< עָמוֹס 4 >

שִׁמְע֞וּ הַדָּבָ֣ר הַזֶּ֗ה פָּרֹ֤ות הַבָּשָׁן֙ אֲשֶׁר֙ בְּהַ֣ר שֹֽׁמְרֹ֔ון הָעֹשְׁקֹ֣ות דַּלִּ֔ים הָרֹצְצֹ֖ות אֶבְיֹונִ֑ים הָאֹמְרֹ֥ת לַאֲדֹֽנֵיהֶ֖ם הָבִ֥יאָה וְנִשְׁתֶּֽה׃ 1
शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.
נִשְׁבַּ֨ע אֲדֹנָ֤י יְהוִה֙ בְּקָדְשֹׁ֔ו כִּ֛י הִנֵּ֥ה יָמִ֖ים בָּאִ֣ים עֲלֵיכֶ֑ם וְנִשָּׂ֤א אֶתְכֶם֙ בְּצִנֹּ֔ות וְאַחֲרִיתְכֶ֖ן בְּסִירֹ֥ות דּוּגָֽה׃ 2
परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.
וּפְרָצִ֥ים תֵּצֶ֖אנָה אִשָּׁ֣ה נֶגְדָּ֑הּ וְהִשְׁלַכְתֶּ֥נָה הַהַרְמֹ֖ונָה נְאֻם־יְהוָֽה׃ 3
तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल, तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो.
בֹּ֤אוּ בֵֽית־אֵל֙ וּפִשְׁע֔וּ הַגִּלְגָּ֖ל הַרְבּ֣וּ לִפְשֹׁ֑עַ וְהָבִ֤יאוּ לַבֹּ֙קֶר֙ זִבְחֵיכֶ֔ם לִשְׁלֹ֥שֶׁת יָמִ֖ים מַעְשְׂרֹֽתֵיכֶֽם׃ 4
“बेथेलला जा आणि पाप करा, गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा, तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
וְקַטֵּ֤ר מֵֽחָמֵץ֙ תֹּודָ֔ה וְקִרְא֥וּ נְדָבֹ֖ות הַשְׁמִ֑יעוּ כִּ֣י כֵ֤ן אֲהַבְתֶּם֙ בְּנֵ֣י יִשְׂרָאֵ֔ל נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃ 5
खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा; खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा; कारण हे इस्राएलाच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते.” असे परमेश्वर म्हणतो.
וְגַם־אֲנִי֩ נָתַ֨תִּי לָכֶ֜ם נִקְיֹ֤ון שִׁנַּ֙יִם֙ בְּכָל־עָ֣רֵיכֶ֔ם וְחֹ֣סֶר לֶ֔חֶם בְּכֹ֖ל מְקֹומֹֽתֵיכֶ֑ם וְלֹֽא־שַׁבְתֶּ֥ם עָדַ֖י נְאֻם־יְהוָֽה׃ 6
“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
וְגַ֣ם אָנֹכִי֩ מָנַ֨עְתִּי מִכֶּ֜ם אֶת־הַגֶּ֗שֶׁם בְּעֹ֨וד שְׁלֹשָׁ֤ה חֳדָשִׁים֙ לַקָּצִ֔יר וְהִמְטַרְתִּי֙ עַל־עִ֣יר אֶחָ֔ת וְעַל־עִ֥יר אַחַ֖ת לֹ֣א אַמְטִ֑יר חֶלְקָ֤ה אַחַת֙ תִּמָּטֵ֔ר וְחֶלְקָ֛ה אֲשֶֽׁר־לֹֽא־תַמְטִ֥יר עָלֶ֖יהָ תִּיבָֽשׁ׃ 7
“कापणीला तीन महिने राहीले असता, त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला. आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला.
וְנָע֡וּ שְׁתַּיִם֩ שָׁלֹ֨שׁ עָרִ֜ים אֶל־עִ֥יר אַחַ֛ת לִשְׁתֹּ֥ות מַ֖יִם וְלֹ֣א יִשְׂבָּ֑עוּ וְלֹֽא־שַׁבְתֶּ֥ם עָדַ֖י נְאֻם־יְהוָֽה׃ 8
म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले. परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
הִכֵּ֣יתִי אֶתְכֶם֮ בַּשִּׁדָּפֹ֣ון וּבַיֵּרָקֹון֒ הַרְבֹּ֨ות גַּנֹּותֵיכֶ֧ם וְכַרְמֵיכֶ֛ם וּתְאֵנֵיכֶ֥ם וְזֵיתֵיכֶ֖ם יֹאכַ֣ל הַגָּזָ֑ם וְלֹֽא־שַׁבְתֶּ֥ם עָדַ֖י נְאֻם־יְהוָֽה׃ ס 9
“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
שִׁלַּ֨חְתִּי בָכֶ֥ם דֶּ֙בֶר֙ בְּדֶ֣רֶךְ מִצְרַ֔יִם הָרַ֤גְתִּי בַחֶ֙רֶב֙ בַּח֣וּרֵיכֶ֔ם עִ֖ם שְׁבִ֣י סֽוּסֵיכֶ֑ם וָאַעֲלֶ֞ה בְּאֹ֤שׁ מַחֲנֵיכֶם֙ וּֽבְאַפְּכֶ֔ם וְלֹֽא־שַׁבְתֶּ֥ם עָדַ֖י נְאֻם־יְהוָֽה׃ 10
१०“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
הָפַ֣כְתִּי בָכֶ֗ם כְּמַהְפֵּכַ֤ת אֱלֹהִים֙ אֶת־סְדֹ֣ם וְאֶת־עֲמֹרָ֔ה וַתִּהְי֕וּ כְּא֖וּד מֻצָּ֣ל מִשְּׂרֵפָ֑ה וְלֹֽא־שַׁבְתֶּ֥ם עָדַ֖י נְאֻם־יְהוָֽה׃ ס 11
११“सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला; आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
לָכֵ֕ן כֹּ֥ה אֶעֱשֶׂה־לְּךָ֖ יִשְׂרָאֵ֑ל עֵ֚קֶב כִּֽי־זֹ֣את אֶֽעֱשֶׂה־לָּ֔ךְ הִכֹּ֥ון לִקְרַאת־אֱלֹהֶ֖יךָ יִשְׂרָאֵֽל׃ 12
१२“म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन, आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा, इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो.
כִּ֡י הִנֵּה֩ יֹוצֵ֨ר הָרִ֜ים וּבֹרֵ֣א ר֗וּחַ וּמַגִּ֤יד לְאָדָם֙ מַה־שֵּׂחֹ֔ו עֹשֵׂ֥ה שַׁ֙חַר֙ עֵיפָ֔ה וְדֹרֵ֖ךְ עַל־בָּ֣מֳתֵי אָ֑רֶץ יְהוָ֥ה אֱלֹהֵֽי־צְבָאֹ֖ות שְׁמֹֽו׃ ס 13
१३कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.”

< עָמוֹס 4 >