< ホセア書 9 >

1 イスラエルよ異邦人のごとく喜びすさむ勿れなんぢ淫行をなして汝の神を離る汝すべての麥の打塲にて賜はる淫行の賞賜を愛せり
हे इस्राएला, इतर लोकांसारखा आनंद करु नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस, तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते.
2 打場と酒榨とはかれらを養はじ亦あたらしき酒もむなしくならん
पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल.
3 かれらはヱホバの地にとどまらずエフライムはエジプトに歸りアッスリヤにて汚穢たる物を食はん
ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत, त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल, आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ खातील.
4 彼等はヱホバにむかひて酒を灌ぐべき者にあらずその祭物はヱホバの悦びたまふ所にあらずかれらの犠牲は喪に居もののパンのごとし凡てこれを食ふものは汚るべし彼等のパンは只おのが食ふためにのみ用ゐべくしてヱホバの家に入るべきにあらず
ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही, व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत, त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही.
5 なんぢら集會の日とヱホバの節會の日に何をなさんとするや
परमेश्वराच्या सणाच्या दिवशी नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?
6 視よかれら滅亡の故によりて去ゆきぬエジプトかれらをあつめメンピスかれらを葬らん蒺藜かれらが銀の寳物を獲いばら彼らの天幕に蔓らん
कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.
7 刑罰の日きたり應報の日きたれりイスラエルこれを知ん預言者は愚なるもの霊に感じたるものは狂へるものなりこれ汝の惡おほく汝の怨恨おほいなるに因る
शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.
8 エフライムは我が神にならべて他の神をも佇望めり預言者の一切の途は鳥を捕ふる者の網のごとく且その神の室の中にて怨恨を懐けり
संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे, तो एफ्राईमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे.
9 かれらはギベアの日のごとく甚だしく惡き事を行へりヱホバはその惡をこころに記てその罪を罰したまはん
गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे.
10 在昔われイスラエルを見ること荒野の葡萄のごとく汝らの先祖等を看ること無花果樹の始にむすべる最先の果の如くなししに彼等はバアルペオルにゆきて身を恥辱にゆだねその愛する物とともに憎むべき者とはなれり
१०परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.
11 エフライムの榮光は鳥のごとく飛さらん即ち產ことも孕むことも妊娠こともなかるべし
११एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.
12 假令かれら子等を育つるとも我その子を喪ひて遺る人なきにいたらしめん我が離るる時かれらの禍大なる哉
१२जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!
13 われエフライムを美地に植てツロのごとくなししかどもエフライムはその子等を携へいだして人を殺すに付さんとす
१३मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.
14 ヱホバよ彼らに與へたまへ汝なにを與へんとしたまふや孕まざる胎と乳なき乳房とを與へたまへ
१४त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.
15 かれらが凡の惡はギルガルにあり此故に我かしこにて之を惡めりその行爲あしければ我が家より逐いだし重て愛することをせじその牧伯等はみな悖れる者なり
१५कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.
16 エフライムは撃れその根はかれて果を結ぶまじ若し產ことあらば我その胎なる愛しむ實を殺さん
१६एफ्राईम रोगी आहे त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही, त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.
17 かれら聽從はざるによりて我が神これを棄たまふべしかれらは列國民のうちに流離人とならん
१७माझा देव त्यांना नाकारेल कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते देशोदेशी भटकणारे होतील.

< ホセア書 9 >