< Zsoltárok 41 >

1 Az éneklőmesternek; Dávid zsoltára. Boldog, a ki a nyomorultra gondol; a veszedelem napján megmenti azt az Úr.
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
2 Az Úr megőrzi azt és élteti azt; boldog lesz e földön, és nem adhatod oda ellenségei kivánságának.
परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
3 Az Úr megerősíti őt az ő betegágyán; bármilyen az ágya, megkönnyíted betegségében.
तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
4 Én azt mondtam: Uram kegyelmezz nékem, gyógyítsd meg lelkemet, mert vétkeztem ellened!
मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
5 Ellenségeim rosszat mondanak felőlem: Mikor hal meg és vész ki a neve?
माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
6 Ha látogatni jön be valaki, hiábavalóságot beszél; szíve álnokságot gyűjt össze magának, kimegy az utczára és beszél.
माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
7 Minden gyűlölőm együtt suttog reám, gonoszat koholnak ellenem:
माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8 Istennek átka szállott ő reá, s mivelhogy benne fekszik, nem kél fel többé!
ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9 Még az én jóakaróm is, a kiben bíztam, a ki kenyeremet ette, fölemelte sarkát ellenem.
माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
10 De te Uram, könyörülj rajtam és emelj föl engemet, hadd fizessek meg nékik!
१०परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
11 Abból tudom meg, hogy kedvelsz engemet, ha ellenségem nem ujjong felettem;
११माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
12 Engem pedig feddhetetlenségemben támogatsz, és színed elé állatsz mindenha.
१२मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
13 Áldott az Úr, Izráelnek Istene öröktől fogva mindörökké. Ámen, ámen!
१३परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन.

< Zsoltárok 41 >