< 詩篇 102 >

1 苦しむ者が思いくずおれてその嘆きを主のみ前に注ぎ出すときの祈 主よ、わたしの祈をお聞きください。わたしの叫びをみ前に至らせてください。
परमेश्वराजवळ प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
2 わたしの悩みの日にみ顔を隠すことなく、あなたの耳をわたしに傾け、わが呼ばわる日に、すみやかにお答えください。
मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
3 わたしの日は煙のように消え、わたしの骨は炉のように燃えるからです。
कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
4 わたしの心は草のように撃たれて、しおれました。わたしはパンを食べることを忘れました。
माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
5 わが嘆きの声によってわたしの骨はわたしの肉に着きます。
माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.
6 わたしは荒野のはげたかのごとく、荒れた跡のふくろうのようです。
मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
7 わたしは眠らずに屋根にひとりいるすずめのようです。
मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
8 わたしの敵はひねもす、わたしをそしり、わたしをあざける者はわが名によってのろいます。
माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
9 わたしは灰をパンのように食べ、わたしの飲み物に涙を交えました。
मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
10 これはあなたの憤りと怒りのゆえです。あなたはわたしをもたげて投げすてられました。
१०कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
11 わたしのよわいは夕暮の日影のようです。わたしは草のようにしおれました。
११माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
12 しかし主よ、あなたはとこしえにみくらに座し、そのみ名はよろず代に及びます。
१२पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
13 あなたは立ってシオンをあわれまれるでしょう。これはシオンを恵まれる時であり、定まった時が来たからです。
१३तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे.
14 あなたのしもべはシオンの石をも喜び、そのちりをさえあわれむのです。
१४कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
15 もろもろの国民は主のみ名を恐れ、地のもろもろの王はあなたの栄光を恐れるでしょう。
१५हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
16 主はシオンを築き、その栄光をもって現れ、
१६परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
17 乏しい者の祈をかえりみ、彼らの願いをかろしめられないからです。
१७आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
18 きたるべき代のために、この事を書きしるしましょう。そうすれば新しく造られる民は、主をほめたたえるでしょう。
१८पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
19 主はその聖なる高き所から見おろし、天から地を見られた。
१९कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
20 これは捕われ人の嘆きを聞き、死に定められた者を解き放ち、
२०तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
21 人々がシオンで主のみ名をあらわし、エルサレムでその誉をあらわすためです。
२१नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.
22 その時もろもろの民、もろもろの国はともに集まって、主に仕えるでしょう。
२२जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
23 主はわたしの力を中途でくじき、わたしのよわいを短くされました。
२३त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले.
24 わたしは言いました、「わが神よ、どうか、わたしのよわいの半ばでわたしを取り去らないでください。あなたのよわいはよろず代に及びます」と。
२४मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
25 あなたはいにしえ、地の基をすえられました。天もまたあなたのみ手のわざです。
२५तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
26 これらは滅びるでしょう。しかしあなたは長らえられます。これらはみな衣のように古びるでしょう。あなたがこれらを上着のように替えられると、これらは過ぎ去ります。
२६ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
27 しかしあなたは変ることなく、あなたのよわいは終ることがありません。
२७पण तू सारखाच आहे, आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
28 あなたのしもべの子らは安らかに住み、その子孫はあなたの前に堅く立てられるでしょう。
२८तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.”

< 詩篇 102 >