< サムエル記Ⅱ 8 >

1 この後ダビデはペリシテびとを撃って、これを征服した。ダビデはまたペリシテびとの手からメテグ・アンマを取った。
यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.
2 彼はまたモアブを撃ち、彼らを地に伏させ、なわをもって彼らを測った。すなわち二筋のなわをもって殺すべき者を測り、一筋のなわをもって生かしておく者を測った。そしてモアブびとは、ダビデのしもべとなって、みつぎを納めた。
मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.
3 ダビデはまたレホブの子であるゾバの王ハダデゼルが、ユフラテ川のほとりにその勢力を回復しようとして行くところを撃った。
रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला.
4 そしてダビデは彼から騎兵千七百人、歩兵二万人を取った。ダビデはまた一百の戦車の馬を残して、そのほかの戦車の馬はみなその足の筋を切った。
सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले.
5 ダマスコのスリヤびとが、ゾバの王ハダデゼルを助けるためにきたので、ダビデはスリヤびと二万二千人を殺した。
दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले.
6 そしてダビデはダマスコのスリヤに守備隊を置いた。スリヤびとは、ダビデのしもべとなって、みつぎを納めた。主はダビデにすべてその行く所で勝利を与えられた。
मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले.
7 ダビデはハダデゼルのしもべらが持っていた金の盾を奪って、エルサレムに持ってきた。
हद्देजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमेला आणल्या.
8 ダビデ王はまたハダデゼルの町、ベタとベロタイから、ひじょうに多くの青銅を取った。
हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
9 時にハマテの王トイは、ダビデがハダデゼルのすべての軍勢を撃ち破ったことを聞き、
हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.
10 その子ヨラムをダビデ王のもとにつかわして、彼にあいさつし、かつ祝を述べさせた。ハダデゼルはかつてしばしばトイと戦いを交えたが、ダビデがハダデゼルと戦ってこれを撃ち破ったからである。ヨラムが銀の器と金の器と青銅の器を携えてきたので、
१०तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिले. (हद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या.
11 ダビデ王は征服したすべての国民から取ってささげた金銀と共にこれらをも主にささげた。
११दावीदाने त्या स्विकारून परमेश्वरास अर्पण केल्या. या आधीच्या समर्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती.
12 すなわちエドム、モアブ、アンモンの人々、ペリシテびと、アマレクから獲た物、およびゾバの王レホブの子ハダデゼルから獲たぶんどり物と共にこれをささげた。
१२दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबाचा मुलगा, सोबाचा राजा हद्देजर याचा पराभव केला.
13 こうしてダビデは名声を得た。彼は帰ってきてから塩の谷でエドムびと一万八千人を撃ち殺した。
१३क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला.
14 そしてエドムに守備隊を置いた。すなわちエドムの全地に守備隊を置き、エドムびとは皆ダビデのしもべとなった。主はダビデにすべてその行く所で勝利を与えられた。
१४अदोममध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमी लोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
15 こうしてダビデはイスラエルの全地を治め、そのすべての民に正義と公平を行った。
१५दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले.
16 ゼルヤの子ヨアブは軍の長、アヒルデの子ヨシャパテは史官、
१६सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
17 アヒトブの子ザドクとアビヤタルの子アヒメレクは祭司、セラヤは書記官、
१७अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.
18 エホヤダの子ベナヤはケレテびととペレテびとの長、ダビデの子たちは祭司であった。
१८यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री होते.

< サムエル記Ⅱ 8 >