< エゼキエル書 18 >

1 主の言葉がわたしに臨んだ、
पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
2 「あなたがたがイスラエルの地について、このことわざを用い、『父たちが、酢いぶどうを食べたので子供たちの歯がうく』というのはどんなわけか。
“वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
3 主なる神は言われる、わたしは生きている、あなたがたは再びイスラエルでこのことわざを用いることはない。
मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
4 見よ、すべての魂はわたしのものである。父の魂も子の魂もわたしのものである。罪を犯した魂は必ず死ぬ。
पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
5 人がもし正しくあって、公道と正義とを行い、
जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
6 山の上で食事をせず、また目をあげてイスラエルの家の偶像を仰がず、隣り人の妻を犯さず、汚れの時にある女に近づかず、
जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
7 だれをもしえたげず、質物を返し、決して奪わず、食物を飢えた者に与え、裸の者に衣服を着せ、
जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
8 利息や高利をとって貸さず、手をひいて悪を行わず、人と人との間に真実のさばきを行い、
त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
9 わたしの定めに歩み、わたしのおきてを忠実に守るならば、彼は正しい人である。彼は必ず生きることができると、主なる神は言われる。
जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
10 しかし彼が子を生み、その子が荒い者で、人の血を流し、これらの義務の一つをも行わず、
१०पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्याने केली,
11 かえって山の上で食事をし、隣り人の妻を犯し、
११त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
12 乏しい者や貧しい者をしえたげ、物を奪い、質物を返さず、目をあげて偶像を仰ぎ、憎むべき事をおこない、
१२त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
13 利息や高利をとって貸すならば、その子は生きるであろうか。彼は生きることはできない。彼はこれらの憎むべき事をしたので、必ず死に、その血は彼自身に帰する。
१३जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
14 しかし彼が子を生み、その子が父の行ったすべての罪を見て、恐れ、そのようなことを行わず、
१४पण पाहा! त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
15 山の上で食事せず、目をあげてイスラエルの家の偶像を仰がず、隣り人の妻を犯さず、
१५जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
16 だれをもしえたげず、質物をひき留めず、物を奪わず、かえって自分の食物を飢えた者に与え、裸の者に衣服を着せ、
१६जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
17 その手をひいて悪を行わず、利息や高利をとらず、わたしのおきてを行い、わたしの定めに歩むならば、彼はその父の悪のために死なず、必ず生きる。
१७गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
18 しかしその父は人をかすめ、その兄弟の物を奪い、その民の中で良くない事を行ったゆえ、見よ、彼はその悪のために死ぬ。
१८त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
19 しかしあなたがたは、『なぜ、子は父の悪を負わないのか』と言う。子は公道と正義とを行い、わたしのすべての定めを守っておこなったので、必ず生きるのである。
१९पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
20 罪を犯す魂は死ぬ。子は父の悪を負わない。父は子の悪を負わない。義人の義はその人に帰し、悪人の悪はその人に帰する。
२०जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
21 しかし、悪人がもしその行ったもろもろの罪を離れ、わたしのすべての定めを守り、公道と正義とを行うならば、彼は必ず生きる。死ぬことはない。
२१पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
22 その犯したもろもろのとがは、彼に対して覚えられない。彼はそのなした正しい事のために生きる。
२२सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
23 主なる神は言われる、わたしは悪人の死を好むであろうか。むしろ彼がそのおこないを離れて生きることを好んでいるではないか。
२३“मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
24 しかし義人がもしその義を離れて悪を行い、悪人のなすもろもろの憎むべき事を行うならば、生きるであろうか。彼が行ったもろもろの正しい事は覚えられない。彼はその犯したとがと、その犯した罪とのために死ぬ。
२४जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
25 しかしあなたがたは、『主のおこないは正しくない』と言う。イスラエルの家よ、聞け。わたしのおこないは正しくないのか。正しくないのは、あなたがたのおこないではないか。
२५पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
26 義人がその義を離れて悪を行い、そのために死ぬならば、彼は自分の行った悪のために死ぬのである。
२६जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
27 しかし悪人がその行った悪を離れて、公道と正義とを行うならば、彼は自分の命を救うことができる。
२७पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
28 彼は省みて、その犯したすべてのとがを離れたのだから必ず生きる。死ぬことはない。
२८कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
29 しかしイスラエルの家は『主のおこないは正しくない』と言う。イスラエルの家よ、わたしのおこないは、はたして正しくないのか。正しくないのは、あなたがたのおこないではないか。
२९पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत: चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
30 それゆえ、イスラエルの家よ、わたしはあなたがたを、おのおのそのおこないに従ってさばくと、主なる神は言われる。悔い改めて、あなたがたのすべてのとがを離れよ。さもないと悪はあなたがたを滅ぼす。
३०तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
31 あなたがたがわたしに対しておこなったすべてのとがを捨て去り、新しい心と、新しい霊とを得よ。イスラエルの家よ、あなたがたはどうして死んでよかろうか。
३१तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
32 わたしは何人との死をも喜ばないのであると、主なる神は言われる。それゆえ、あなたがたは翻って生きよ」。
३२कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”

< エゼキエル書 18 >