< Isaia 48 >

1 Ascoltate questo, o casa di Giacobbe, voi che siete chiamati del nome d’Israele, e che siete usciti dalla sorgente di Giuda; voi che giurate per il nome dell’Eterno, e menzionate l’Iddio d’Israele ma senza sincerità, senza rettitudine!
जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
2 Poiché prendono il loro nome dalla città santa, s’appoggiano sull’Iddio d’Israele, che ha nome l’Eterno degli eserciti!
कारण ते स्वत: ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर
3 Già anticamente io annunziai le cose precedenti; esse uscirono dalla mia bocca, io le feci sapere; a un tratto io le effettuai, ed esse avvennero.
“मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.
4 Siccome io sapevo, o Israele, che tu sei ostinato, che il tuo collo ha muscoli di ferro e che la tua fronte è di rame,
कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.
5 io t’annunziai queste cose anticamente; te le feci sapere prima che avvenissero, perché tu non avessi a dire: “Le ha fatte il mio idolo, le ha ordinate la mia immagine scolpita, la mia immagine fusa”.
यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”
6 Tu ne hai udito l’annunzio; mirale avvenute tutte quante. Non lo proclamate voi stessi? Ora io t’annunzio delle cose nuove, delle cose occulte, a te ignote.
तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत.
7 Esse stanno per prodursi adesso, non da tempo antico; e, prima d’oggi non ne avevi udito parlare, perché tu non abbia a dire: “Ecco, io le sapevo”.
या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही.
8 No, tu non ne hai udito nulla, non ne hai saputo nulla, nulla in passato te ne mai venuto agli orecchi, perché sapevo che ti saresti condotto perfidamente, e che ti chiami “Ribelle” fin dal seno materno.
त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.
9 Per amor del mio nome io differirò la mia ira, e per amor della mia gloria io mi raffreno per non sterminarti.
पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही.
10 Ecco, io t’ho voluto affinare, ma senza ottenere argento, t’ho provato nel crogiuolo d’afflizione.
१०पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे.
11 Per amor di me stesso, per amor di me stesso io voglio agire; poiché, come lascerei io profanare il mio nome? e la mia gloria io non la darò ad un altro.
११माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
12 Ascoltami, o Giacobbe, e tu, Israele, che io ho chiamato. Io son Colui che è; io sono il primo, e son pure l’ultimo.
१२याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे.
13 La mia mano ha fondato la terra, e la mia destra ha spiegato i cieli; quand’io li chiamò, si presentano assieme.
१३होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाये घातले, आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली, जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात
14 Adunatevi tutti quanti, ed ascoltate! Chi tra voi ha annunziato queste cose? Colui che l’Eterno ama eseguirà il suo volere contro Babilonia, e leverà il suo braccio contro i Caldei.
१४तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या? परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन.
15 Io, io ho parlato, io l’ho chiamato; io l’ho fatto venire, e la sua impresa riuscirà.
१५मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल.
16 Avvicinatevi a me, ascoltate questo: Fin dal principio io non ho parlato in segreto; quando questi fatti avvenivano, io ero presente; e ora, il Signore, l’Eterno, mi manda col suo spirito.
१६माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.
17 Così parla l’Eterno, il tuo redentore, il Santo d’Israele: Io sono l’Eterno, il tuo Dio, che t’insegna per il tuo bene, che ti guida per la via che devi seguire.
१७जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.
18 Oh fossi tu pur attento ai miei comandamenti! la tua pace sarebbe come un fiume, e la tua giustizia, come le onde del mare;
१८जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते.
19 la tua posterità sarebbe come la rena, e il frutto delle tue viscere come la sabbia ch’è nel mare; il suo nome non sarebbe cancellato né distrutto d’innanzi al mio cospetto.
१९तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते. आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
20 Uscite da Babilonia, fuggitevene lungi dai Caldei! Con voce di giubilo, annunziatelo, banditelo, datene voce fino all’estremità della terra! Dite: “L’Eterno ha redento il suo servo Giacobbe.
२०माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला. सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे.
21 Ed essi non hanno avuto sete quand’ei li ha condotti attraverso i deserti; egli ha fatto scaturire per essi dell’acqua dalla roccia; ha fenduto la roccia, e n’è colata l’acqua”.
२१तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.
22 Non v’è pace per gli empi, dice l’Eterno.
२२पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.”

< Isaia 48 >