< 1 Corinzi 5 >

1 DEL tutto si ode [che vi è] fra voi fornicazione; e tal fornicazione, che non pur fra i Gentili è nominata, [cioè], che alcuno si tien la moglie del padre.
मी अशी बातमी ऐकली आहे की, तुमच्यामध्ये व्यभिचार चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.
2 E pure ancora voi siete gonfi, e più tosto non avete fatto cordoglio, acciocchè colui che ha commesso questo fatto fosse tolto del mezzo di voi.
आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हास त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.
3 Poichè io, come assente del corpo, ma presente dello spirito, ho già giudicato, come presente, che colui che ha commesso ciò in questa maniera
कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्याप्रमाणे त्याचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे,
4 (voi, e lo spirito mio essendo raunati nel nome del nostro Signor Gesù Cristo, con la podestà del Signor nostro Gesù Cristo);
जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने एकत्र जमाल आणि तेव्हा आपला प्रभू येशू ह्याच्या सामर्थ्याने, माझा आत्मा तुमच्याबरोबर असेल,
5 che il tale, [dico], sia dato in mano di Satana, alla perdizion della carne, acciocchè lo spirito sia salvato nel giorno del Signor Gesù.
तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे.
6 Il vostro vanto non [è] buono; non sapete voi che un poco di lievito levita tutta la pasta?
तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना?
7 Purgate adunque il vecchio lievito, acciocchè siate nuova pasta, secondo che siete senza lievito; poichè la nostra pasqua, [cioè] Cristo, è stata immolata per noi.
म्हणून तुम्ही जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर झाला आहात तसे तुम्ही एक नवीन गोळा व्हावे कारण आपला वल्हांडणाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे.
8 Perciò facciam la festa, non con vecchio lievito, nè con lievito di malvagità, e di nequizia, ma con azzimi di sincerità, e di verità.
तर आपण जुन्या खमिराने किंवा वाईटपणा व कुकर्माच्या खमिराने नाही, पण सरळपणा व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू या.
9 Io vi ho scritto in quell'epistola che voi non vi mescoliate co' fornicatori;
मी तुम्हास माझ्या पत्रात लिहिले होते की व्यभिचाऱ्याशी संबंध ठेवू नका.
10 non però del tutto co' fornicatori di questo secolo, o con gli avari, o co' rapaci, o con gl'idolatri; perciocchè altrimenti vi converrebbe uscire del mondo.
१०तथापि जगातले व्यभिचारी, लोभी, लुबाडणारे किंवा मूर्तीपुजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण मग तुम्हास जगातून बाहेर जावे लागेल.
11 Ma ora, [ecco coloro co' quali] vi ho scritto che non vi mescoliate, [cioè], che se alcuno, che si nomina fratello, [è] o fornicatore, o avaro, o idolatra, o ubbriaco, o maldicente, o rapace, non pur mangiate con un tale.
११पण आता, मी तुम्हास लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हणलेला असा कोणी जर व्यभिचारी, लोभी किंवा मूर्तीपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा मनुष्यांबरोबर जेवूही नका.
12 Perciocchè che ho io da far di giudicar que' di fuori? non giudicate voi que' di dentro?
१२कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध? त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?
13 Or Iddio giudica que' di fuori; ma togliete il malvagio d'infra voi stessi.
१३पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’

< 1 Corinzi 5 >