< 創世記 13 >

1 アブラム其妻および其有る諸の物と偕にエジプトを出て南の地に上れりロト彼と共にありき
अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.
2 アブラム甚家畜と金銀に富り
आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.
3 彼南の地より其旅路に進てベテルに至りベテルとアイの間なる其以前に天幕を張たる處に至れり
तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला.
4 即ち彼が初に其處に築きたる壇のある處なり彼處にアブラム、ヱホバの名を龥り
जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.
5 アブラムと偕に行しロトも羊牛および天幕を有り
आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक होते.
6 其地は彼等を載て倶に居しむること能はざりき彼等は其所有多かりしに縁て倶に居ることを得ざりしなり
तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना.
7 斯有かばアブラムの家畜の牧者とロトの家畜の牧者の間に競爭ありきカナン人とペリジ人此時其地に居住り
तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.
8 アブラム、ロトに言けるは我等は兄弟の人なれば請ふ我と汝の間およびわが牧者と汝の牧者の間に競爭あらしむる勿れ
तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.
9 地は皆爾の前にあるにあらずや請ふ我を離れよ爾若左にゆかば我右にゆかん又爾右にゆかば我左にゆかんと
तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
10 是に於てロト目を擧てヨルダンの凡ての低地を瞻望みけるにヱホバ、ソドムとゴモラとを滅し給はざりし前なりければゾアルに至るまであまねく善く潤澤ひてヱホバの園の如くエジプトの地の如くなりき
१०लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.
11 ロト乃ちヨルダンの低地を盡く撰とりて東に徙れり斯彼等彼此に別たり
११तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.
12 アブラムはカナンの地に住り又ロトは低地の諸邑に住み其天幕を遷してソドムに至れり
१२अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला.
13 ソドムの人は惡くしてヱホバの前に大なる罪人なりき
१३सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.
14 ロトのアブラムに別れし後ヱホバ、アブラムに言たまひけるは爾の目を擧て爾の居る處より西東北南を瞻望め
१४लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.
15 凡そ汝が觀る所の地は我之を永く爾と爾の裔に與べし
१५तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
16 我爾の後裔を地の塵沙の如くなさん若人地の塵沙を數ふることを得ば爾の後裔も數へらるべし
१६मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.
17 爾起て縱横に其地を行き巡るべし我之を爾に與へんと
१७ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”
18 アブラム遂に天幕を遷して來りヘブロンのマムレの橡林に住み彼處にてヱホバに壇を築けり
१८तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.

< 創世記 13 >