< レビ記 4 >

1 主はまたモーセに言われた、
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 「イスラエルの人々に言いなさい、『もし人があやまって罪を犯し、主のいましめにそむいて、してはならないことの一つをした時は次のようにしなければならない。
इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
3 すなわち、油注がれた祭司が罪を犯して、とがを民に及ぼすならば、彼はその犯した罪のために雄の全き子牛を罪祭として主にささげなければならない。
जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकावंर दोष येईल, असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
4 その子牛を会見の幕屋の入口に連れてきて主の前に至り、その子牛の頭に手を置き、その子牛を主の前で、ほふらなければならない。
त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
5 油注がれた祭司は、その子牛の血を取って、それを会見の幕屋に携え入り、
मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे.
6 そして祭司は指をその血に浸して、聖所の垂幕の前で主の前にその血を七たび注がなければならない。
याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
7 祭司はまたその血を取り、主の前で会見の幕屋の中にある香ばしい薫香の祭壇の角に、それを塗らなければならない。その子牛の血の残りはことごとく会見の幕屋の入口にある燔祭の祭壇のもとに注がなければならない。
मग याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
8 またその罪祭の子牛から、すべての脂肪を取らなければならない。すなわち内臓をおおう脂肪と内臓の上のすべての脂肪、
आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
9 二つの腎臓とその上の腰のあたりにある脂肪、ならびに腎臓と共に取られる肝臓の上の小葉である。
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
10 これを取るには酬恩祭の犠牲の雄牛から取るのと同じようにしなければならない。そして祭司はそれを燔祭の祭壇の上で焼かなければならない。
१०शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
11 その子牛の皮とそのすべての肉、およびその頭と足と内臓と汚物など、
११गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
12 すべてその子牛の残りは、これを宿営の外の、清い場所なる灰捨場に携え出し、火をもってこれをたきぎの上で焼き捨てなければならない。すなわちこれは灰捨場で焼き捨てらるべきである。
१२अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
13 もしイスラエルの全会衆があやまちを犯し、そのことが会衆の目に隠れていても、主のいましめにそむいて、してはならないことの一つをなして、とがを得たならば、
१३इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
14 その犯した罪が現れた時、会衆は雄の子牛を罪祭としてささげなければならない。すなわちそれを会見の幕屋の前に連れてきて、
१४आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.
15 会衆の長老たちは、主の前でその子牛の頭に手を置き、その子牛を主の前で、ほふらなければならない。
१५मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.
16 そして、油注がれた祭司は、その子牛の血を会見の幕屋に携え入り、
१६नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;
17 祭司は指をその血に浸し、垂幕の前で主の前に七たび注がなければならない。
१७मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
18 またその血を取って、会見の幕屋の中の主の前にある祭壇の角に、それを塗らなければならない。その血の残りはことごとく会見の幕屋の入口にある燔祭の祭壇のもとに注がなければならない。
१८मग त्याने परमेश्वरासमोर दर्शनमंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
19 またそのすべての脂肪を取って祭壇の上で焼かなければならない。
१९त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा.
20 すなわち祭司は罪祭の雄牛にしたように、この雄牛にも、しなければならない。こうして、祭司が彼らのためにあがないをするならば、彼らはゆるされるであろう。
२०पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
21 そして、彼はその雄牛を宿営の外に携え出し、はじめの雄牛を焼き捨てたように、これを焼き捨てなければならない。これは会衆の罪祭である。
२१आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.
22 またつかさたる者が罪を犯し、あやまって、その神、主のいましめにそむき、してはならないことの一つをして、とがを得、
२२एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,
23 もしその犯した罪を知るようになったときは、供え物として雄やぎの全きものを連れてきて、
२३व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा.
24 そのやぎの頭に手を置き、燔祭をほふる場所で、主の前にこれをほふらなければならない。これは罪祭である。
२४त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
25 祭司は指でその罪祭の血を取り、燔祭の祭壇の角にそれを塗り、残りの血は燔祭の祭壇のもとに注がなければならない。
२५मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
26 また、そのすべての脂肪は、酬恩祭の犠牲の脂肪と同じように、祭壇の上で焼かなければならない。こうして、祭司が彼のためにその罪のあがないをするならば、彼はゆるされるであろう。
२६शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.
27 また一般の人がもしあやまって罪を犯し、主のいましめにそむいて、してはならないことの一つをして、とがを得、
२७सामान्य मनुष्यांमधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला;
28 その犯した罪を知るようになったときは、その犯した罪のために供え物として雌やぎの全きものを連れてきて、
२८आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी.
29 その罪祭の頭に手を置き、燔祭をほふる場所で、その罪祭をほふらなければならない。
२९त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
30 そして祭司は指でその血を取り、燔祭の祭壇の角にこれを塗り、残りの血をことごとく祭壇のもとに注がなければならない。
३०मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे.
31 またそのすべての脂肪は酬恩祭の犠牲から脂肪を取るのと同じように取り、これを祭壇の上で焼いて主にささげる香ばしいかおりとしなければならない。こうして祭司が彼のためにあがないをするならば、彼はゆるされるであろう。
३१आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.
32 もし小羊を罪祭のために供え物として連れてくるならば、雌の全きものを連れてこなければならない。
३२त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
33 その罪祭の頭に手を置き、燔祭をほふる場所で、これをほふり、罪祭としなければならない。
३३त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे.
34 そして祭司は指でその罪祭の血を取り、燔祭の祭壇の角にそれを塗り、残りの血はことごとく祭壇のもとに注がなければならない。
३४याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
35 またそのすべての脂肪は酬恩祭の犠牲から小羊の脂肪を取るのと同じように取り、祭司はこれを主にささげる火祭のように祭壇の上で焼かなければならない。こうして祭司が彼の犯した罪のためにあがないをするならば、彼はゆるされるであろう。
३५त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

< レビ記 4 >