< 申命記 8 >

1 我が今日なんぢに命ずるところの諸の誡命を汝ら謹んで行ふべし然せば汝ら生ることを得かつ殖増しヱホバの汝の先祖等に誓たまひし地に入てこれを產業となすことを得ん
आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल.
2 汝記念べし汝の神ヱホバこの四十年の間汝をして曠野の路に歩ましめたまへり是汝を苦しめて汝を試驗み汝の心の如何なるか汝がその誡命を守るや否やを知んためなりき
तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत: करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
3 即ち汝を苦しめ汝を饑しめまた汝も知ず汝の先祖等も知ざるところのマナを汝らに食はせたまへり是人はパン而已にて生る者にあらず人はヱホバの口より出る言によりて生る者なりと汝に知しめんが爲なり
परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
4 この四十年のあひだ汝の衣服は古びて朽ず汝の足は腫ざりし
गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
5 汝また心に念ふべし人のその子を懲戒ごとく汝の神ヱホバも汝を懲戒たまふなり
तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे.
6 汝の神ヱホバの誡命を守りその道にあゆみてこれを畏るべし
तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा.
7 汝の神ヱホバ汝をして美地に到らしめたまふ是は谷にも山にも水の流あり泉あり瀦水ある地
तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
8 小麥 大麥 葡萄 無花果および石榴ある地油 橄欖および蜜のある地
ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
9 汝の食ふ食物に缺るところなく汝に何も乏しきところあらざる地なりその地の石はすなはち鐵その山よりは銅を掘とるべし
येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
10 汝は食ひて飽き汝の神ヱホバにその美地を己にたまひし事を謝すべし
१०तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
11 汝わが今日なんぢに命ずるヱホバの誡命と律法と法度とを守らずして汝の神ヱホバを忘るるにいたらざるやう愼めよ
११सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
12 汝食ひて飽き美しき家を建て住ふに至り
१२त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल.
13 また汝の牛羊殖増し汝の金銀殖増し汝の所有みな殖増にいたらん時に
१३तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
14 恐くは汝心に驕りて汝の神ヱホバを忘れんヱホバは汝をエジプトの地奴隸たる家より導き出し
१४या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
15 汝をみちびきて彼の大にして畏るべき曠野すなはち蛇火の蛇蠍などありて水あらざる乾ける地を通り汝らのために堅き磐の中より水を出し
१५विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
16 汝の先祖等の知ざるマナを曠野にて汝に食せたまへり是みな汝を苦しめ汝を試みて終に福祉を汝にたまはんとてなりき
१६तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले.
17 汝我力とわが手の動作によりて我この資財を得たりと心に謂なかれ
१७हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
18 汝の神ヱホバを憶えよ其はヱホバ汝に資財を得の力をたまふなればなり斯したまふは汝の先祖等に誓し契約を今日の如く行はんとてなり
१८तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे.
19 汝もし汝の神ヱホバを忘れ果て他の神々に從がひ之に事へこれを拝むことを爲ば我今日汝らに證をなす汝らはかならず滅亡ん
१९तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो.
20 ヱホバの汝らの前に滅ぼしたまひし國々の民のごとく汝らも滅亡べし是なんぢらの神ヱホバの聲に汝らしたがはざればなり
२०ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.

< 申命記 8 >