< 歴代誌Ⅱ 26 >

1 そこでユダの民は皆ウジヤをとって王となし、その父アマジヤに代らせた。時に十六歳であった。
अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
2 彼はエラテを建てて、これをふたたびユダのものにした。これはかの王がその先祖たちと共に眠った後であった。
उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
3 ウジヤは王となった時十六歳で、エルサレムで五十二年の間世を治めた。その母はエルサレムの者で名をエコリヤといった。
उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरूशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरूशलेमची होती.
4 ウジヤは父アマジヤがしたように、すべて主の良しと見られることを行った。
उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
5 彼は神を恐れることを自分に教えたゼカリヤの世にある日の間、神を求めることに努めた。彼が主を求めた間、神は彼を栄えさせられた。
जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.
6 彼は出てペリシテびとと戦い、ガテの城壁、ヤブネの城壁およびアシドドの城壁をくずし、アシドドの地とペリシテびとのなかに町を建てた。
उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
7 神は彼を助けてペリシテびとと、グルバアルに住むアラビヤびとおよびメウニびとを攻め撃たせられた。
पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
8 アンモンびとはウジヤにみつぎを納めた。ウジヤは非常に強くなったので、その名はエジプトの入口までも広まった。
अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली.
9 ウジヤはまたエルサレムの隅の門、谷の門および城壁の曲りかどにやぐらを建てて、これを堅固にした。
यरूशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.
10 彼はまた荒野にやぐらを建て、また多くの水ためを掘った。彼は平野にも平地にもたくさんの家畜をもっていたからである。彼はまた農事を好んだので、山々および肥えた畑には農夫とぶどうをつくる者をもっていた。
१०वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखेसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
11 ウジヤはまたよく戦う一軍団を持っていた。彼らは書記エイエルと、つかさマアセヤによって調べた数に従って組々に分れ、皆王の軍長のひとりハナニヤの指揮下にあった。
११उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
12 その氏族の長である大勇士の数は合わせて二千六百人であった。
१२सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
13 その指揮下にある軍勢は三十万七千五百人で、皆大いなる力をもって戦い、王を助けて敵に当った。
१३शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
14 ウジヤはその全軍のために盾、やり、かぶと、よろい、弓および石投げの石を備えた。
१४या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
15 彼はまたエルサレムで技術者の考案した機械を造って、これをやぐらおよび城壁のすみずみにすえ、これをもって矢および大石を射出した。こうして彼の名声は遠くまで広まった。彼が驚くほど神の助けを得て強くなったからである。
१५काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरूशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
16 ところが彼は強くなるに及んで、その心に高ぶり、ついに自分を滅ぼすに至った。すなわち彼はその神、主にむかって罪を犯し、主の宮にはいって香の祭壇の上に香をたこうとした。
१६पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
17 その時、祭司アザリヤは主の祭司である勇士八十人を率いて、彼のあとに従ってはいり、
१७तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
18 ウジヤ王を引き止めて言った、「ウジヤよ、主に香をたくことはあなたのなすべきことではなく、ただアロンの子孫で、香をたくために清められた祭司たちのすることです。すぐ聖所から出なさい。あなたは罪を犯しました。あなたは主なる神から栄えを得ることはできません」。
१८त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्यास म्हणाले, “उज्जीया, परमेश्वरास धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नकोस. अहरोनाचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
19 するとウジヤは怒りを発し、香炉を手にとって香をたこうとしたが、彼が祭司に向かって怒りを発している間に、らい病がその額に起った。時に彼は主の宮で祭司たちの前、香の祭壇のかたわらにいた。
१९पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
20 祭司の長アザリヤおよびすべての祭司たちが彼を見ると、彼の額にらい病が生じていたので、急いで彼をそこから追い出した。彼自身もまた主に撃たれたことを知って、急いで出て行った。
२०मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
21 ウジヤ王は、死ぬ日までらい病人であった。彼はらい病人であったので、離れ殿に住んだ。主の宮から断たれたからである。その子ヨタムが王の家をつかさどり、国の民を治めた。
२१राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
22 ウジヤのその他の始終の行為は、アモツの子預言者イザヤがこれを書きしるした。
२२उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत.
23 ウジヤは先祖たちと共に眠ったので、人々は「彼はらい病人である」と言って、王たちの墓に連なる墓地に、その先祖たちと共に葬った。その子ヨタムが彼に代って王となった。
२३उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.

< 歴代誌Ⅱ 26 >