< Apocalisse 12 >

1 POI apparve un gran segno nel cielo: una donna intorniata del sole, di sotto a' cui piedi [era] la luna, e sopra la cui testa era una corona di dodici stelle.
आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.
2 Ed essendo incinta, gridava, sentendo i dolori del parto, e travagliava da partorire.
ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.
3 Apparve ancora un altro segno nel cielo. Ed ecco un gran dragone rosso, che avea sette teste, e dieci corna; e in su le sue teste [v'erano] sette diademi.
आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.
4 E la sua coda strascinava [dietro a sè] la terza parte delle stelle del cielo, ed egli le gettò in terra. E il dragone si fermò davanti alla donna che avea da partorire, acciocchè, quando avesse partorito, egli divorasse il suo figliuolo.
त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.
5 Ed ella partorì un figliuol maschio, il quale ha da reggere tutte le nazioni con verga di ferro; e il figliuol d'essa fu rapito, [e portato] appresso a Dio, ed appresso al suo trono.
आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले.
6 E la donna fuggì nel deserto, dove ha un luogo apparecchiato da Dio, acciocchè sia quivi nudrita milledugensessanta giorni.
आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
7 E si fece battaglia nel cielo; Michele, e i suoi angeli, combatterono col dragone; il dragone parimente, e i suoi angeli, combatterono.
आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.
8 Ma non vinsero, e il luogo loro non fu più trovato nel cielo.
पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.
9 E il gran dragone, il serpente antico, che è chiamato Diavolo e Satana, il qual seduce tutto il mondo, fu gettato in terra; e furono con lui gettati ancora i suoi angeli.
तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
10 Ed io udii una gran voce nel cielo, che diceva: Ora è venuta ad esser dell'Iddio nostro la salute, e la potenza, e il regno; e la podestà del suo Cristo; perciocchè è stato gettato a basso l'accusatore de' nostri fratelli, il quale li accusava davanti all'Iddio nostro, giorno e notte.
१०आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे.
11 Ma essi l'hanno vinto per il sangue dell'Agnello, e per la parola della loro testimonianza; e non hanno amata la vita loro; fin [là, che l'hanno esposta] alla morte.
११त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
12 Perciò, rallegratevi, o cieli, e [voi] che abitate in essi. Guai a [voi], terra, e mare! perciocchè il Diavolo è disceso a voi, avendo grande ira, sapendo che egli ha poco tempo.
१२म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.
13 E quando il dragone vide ch'egli era stato gettato in terra, perseguitò la donna, che avea partorito il [figliuol] maschio.
१३आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.
14 Ma furono date alla donna due ale della grande aquila, acciocchè se ne volasse d'innanzi al serpente nel deserto, nel suo luogo, per esser quivi nudrita un tempo, de' tempi, e la metà d'un tempo.
१४परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल.
15 E il serpente gettò dalla sua bocca, dietro alla donna, dell'acqua, a guisa di fiume; per far che il fiume la portasse via.
१५आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले.
16 Ma la terra soccorse la donna; e la terra aperse la sua bocca, ed assorbì il fiume, che il dragone avea gettato della sua bocca.
१६पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली.
17 E il dragone si adirò contro alla donna, e se ne andò a far guerra col rimanente della progenie d'essa, che serba i comandamenti di Dio, ed ha la testimonianza di Gesù Cristo.
१७तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;

< Apocalisse 12 >