< Salmi 76 >

1 Per il Capo de’ Musici. Per strumenti a corda. Salmo di Asaf. Canto. Iddio è conosciuto in Giuda; il suo nome è grande in Israele.
मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
2 Il suo tabernacolo e in Salem, e la sua dimora in Sion.
शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
3 Quivi ha spezzato le saette dell’arco, lo scudo, la spada e gli arnesi di guerra. (Sela)
तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
4 Tremendo sei tu, o Potente, quando ritorni dalle montagne di preda.
तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
5 Gli animosi sono stati spogliati, han dormito il loro ultimo sonno, e tutti gli uomini prodi sono stati ridotti all’impotenza.
जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
6 Alla tua minaccia, o Dio di Giacobbe, carri e cavalli sono stati presi da torpore.
हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
7 Tu, tu sei tremendo; e chi può reggere davanti a te quando t’adiri?
तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
8 Dal cielo facesti udir la tua sentenza; la terra temette e tacque,
तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि: शब्द झाली.
9 quando Iddio si levò per far giudicio, per salvare tutti gl’infelici della terra. (Sela)
देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
10 Certo, il furore degli uomini ridonderà alla tua lode; ti cingerai degli ultimi avanzi dei loro furori.
१०खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
11 Fate voti all’Eterno, all’Iddio vostro, e adempiteli; tutti quelli che gli stanno attorno portin doni al Tremendo.
११परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
12 Egli recide lo spirito dei principi, egli è tremendo ai re della terra.
१२तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.

< Salmi 76 >