< ホセア書 7 >

1 わたしがイスラエルをいやすとき、エフライムの不義と、サマリヤの悪しきわざとは現れる。彼らは偽りをおこない、内では盗びとが押し入り、外では山賊の群れが襲いきたる。
जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.
2 しかし、彼らはわたしが彼らのすべての悪を覚えていることを悟らない。今、そのわざは彼らを囲んで、わたしの顔の前にある。
मी त्यांचे दुराचार आठवतो; याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही, त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे, ते माझ्या मुखासमोर आहे.
3 彼らはその悪をもって王を喜ばせ、その偽りをもって君たちを喜ばせる。
ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.
4 彼らはみな姦淫を行う者で、パンを焼く者が熱くする炉のようだ。パンを焼く者は、ねり粉をこねてから、それがふくれるまで、しばらく、火をおこす事をしないだけだ。
ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भटारी भट्टी पेटवून कनिक भिजवतो; व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत.
5 われわれの王の日に、つかさたちは酒の熱によって病みわずらい、王はあざける者と共に手を伸べた。
राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले; मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला.
6 彼らは陰謀をもってその心を炉のように燃やす。その怒りは夜通しくすぶり、朝になると炎のように燃える。
भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो, आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो.
7 彼らは皆、炉のように熱くなって、そのさばきびとを焼き滅ぼす。そのもろもろの王は皆たおれる。彼らの中にはわたしを呼ぶ者がひとりもない。
ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत, ते आपल्या राज्यकर्त्यांस गिळून टाकतात, त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे, त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही.
8 エフライムはもろもろの民の中に入り混じる。エフライムは火にかけて、かえさない菓子である。
एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
9 他国人らは彼の力を食い尽すが、彼はそれを知らない。しらがが混じってはえても、それを悟らない。
परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे; पण त्यास हे ठाऊक नाही. त्याचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहित नाही.
10 イスラエルの誇は自らに向かって証言している、彼らはこのもろもろの事があっても、なおその神、主に帰らず、また主を求めない。
१०इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो, इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत, हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाही.
11 エフライムは知恵のない愚かな、はとのようだ。彼らはエジプトに向かって呼び求め、またアッスリヤへ行く。
११एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.
12 彼らが行くとき、わたしは彼らの上に網を張って、空の鳥のように引き落し、その悪しきおこないのゆえに、彼らを懲らしめる。
१२जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन, आकाशतल्या पक्षांप्रमाणे मी त्यांना खाली आणिन, लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.
13 わざわいなるかな、彼らはわたしを離れて迷い出た。滅びは彼らに臨む。彼らがわたしに向かって罪を犯したからだ。わたしは彼らをあがなおうと思うが、彼らはわたしに逆らって偽りを言う。
१३हायहाय, त्यांना! कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे. मी त्यांची सुटका केली असती; पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.
14 彼らは真心をもってわたしを呼ばず、ただ床の上で悲しみ叫ぶ。彼らは穀物と酒のためには集まるが、わたしに逆らう。
१४त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात, ते माझ्यापासून बहकले आहेत.
15 わたしは彼らを教え、その腕を強くしたが、彼らはわたしに逆らって、悪しき事をはかる。
१५जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात.
16 彼らはバアルに帰る。彼らはあざむく弓のようだ。彼らの君たちはその舌の高ぶりのために、つるぎに倒れる。これはエジプトの国で人々のあざけりとなる。
१६ते परत फिरतात, पण ते मी जो सर्वोच्च देव आहे, त्याकडे फिरत नाही, ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत, त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मतपणामुळे तलवारीने पाडले जातील, मिसरात त्यांची थट्टा करण्यात येईल.

< ホセア書 7 >