< 申命記 34 >

1 モーセはモアブの平野からネボ山に登り、エリコの向かいのピスガの頂へ行った。そこで主は彼にギレアデの全地をダンまで示し、
मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश,
2 ナフタリの全部、エフライムとマナセの地およびユダの全地を西の海まで示し、
नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला.
3 ネゲブと低地、すなわち、しゅろの町エリコの谷をゾアルまで示された。
तसेच नेगेब आणि सोअरापासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हेही दाखवले.
4 そして主は彼に言われた、「わたしがアブラハム、イサク、ヤコブに、これをあなたの子孫に与えると言って誓った地はこれである。わたしはこれをあなたの目に見せるが、あなたはそこへ渡って行くことはできない」。
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.”
5 こうして主のしもべモーセは主の言葉のとおりにモアブの地で死んだ。
मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच.
6 主は彼をベテペオルに対するモアブの地の谷に葬られたが、今日までその墓を知る人はない。
मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही.
7 モーセは死んだ時、百二十歳であったが、目はかすまず、気力は衰えていなかった。
मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती.
8 イスラエルの人々はモアブの平野で三十日の間モーセのために泣いた。そしてモーセのために泣き悲しむ日はついに終った。
इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.
9 ヌンの子ヨシュアは知恵の霊に満ちた人であった。モーセが彼の上に手を置いたからである。イスラエルの人々は彼に聞き従い、主がモーセに命じられたとおりにおこなった。
मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
10 イスラエルには、こののちモーセのような預言者は起らなかった。モーセは主が顔を合わせて知られた者であった。
१०इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.
11 主はエジプトの地で彼をパロとそのすべての家来およびその全地につかわして、もろもろのしるしと不思議を行わせられた。
११मिसर देशामध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसर देशामध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले.
12 モーセはイスラエルのすべての人の前で大いなる力をあらわし、大いなる恐るべき事をおこなった。
१२मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.

< 申命記 34 >