< מִשְׁלֵי 13 >

בן חכם מוסר אב ולץ לא-שמע גערה 1
सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
מפרי פי-איש יאכל טוב ונפש בגדים חמס 2
आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
נצר פיו שמר נפשו פשק שפתיו מחתה-לו 3
जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
מתאוה ואין נפשו עצל ונפש חרצים תדשן 4
आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
דבר-שקר ישנא צדיק ורשע יבאיש ויחפיר 5
नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
צדקה תצר תם-דרך ורשעה תסלף חטאת 6
नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
יש מתעשר ואין כל מתרושש והון רב 7
जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
כפר נפש-איש עשרו ורש לא-שמע גערה 8
श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
אור-צדיקים ישמח ונר רשעים ידעך 9
नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
רק-בזדון יתן מצה ואת-נועצים חכמה 10
१०गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
הון מהבל ימעט וקבץ על-יד ירבה 11
११वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
תוחלת ממשכה מחלה-לב ועץ חיים תאוה באה 12
१२जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
בז לדבר יחבל לו וירא מצוה הוא ישלם 13
१३जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
תורת חכם מקור חיים-- לסור ממקשי מות 14
१४सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
שכל-טוב יתן-חן ודרך בגדים איתן 15
१५सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
כל-ערום יעשה בדעת וכסיל יפרש אולת 16
१६शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
מלאך רשע יפל ברע וציר אמונים מרפא 17
१७दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
ריש וקלון פורע מוסר ושמר תוכחת יכבד 18
१८जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
תאוה נהיה תערב לנפש ותועבת כסילים סור מרע 19
१९इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
הלוך (הולך) את-חכמים וחכם (יחכם) ורעה כסילים ירוע 20
२०शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
חטאים תרדף רעה ואת-צדיקים ישלם-טוב 21
२१आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
טוב--ינחיל בני-בנים וצפון לצדיק חיל חוטא 22
२२चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
רב-אכל ניר ראשים ויש נספה בלא משפט 23
२३गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
חושך שבטו שונא בנו ואהבו שחרו מוסר 24
२४जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
צדיק--אכל לשבע נפשו ובטן רשעים תחסר 25
२५जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.

< מִשְׁלֵי 13 >