccare fecerat Israhel ut inritaret Dominum Deum Israhel in vanitatibus suis
२६नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
27 reliqua autem sermonum Amri et proelia eius quae gessit nonne haec scripta sunt in libro verborum dierum regum Israhel
२७अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
28 et dormivit Amri cum patribus suis et sepultus est in Samaria regnavitque Ahab filius eius pro eo
२८अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
29 Ahab vero filius Amri regnavit super Israhel anno tricesimo octavo Asa regis Iuda et regnavit Ahab filius Amri super Israhel in Samaria viginti et duobus annis
२९यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
30 et fecit Ahab filius Amri malum in conspectu Domini super omnes qui fuerunt ante eum
३०परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
31 nec suffecit ei ut ambularet in peccatis Hieroboam filii Nabath insuper duxit uxorem Hiezabel filiam Ethbaal regis Sidoniorum et abiit et servivit Baal et adoravit eum
३१नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
32 et posuit aram Baal in templo Baal quod aedificaverat in Samaria
३२शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
33 et plantavit lucum et addidit Ahab in opere suo inritans Dominum Deum Israhel super omnes reges Israhel qui fuerant ante eum
३३अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
34 in diebus eius aedificavit Ahiel de Bethel Hiericho in Abiram primitivo suo fundavit eam et in Segub novissimo suo posuit portas eius iuxta verbum Domini quod locutus fuerat in manu Iosue filii Nun
३४याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.

< I Regum 16 >