< I Paralipomenon 2 >

1 filii autem Israhel Ruben Symeon Levi Iuda Isachar et Zabulon
ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
2 Dan Ioseph Beniamin Nepthali Gad Aser
दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
3 filii Iuda Her Aunan Sela tres nati sunt ei de filia Sue Chananitidis fuit autem Her primogenitus Iuda malus coram Domino et occidit eum
एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
4 Thamar autem nurus eius peperit ei Phares et Zara omnes ergo filii Iuda quinque
यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
5 filii autem Phares Esrom et Hamul
हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
6 filii quoque Zarae Zamri et Ethan et Eman Chalchal quoque et Darda simul quinque
जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
7 filii Carmi Achar qui turbavit Israhel et peccavit in furto anathematis
जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
8 filii Ethan Azarias
एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
9 filii autem Esrom qui nati sunt ei Ieremahel et Ram et Chalubi
यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
10 porro Ram genuit Aminadab Aminadab autem genuit Naasson principem filiorum Iuda
१०अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
11 Naasson quoque genuit Salma de quo ortus est Boez
११नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
12 Boez vero genuit Obed qui et ipse genuit Isai
१२बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
13 Isai autem genuit primogenitum Heliab secundum Abinadab tertium Samaa
१३इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
14 quartum Nathanahel quintum Raddai
१४चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
15 sextum Asom septimum David
१५सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
16 quorum sorores fuerunt Sarvia et Abigail filii Sarviae Abisai Ioab et Asahel tres
१६सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
17 Abigail autem genuit Amasa cuius pater fuit Iether Ismahelites
१७अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
18 Chaleb vero filius Esrom accepit uxorem nomine Azuba de qua genuit Ierioth fueruntque filii eius Iesar et Sobab et Ardon
१८हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
19 cumque mortua fuisset Azuba accepit uxorem Chaleb Ephrath quae peperit ei Ur
१९अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
20 porro Ur genuit Uri et Uri genuit Beselehel
२०हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
21 post haec ingressus est Esrom ad filiam Machir patris Galaad et accepit eam cum esset annorum sexaginta quae peperit ei Segub
२१नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
22 sed et Segub genuit Iair et possedit viginti tres civitates in terra Galaad
२२सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
23 cepitque Gessur et Aram oppida Iair et Canath et viculos eius sexaginta civitatum omnes isti filii Machir patris Galaad
२३पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
24 cum autem mortuus esset Esrom ingressus est Chaleb ad Ephrata habuit quoque Esrom uxorem Abia quae peperit ei Assur patrem Thecue
२४हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
25 nati sunt autem filii Hieramehel primogeniti Esrom Ram primogenitus eius et Buna et Aran et Asom et Ahia
२५यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
26 duxit quoque uxorem alteram Hieramehel nomine Atara quae fuit mater Onam
२६यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
27 sed et filii Ram primogeniti Hieramehel fuerunt Moos et Iamin et Achar
२७यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
28 Onam autem habuit filios Semmei et Iada filii autem Semmei Nadab et Abisur
२८शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
29 nomen vero uxoris Abisur Abiail quae peperit Ahobban et Molid
२९अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
30 filii autem Nadab fuerunt Saled et Apphaim mortuus est autem Saled absque liberis
३०सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
31 filius vero Apphaim Iesi qui Iesi genuit Sesan porro Sesan genuit Oholi
३१अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
32 filii autem Iada fratris Semmei Iether et Ionathan sed et Iether mortuus est absque liberis
३२शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.
33 porro Ionathan genuit Phaleth et Ziza isti fuerunt filii Hieramehel
३३पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
34 Sesan autem non habuit filios sed filias et servum aegyptium nomine Ieraa
३४शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
35 deditque ei filiam suam uxorem quae peperit ei Eththei
३५शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
36 Eththei autem genuit Nathan et Nathan genuit Zabad
३६अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
37 Zabad quoque genuit Ophlal et Ophlal genuit Obed
३७जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
38 Obed genuit Ieu Ieu genuit Azariam
३८ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
39 Azarias genuit Helles Helles genuit Elasa
३९अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
40 Elasa genuit Sisamoi Sisamoi genuit Sellum
४०एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
41 Sellum genuit Icamian Icamian genuit Elisama
४१शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
42 filii autem Chaleb fratris Hieramehel Mosa primogenitus eius ipse est pater Ziph et filii Maresa patris Hebron
४२यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
43 porro filii Hebron Core et Thapphu et Recem et Samma
४३कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
44 Samma autem genuit Raam patrem Iercaam et Recem genuit Semmei
४४शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.
45 filius Semmei Maon et Maon pater Bethsur
४५शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
46 Epha autem concubina Chaleb peperit Arran et Musa et Gezez porro Arran genuit Gezez
४६कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
47 filii Iadai Regom et Iotham et Gesum et Phaleth et Epha et Saaph
४७रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
48 concubina Chaleb Maacha peperit Saber et Tharana
४८माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
49 genuit autem Saaph pater Madmena Sue patrem Machbena et patrem Gabaa filia vero Chaleb fuit Achsa
४९तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
50 hii erant filii Chaleb filii Ur primogeniti Ephrata Sobal pater Cariathiarim
५०ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
51 Salma pater Bethleem Ariph pater Bethgader
५१बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
52 fuerunt autem filii Sobal patris Cariathiarim qui videbat dimidium requietionum
५२किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
53 et de cognatione Cariathiarim Iethrei et Apphutei et Semathei et Maserei ex his egressi sunt Saraitae et Esthaolitae
५३आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
54 filii Salma Bethleem et Netophathi coronae domus Ioab et dimidium requietionis Sarai
५४सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
55 cognationes quoque scribarum habitantium in Iabis canentes atque resonantes et in tabernaculis commorantes hii sunt Cinei qui venerunt de calore patris domus Rechab
५५शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.

< I Paralipomenon 2 >