< תְהִלִּים 89 >

מַ֝שְׂכִּ֗יל לְאֵיתָ֥ן הָֽאֶזְרָחִֽי׃ חַֽסְדֵ֣י יְ֭הוָה עֹולָ֣ם אָשִׁ֑ירָה לְדֹ֥ר וָדֹ֓ר ׀ אֹודִ֖יעַ אֱמוּנָתְךָ֣ בְּפִֽי׃ 1
एथानाचे स्तोत्र मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
כִּֽי־אָמַ֗רְתִּי עֹ֭ולָם חֶ֣סֶד יִבָּנֶ֑ה שָׁמַ֓יִם ׀ תָּכִ֖ן אֱמוּנָתְךָ֣ בָהֶֽם׃ 2
कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
כָּרַ֣תִּֽי בְ֭רִית לִבְחִירִ֑י נִ֝שְׁבַּ֗עְתִּי לְדָוִ֥ד עַבְדִּֽי׃ 3
मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
עַד־עֹ֭ולָם אָכִ֣ין זַרְעֶ֑ךָ וּבָנִ֨יתִי לְדֹר־וָדֹ֖ור כִּסְאֲךָ֣ סֶֽלָה׃ 4
मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
וְיֹ֘וד֤וּ שָׁמַ֣יִם פִּלְאֲךָ֣ יְהוָ֑ה אַף־אֱ֝מֽוּנָתְךָ֗ בִּקְהַ֥ל קְדֹשִֽׁים׃ 5
हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
כִּ֤י מִ֣י בַ֭שַּׁחַק יַעֲרֹ֣ךְ לַיהוָ֑ה יִדְמֶ֥ה לַ֝יהוָ֗ה בִּבְנֵ֥י אֵלִים׃ 6
कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
אֵ֣ל נַ֭עֲרָץ בְּסֹוד־קְדֹשִׁ֣ים רַבָּ֑ה וְ֝נֹורָ֗א עַל־כָּל־סְבִיבָֽיו׃ 7
पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
יְהוָ֤ה ׀ אֱלֹ֘הֵ֤י צְבָאֹ֗ות מִֽי־כָֽמֹ֖וךָ חֲסִ֥ין ׀ יָ֑הּ וֶ֝אֱמֽוּנָתְךָ֗ סְבִיבֹותֶֽיךָ׃ 8
हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
אַתָּ֣ה מֹ֭ושֵׁל בְּגֵא֣וּת הַיָּ֑ם בְּשֹׂ֥וא גַ֝לָּ֗יו אַתָּ֥ה תְשַׁבְּחֵֽם׃ 9
समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
אַתָּ֤ה דִכִּ֣אתָ כֶחָלָ֣ל רָ֑הַב בִּזְרֹ֥ועַ עֻ֝זְּךָ֗ פִּזַּ֥רְתָּ אֹויְבֶֽיךָ׃ 10
१०तू राहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
לְךָ֣ שָׁ֭מַיִם אַף־לְךָ֥ אָ֑רֶץ תֵּבֵ֥ל וּ֝מְלֹאָ֗הּ אַתָּ֥ה יְסַדְתָּֽם׃ 11
११आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
צָפֹ֣ון וְ֭יָמִין אַתָּ֣ה בְרָאתָ֑ם תָּבֹ֥ור וְ֝חֶרְמֹ֗ון בְּשִׁמְךָ֥ יְרַנֵּֽנוּ׃ 12
१२उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
לְךָ֣ זְ֭רֹועַ עִם־גְּבוּרָ֑ה תָּעֹ֥ז יָ֝דְךָ֗ תָּר֥וּם יְמִינֶֽךָ׃ 13
१३तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
צֶ֣דֶק וּ֭מִשְׁפָּט מְכֹ֣ון כִּסְאֶ֑ךָ חֶ֥סֶד וֶ֝אֱמֶ֗ת יְֽקַדְּמ֥וּ פָנֶֽיךָ׃ 14
१४निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
אַשְׁרֵ֣י הָ֭עָם יֹודְעֵ֣י תְרוּעָ֑ה יְ֝הוָ֗ה בְּֽאֹור־פָּנֶ֥יךָ יְהַלֵּכֽוּן׃ 15
१५जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
בְּ֭שִׁמְךָ יְגִיל֣וּן כָּל־הַיֹּ֑ום וּבְצִדְקָתְךָ֥ יָרֽוּמוּ׃ 16
१६ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
כִּֽי־תִפְאֶ֣רֶת עֻזָּ֣מֹו אָ֑תָּה וּ֝בִרְצֹנְךָ֗ תָּרִים (תָּר֥וּם) קַרְנֵֽנוּ׃ 17
१७त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
כִּ֣י לַֽ֭יהוָה מָֽגִנֵּ֑נוּ וְלִקְדֹ֖ושׁ יִשְׂרָאֵ֣ל מַלְכֵּֽנוּ׃ 18
१८कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
אָ֤ז דִּבַּ֥רְתָּֽ־בְחָ֡זֹון לַֽחֲסִידֶ֗יךָ וַתֹּ֗אמֶר שִׁוִּ֣יתִי עֵ֭זֶר עַל־גִּבֹּ֑ור הֲרִימֹ֖ותִי בָח֣וּר מֵעָֽם׃ 19
१९पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
מָ֭צָאתִי דָּוִ֣ד עַבְדִּ֑י בְּשֶׁ֖מֶן קָדְשִׁ֣י מְשַׁחְתִּֽיו׃ 20
२०मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
אֲשֶׁ֣ר יָ֭דִי תִּכֹּ֣ון עִמֹּ֑ו אַף־זְרֹועִ֥י תְאַמְּצֶֽנּוּ׃ 21
२१माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
לֹֽא־יַשִּׁ֣א אֹויֵ֣ב בֹּ֑ו וּבֶן־עַ֝וְלָ֗ה לֹ֣א יְעַנֶּֽנּוּ׃ 22
२२कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
וְכַתֹּותִ֣י מִפָּנָ֣יו צָרָ֑יו וּמְשַׂנְאָ֥יו אֶגֹּֽוף׃ 23
२३मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
וֶֽאֶֽמוּנָתִ֣י וְחַסְדִּ֣י עִמֹּ֑ו וּ֝בִשְׁמִ֗י תָּר֥וּם קַרְנֹֽו׃ 24
२४माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
וְשַׂמְתִּ֣י בַיָּ֣ם יָדֹ֑ו וּֽבַנְּהָרֹ֥ות יְמִינֹֽו׃ 25
२५मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
ה֣וּא יִ֭קְרָאֵנִי אָ֣בִי אָ֑תָּה אֵ֝לִ֗י וְצ֣וּר יְשׁוּעָתִֽי׃ 26
२६तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
אַף־אָ֭נִי בְּכֹ֣ור אֶתְּנֵ֑הוּ עֶ֝לְיֹ֗ון לְמַלְכֵי־אָֽרֶץ׃ 27
२७आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
לְ֭עֹולָ֗ם אֶשְׁמֹור־ (אֶשְׁמָר)־לֹ֣ו חַסְדִּ֑י וּ֝בְרִיתִ֗י נֶאֱמֶ֥נֶת לֹֽו׃ 28
२८मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
וְשַׂמְתִּ֣י לָעַ֣ד זַרְעֹ֑ו וְ֝כִסְאֹ֗ו כִּימֵ֥י שָׁמָֽיִם׃ 29
२९त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
אִם־יַֽעַזְב֣וּ בָ֭נָיו תֹּורָתִ֑י וּ֝בְמִשְׁפָּטַ֗י לֹ֣א יֵלֵכֽוּן׃ 30
३०जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
אִם־חֻקֹּתַ֥י יְחַלֵּ֑לוּ וּ֝מִצְוֹתַ֗י לֹ֣א יִשְׁמֹֽרוּ׃ 31
३१जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
וּפָקַדְתִּ֣י בְשֵׁ֣בֶט פִּשְׁעָ֑ם וּבִנְגָעִ֥ים עֲוֹנָֽם׃ 32
३२मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
וְ֭חַסְדִּי לֹֽא־אָפִ֣יר מֵֽעִמֹּ֑ו וְלֹֽא־אֲ֝שַׁקֵּ֗ר בֶּאֱמוּנָתִֽי׃ 33
३३परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
לֹא־אֲחַלֵּ֥ל בְּרִיתִ֑י וּמֹוצָ֥א שְׂ֝פָתַ֗י לֹ֣א אֲשַׁנֶּֽה׃ 34
३४मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
אַ֭חַת נִשְׁבַּ֣עְתִּי בְקָדְשִׁ֑י אִֽם־לְדָוִ֥ד אֲכַזֵּֽב׃ 35
३५एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
זַ֭רְעֹו לְעֹולָ֣ם יִהְיֶ֑ה וְכִסְאֹ֖ו כַשֶּׁ֣מֶשׁ נֶגְדִּֽי׃ 36
३६त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
כְּ֭יָרֵחַ יִכֹּ֣ון עֹולָ֑ם וְעֵ֥ד בַּ֝שַּׁ֗חַק נֶאֱמָ֥ן סֶֽלָה׃ 37
३७ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
וְאַתָּ֣ה זָ֭נַחְתָּ וַתִּמְאָ֑ס הִ֝תְעַבַּ֗רְתָּ עִם־מְשִׁיחֶֽךָ׃ 38
३८पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
נֵ֭אַרְתָּה בְּרִ֣ית עַבְדֶּ֑ךָ חִלַּ֖לְתָּ לָאָ֣רֶץ נִזְרֹֽו׃ 39
३९तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
פָּרַ֥צְתָּ כָל־גְּדֵרֹתָ֑יו שַׂ֖מְתָּ מִבְצָרָ֣יו מְחִתָּה׃ 40
४०तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
שַׁ֭סֻּהוּ כָּל־עֹ֣בְרֵי דָ֑רֶךְ הָיָ֥ה חֶ֝רְפָּ֗ה לִשְׁכֵנֽ͏ָיו׃ 41
४१सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
הֲ֭רִימֹותָ יְמִ֣ין צָרָ֑יו הִ֝שְׂמַ֗חְתָּ כָּל־אֹויְבָֽיו׃ 42
४२तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
אַף־תָּ֭שִׁיב צ֣וּר חַרְבֹּ֑ו וְלֹ֥א הֲ֝קֵימֹתֹ֗ו בַּמִּלְחָמָֽה׃ 43
४३तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
הִשְׁבַּ֥תָּ מִטְּהָרֹ֑ו וְ֝כִסְאֹ֗ו לָאָ֥רֶץ מִגַּֽרְתָּה׃ 44
४४तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
הִ֭קְצַרְתָּ יְמֵ֣י עֲלוּמָ֑יו הֶֽעֱטִ֨יתָ עָלָ֖יו בּוּשָׁ֣ה סֶֽלָה׃ 45
४५तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
עַד־מָ֣ה יְ֭הוָה תִּסָּתֵ֣ר לָנֶ֑צַח תִּבְעַ֖ר כְּמֹו־אֵ֣שׁ חֲמָתֶֽךָ׃ 46
४६हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
זְכָר־אֲנִ֥י מֶה־חָ֑לֶד עַל־מַה־שָּׁ֝֗וְא בָּרָ֥אתָ כָל־בְּנֵי־אָדָֽם׃ 47
४७माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
מִ֤י גֶ֣בֶר יִֽ֭חְיֶה וְלֹ֣א יִרְאֶה־מָּ֑וֶת יְמַלֵּ֨ט נַפְשֹׁ֖ו מִיַּד־שְׁאֹ֣ול סֶֽלָה׃ (Sheol h7585) 48
४८कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? (Sheol h7585)
אַיֵּ֤ה ׀ חֲסָדֶ֖יךָ הָרִאשֹׁנִ֥ים ׀ אֲדֹנָ֑י נִשְׁבַּ֥עְתָּ לְ֝דָוִ֗ד בֶּאֱמוּנָתֶֽךָ׃ 49
४९हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
זְכֹ֣ר אֲ֭דֹנָי חֶרְפַּ֣ת עֲבָדֶ֑יךָ שְׂאֵתִ֥י בְ֝חֵיקִ֗י כָּל־רַבִּ֥ים עַמִּֽים׃ 50
५०हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
אֲשֶׁ֤ר חֵרְפ֖וּ אֹויְבֶ֥יךָ ׀ יְהוָ֑ה אֲשֶׁ֥ר חֵ֝רְפ֗וּ עִקְּבֹ֥ות מְשִׁיחֶֽךָ׃ 51
५१हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
בָּר֖וּךְ יְהוָ֥ה לְ֝עֹולָ֗ם אָ֘מֵ֥ן ׀ וְאָמֵֽן׃ 52
५२परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.

< תְהִלִּים 89 >