< エゼキエル書 29 >

1 第十年の十月十二日に、主の言葉がわたしに臨んだ、
बाबेलातील बंदिवासाच्या दहाव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 「人の子よ、あなたの顔をエジプトの王パロに向け、彼とエジプト全国に対して預言し、
“मानवाच्या मुला, तू आपले मुख मिसराचा राजा फारो याच्याविरूद्ध कर; त्यांच्याविरुद्ध व सर्व मिसराविरूद्ध भविष्यवाणी सांग
3 語って言え。主なる神はこう言われる、エジプトの王パロよ、見よ、わたしはあなたの敵となる。あなたはその川の中に伏す大いなる龍で、『ナイル川はわたしのもの、わたしがこれを造った』と言う。
व म्हण ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मिसराचा राज फारो, मी तुझ्याविरूद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी, तू मला म्हणतोस, “ही नदी माझी आहे. ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे.”
4 わたしは、かぎをあなたのあごにかけ、あなたの川の魚を、あなたのうろこにつかせ、あなたと、あなたのうろこについているもろもろの魚を、あなたの川から引きあげ、
कारण मी तुझ्या जबड्यात गळ घालीन आणि तुझ्या नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला तुझ्या खवल्यास चिकटलेल्या नद्यांच्या माशांसह नदीतून ओढून बाहेर काढीन.
5 あなたとあなたの川のもろもろの魚を、荒野に投げ捨てる。あなたは野の面に倒れ、あなたを取り集める者も、葬る者もない。わたしはあなたを地の獣と空の鳥のえじきとして与える。
मी तुला आणि तुझ्या नद्यांतली सर्व मासे यांनाही रानात खाली टाकून देईन; तू शेतातल्या उघड्या भूमीवर पडशील; तुला कोणी एकवट करणार नाही किंवा उचलून घेणार नाही. मी तुम्हास भूमीवरच्या पशूंस व आकाशातल्या पक्षांना भक्ष्य असे देईन.
6 そしてエジプトのすべての住民はわたしが主であることを知る。あなたはイスラエルの家に対して葦のつえであった。
मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस कळून येईल की मीच परमेश्वर आहे. कारण ते इस्राएलाच्या घराण्याला बोरूची काठी असे झाले आहेत.
7 彼らがあなたを手にとる時、あなたは折れ、彼らの肩はことごとく裂ける。彼らがまたあなたに寄りかかる時、あなたは破れ、彼らの腰をことごとく震えさせる。
जेव्हा त्यांनी तुला आपल्या हातांनी धरले तेव्हा तुझे टोकदार तुकडे झाले आणि त्यांच्या खांद्यात घुसला. जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तू त्यांचे पाय मोडले आणि त्यांच्या कंबरा खचविण्यास लावल्या.
8 それゆえ、主なる神はこう言われる、見よ、わたしはつるぎをあなたに持ってきて、人と獣とをあなたのうちから断つ。
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुझ्याविरूद्ध तलवार आणिन. मी तुझी सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन.
9 エジプトの地は荒れて、むなしくなる。そして彼はわたしが主であることを知る。あなたは『ナイル川はわたしのもの、わたしがこれを造った』と言っているゆえに、
मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.” कारण तू म्हणालास नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.
10 見よ、わたしはあなたとあなたの川々の敵となって、エジプトの地をミグドルからスエネまで、エチオピヤの境に至るまで、ことごとく荒し、むなしくする。
१०म्हणून पाहा, मी तुझ्याविरूद्ध व तुझ्या नदीच्याविरूद्ध आहे. मग मी मिसर देश उजाड व ओसाड करीन आणि तू मिग्दोलापासून सवेनेपर्यंत व कूशाच्या सीमेपर्यंत टाकाऊ भूमी होशील.
11 人の足はこれを渡らず、獣の足もこれを渡らない。四十年の間、ここに住む者はない。
११मनुष्याचे पाऊल त्यातून जाणार नाही. पशूचा पाय त्यामधून जाणार नाही आणि चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही.
12 わたしはエジプトの地を荒して、荒れた国々の中に置き、その町々は荒れて、四十年のあいだ荒れた町々の中にある。わたしはエジプトびとを、もろもろの国民の中に散らし、もろもろの国の中に散らす。
१२कारण जे देश ओसाड झाले त्यामध्ये मी मिसर देश ओसाड करून ठेवीन आणि जी नगरे उजाड झाली आहेत त्यांच्यामध्ये त्यातली नगरे चाळीस वर्षे ओसाड राहतील; नंतर मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये उधळवीन आणि मी त्यांना देशात पांगवीन.
13 主なる神はこう言われる、四十年の後、わたしはエジプトびとを、その散らされたもろもろの民の中から集める。
१३कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, चाळीस वर्षाच्या शेवटी ज्या लोकांमध्ये मिसरी विखरले होते त्यातून मी त्यांना एकत्र करीन.
14 すなわちエジプトの運命をもとに返し、彼らをその生れた地であるパテロスの地に帰らせる。その所で彼らは卑しい国となる。
१४मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन, मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. मग तेथे त्यांचे हलके राज्य होईल.
15 これはもろもろの国よりも卑しくなり、再びもろもろの国民の上に出ることができない。わたしは彼らを小さくするゆえ、再びもろもろの国民を治めることはない。
१५“ते राज्यामध्ये ते हलके राज्य होईल आणि ते कधीच इतर राष्ट्रांपेक्षा वरचढ होणार नाही. मी त्यांना कमी करीन की ते दुसऱ्या राष्ट्रांवर सत्ता गाजविणार नाही.
16 これはイスラエルが助けを求める時、その罪を思い出して、再びイスラエルの家の頼みとはならない。こうして彼らは、わたしが主なる神であることを知る」。
१६ते यापुढे इस्राएलाच्या घराण्याला विश्वासाचा विषय असे होणार नाहीत. जेव्हा त्यांचे मुख मिसराकडे वळेल तेव्हा त्यांना अन्यायाची आठवण येईल. मग त्यांना समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
17 第二十七年の一月一日に、主の言葉がわたしに臨んだ、
१७मग बाबेलातील बंदिवासाच्या सत्ताविसाव्या वर्षात, पहिल्या महिन्यात, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
18 「人の子よ、バビロンの王ネブカデレザルは、その軍勢をツロに対して大いに働かせた。頭は皆はげ、肩はみな破れた。しかし彼もその軍勢も、ツロに対してなしたその働きのために、なんの報いをも得なかった。
१८“मानवाच्या मुला, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोरविरूद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची सालटी निघाली होती पण त्याने जे कठीण परिश्रम सोरेविरूद्ध केले त्यामुळे त्यास व त्याच्या सैन्याला सोरेतून कधीही काही वेतन मिळाले नाही.”
19 それゆえ、主なる神はこう言われる、見よ、わたしはバビロンの王ネブカデレザルに、エジプトの地を与える。彼はその財宝を取り、物をかすめ、物を奪い、それをその軍勢に与えて報いとする。
१९म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! मिसर देश मी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल, त्यांची मालमत्ता लुटेल व तेथे त्यास जे सापडेल ते घेऊन जाईल. ते त्याच्या सैन्याचे वेतन असे होईल.
20 彼の働いた報酬として、わたしはエジプトの地を彼に与える。彼らはわたしのために、これをしたからであると、主なる神は言われる。
२०त्याने माझ्या जी मेहनत केली त्याचे वेतन म्हणून मी त्यास मिसर देश दिला आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे.” असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे.
21 その日、わたしはイスラエルの家に、一つの角を生じさせ、あなたの口を彼らのうちに開かせる。そして彼らはわたしが主であることを知る」。
२१“त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या घराण्याचे शिंग उगवेल असे करीन आणि त्यांच्यामध्ये तुझे मुख उघडेल असे मी तुला दान देईन. यासाठी की, त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

< エゼキエル書 29 >