< イザヤ書 55 >

1 噫なんぢら渇ける者ことごとく水にきたれ 金なき者もきたるべし 汝等きたりてかひ求めてくらへ きたれ金なく價なくして葡萄酒と乳とをかへ
अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
2 なにゆゑ糧にもあらぬ者のために金をいだし 飽ことを得ざるもののために勞するや われに聽從へ さらばなんぢら美物をくらふをえ脂をもてその靈魂をたのしまするを得ん
जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता? आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.
3 耳をかたぶけ我にきたりてきけ 汝等のたましひは活べし われ亦なんぢらととこしへの契約をなしてダビデに約せし變らざる惠をあたへん
तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील! मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.
4 視よわれ彼をたててもろもろの民の證とし又もろもろの民の君となし命令する者となせり
पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.
5 なんぢは知ざる國民をまねかん 汝をしらざる國民はなんぢのもとに走りきたらん 此はなんぢの神ヱホバ、イスラエルの聖者のゆゑによりてなり ヱホバなんぢを尊くしたまへり
पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील. कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.
6 なんぢら遇ことをうる間にヱホバを尋ねよ 近くゐたまふ間によびもとめよ
परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.
7 惡きものはその途をすて よこしまなる人はその思念をすててヱホバに反れ さらば憐憫をほどこしたまはん 我等の神にかへれ豐に赦をあたへ給はん
दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.
8 ヱホバ宣給くわが思はなんぢらの思とことなり わが道はなんぢらのみちと異なれり
कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
9 天の地よりたかきがごとく わが道はなんぢらの道よりも高く わが思はなんぢらの思よりもたかし
कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
10 天より雨くだり雪おちて復かへらず 地をうるほして物をはえしめ 萌をいださしめて播ものに種をあたへ 食ふものに糧をあたふ
१०कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
11 如此わが口よりいづる言もむなしくは我にかへらず わが喜ぶところを成し わが命じ遣りし事をはたさん
११तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.
12 なんぢらは喜びて出きたり平穩にみちびかれゆくべし山と岡とは聲をはなちて前にうたひ野にある樹はみな手をうたん
१२कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल; तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
13 松樹はいばらにかはりてはえ岡拈樹は棘にかはりてはゆべし 此はヱホバの頌美となり並とこしへの徴となりて絶ることなからん
१३काटेरी झुडपाच्याऐवजी, सदाहरित वाढतील; आणि काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल. आणि ते परमेश्वराच्या नावासाठी सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधीही नष्ट होणार नाही.

< イザヤ書 55 >