< Jób 13 >

1 Ímé, mindezeket látta az én szemem, hallotta az én fülem és megértette.
पाहा, “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे व त्या सर्व गोष्टी मला समजतात.
2 A mint ti tudjátok, úgy tudom én is, és nem vagyok alábbvaló nálatok.
तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे, मी तुमच्याहून काही कमी नाही.
3 Azonban én a Mindenhatóval akarok szólani; Isten előtt kivánom védeni ügyemet.
मला सर्वशक्तिमानाशी बोलायचे आहे, मला देवाबरोबर माझ्या कारणाविषयी बोलायचे आहे.
4 Mert ti hazugságnak mesterei vagytok, és mindnyájan haszontalan orvosok.
तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
5 Vajha legalább mélyen hallgatnátok, az még bölcseségtekre lenne.
अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.
6 Halljátok meg, kérlek, az én feddőzésemet, és figyeljetek az én számnak pörlekedéseire.
आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका.
7 Az Isten kedvéért szóltok-é hamisságot, és ő érette szóltok-é csalárdságot?
तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? त्याच्या करीता तुम्ही कपटाचे भाषण करणार काय?
8 Az ő személyére néztek-é, ha Isten mellett tusakodtok?
तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
9 Jó lesz-é az, ha egészen kiismer benneteket, avagy megcsalhatjátok-é őt, a mint megcsalható az ember?
जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हास वाटते का?
10 Keményen megbüntet, ha titkon vagytok is személyválogatók.
१०तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का?
11 Az ő fensége nem rettent-é meg titeket, a tőle való félelem nem száll-é rátok?
११देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय?
12 A ti emlékezéseitek hamuba írott példabeszédek, a ti menedékváraitok sárvárak.
१२तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत, तुमची तटबंदी ही मातीपासून बनलेली आहे.
13 Hallgassatok, ne bántsatok: hadd szóljak én, akármi essék is rajtam.
१३आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
14 Miért szaggatnám fogaimmal testemet, és miért szorítanám markomba lelkemet?
१४मी माझे मांस माझाच दातात धरेन मी माझ्याच हातात माझेच जीवन धरीन?
15 Ímé, megöl engem! Nem reménylem; hiszen csak utaimat akarom védeni előtte!
१५पहा, जरी त्याने मला मारुन टाकले, तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. असे असले तरी, मी त्याच्यासमोर माझा मार्गांची मांडणी करीन.
16 Sőt az lesz nékem segítségül, hogy képmutató nem juthat elébe.
१६कारण ढोंगी त्याच्या पुढे येणार नाही हे माझे तारण होईल.
17 Hallgassátok meg figyelmetesen az én beszédemet, vegyétek füleitekbe az én mondásomat.
१७देवा, तू माझे सांगणे काळजी पूर्वक ऐक, माझी घोषणा तुझा कानी येऊदे.
18 Ímé, előterjesztem ügyemet, tudom, hogy nékem lesz igazam.
१८आता पहा, मी माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी निष्पाप आहे हे मी दाखवून देईन.
19 Ki az, a ki perelhetne velem? Ha most hallgatnom kellene, úgy kimulnék.
१९न्यायालयात माझ्या विरुध वादविवाद करेल असा कोण आहे? आणि माझी चुक आहे हे तू येऊन सिद्ध केलेस म्हणून मी गप्प बसेन व प्राण त्यागेन.
20 Csak kettőt ne cselekedj velem, szined elől akkor nem rejtőzöm el.
२०देवा, तू माझासाठी फक्त दोन गोष्टी कर, आणि त्यानतर तुझ्या मुखापासून मी स्वत: ला लपवणार नाही.
21 Vedd le rólam kezedet, és a te rettentésed ne rettentsen engem.
२१माझ्या विरुध असलेला तुझा हात कडून घे, आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
22 Azután szólíts és én felelek, avagy én szólok hozzád és te válaszolj.
२२नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
23 Mennyi bűnöm és vétkem van nékem? Gonoszságomat és vétkemet add tudtomra!
२३मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
24 Mért rejted el arczodat, és tartasz engemet ellenségedül?
२४तू आपले मुख माझ्या पासून का लपवत आहेस? आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवीत आहेस?
25 A letépett falevelet rettegteted-é, és a száraz pozdorját üldözöd-é?
२५मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीचा पिच्छा पुरवितोस का?
26 Hogy ily sok keserűséget szabtál reám, és az én ifjúságomnak vétkét örökölteted velem?!
२६तू माझ्याविरुध्द फार कटू गोष्टी लिहिल्या. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस.
27 Hogy békóba teszed lábaimat, vigyázol minden én utamra, és vizsgálod lábomnak nyomait?
२७तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
28 Az pedig elsenyved, mint a redves fa, mint ruha, a melyet moly emészt.
२८म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे.”

< Jób 13 >