< 詩篇 21 >

1 聖歌隊の指揮者によってうたわせたダビデの歌 主よ、王はあなたの力によって喜び、あなたの助けによって、いかに大きな喜びをもつことでしょう。
मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!
2 あなたは彼の心の願いをゆるし、そのくちびるの求めをいなまれなかった。 (セラ)
त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस. आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.
3 あなたは大いなる恵みをもって彼を迎え、そのかしらに純金の冠をいただかせられる。
कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.
4 彼がいのちを求めると、あなたはそれを彼にさずけ、世々限りなくそのよわいを長くされた。
त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
5 あなたの助けによって彼の栄光は大きい。あなたは誉と威厳とを彼に与えられる。
तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
6 まことに、あなたは彼をとこしえに恵まれた者とし、み前に喜びをもって楽しませられる。
कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
7 王は主に信頼するゆえ、いと高き者のいつくしみをこうむって、動かされることはない。
कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.
8 あなたの手はもろもろの敵を尋ね出し、あなたの右の手はあなたを憎む者を尋ね出すであろう。
तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
9 あなたが怒る時、彼らを燃える炉のようにするであろう。主はみ怒りによって彼らをのみつくされる。火は彼らを食いつくすであろう。
तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.
10 あなたは彼らのすえを地から断ち、彼らの種を人の子らの中から滅ぼすであろう。
१०तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.
11 たとい彼らがあなたにむかって悪い事を企て、悪いはかりごとを思いめぐらしても、なし遂げることはできない。
११कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
12 あなたは彼らを逃げ走らせ、あなたの弓弦を張って、彼らの顔をねらうであろう。
१२कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.
13 主よ、力をあらわして、みずからを高くしてください。われらはあなたの大能をうたい、かつほめたたえるでしょう。
१३परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.

< 詩篇 21 >