< Johannes 3 >

1 Unter den Pharisäern war ein Mann mit Namen Nikodemus, ein Ratsherr bei den Juden.
परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.
2 Der kam eines Nachts zu ihm und sprach: "Wir wissen, Rabbi, daß du von Gott als Lehrer gekommen bist; denn niemand kann solche Zeichen tun, wie du sie wirkst, wenn Gott nicht mit ihm ist."
तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
3 Und Jesus sprach zu ihm: "Wahrlich, wahrlich sage ich dir: Wenn jemand nicht von oben geboren ist, kann er das Reich Gottes nicht schauen."
येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
4 Da sagte Nikodemus zu ihm: "Wie kann ein Mensch geboren werden, der schon alt ist? Er kann doch nicht noch einmal in den Mutterschoß zurück und wiederum geboren werden?"
निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”
5 Und Jesus sprach: "Wahrlich, wahrlich sage ich dir: Wer nicht aus Wasser und Heiligem Geiste geboren ist, kann nicht in das Reich Gottes eingehen.
येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
6 Was aus dem Fleische geboren ist, ist Fleisch, was aber aus dem Geiste geboren ist, ist Geist.
देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे.
7 Wundere dich nicht, daß ich dir sagte: Ihr müßt von oben geboren werden.
तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका.
8 Der Wind weht, wo er will; du hörst sein Brausen, weißt aber nicht, woher er kommt, noch wohin er geht. Geradeso verhält es sich mit dem, der aus dem Geiste geboren ist."
वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
9 Darauf fragte Nikodemus: "Wie ist das möglich?"
निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?”
10 Und Jesus sprach zu ihm: "Du bist der Lehrer Israels und begreifst das nicht?
१०येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तू इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय?
11 Wahrlich, wahrlich sage ich dir: Wir reden, was wir wissen, und wir bezeugen, was wir gesehen haben; ihr aber nehmt unser Zeugnis nicht an.
११मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
12 Wenn ich von irdischen Dingen zu euch rede und ihr nicht glaubt, wie werdet ihr dann glauben, wenn ich von himmlischen zu euch rede?
१२मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?
13 Niemand ist zum Himmel aufgestiegen als der, der vom Himmel kam, der Menschensohn der im Himmel ist.
१३स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
14 Wie Moses in der Wüste die Schlange erhöht, hat, so muß auch der Menschensohn erhöht werden,
१४जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे,
15 damit jeder, der glaubt, nicht verlorengehe, sondern in ihm ewiges Leben habe. (aiōnios g166)
१५यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (aiōnios g166)
16 So sehr hat Gott die Welt geliebt, daß er seinen eingebornen Sohn hingab, damit, wer immer an ihn glaubt, nicht verlorengehe, vielmehr ewiges Leben habe. (aiōnios g166)
१६कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. (aiōnios g166)
17 Denn Gott hat seinen Sohn nicht dazu in die Welt gesandt, damit er die Welt richte, sondern damit die Welt durch ihn gerettet werde.
१७कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
18 Wer an ihn glaubt, wird nicht gerichtet werden, wer aber nicht glaubt, der ist schon gerichtet, weil er an den Namen des eingebornen Sohnes Gottes nicht geglaubt hat.
१८जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
19 Darin besteht ja das Gericht: Das Licht ist in die Welt gekommen, die Menschen aber wollten lieber die Finsternis als das Licht; denn ihre Werke waren böse.
१९आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
20 Denn jeder, der Böses tut, haßt das Licht und kommt nicht an das Licht, damit seine Werke nicht ans Licht kommen.
२०कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
21 Doch wer recht handelt, geht zum Lichte, damit so offenkundig werde, daß seine Werke mit Gott vollbracht sind."
२१पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
22 Hierauf kam Jesus mit den Jüngern in die Landschaft Judäa, blieb dort mit ihnen und taufte.
२२यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.
23 Auch Johannes taufte noch zu Änon, nahe bei Salim; denn dort gab es reichlich Wasser. Die Leute kamen hin und ließen sich taufen.
२३आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत.
24 Noch lag Johannes nicht im Gefängnis.
२४तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
25 Da entstand ein Streit über Reinigungen zwischen den Jüngern des Johannes und einem Judäer.
२५मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.
26 Sie gingen zu Johannes und sagten ihm: "Rabbi! Jener Mann, der drüben überm Jordan bei dir war und für den du Zeugnis abgelegt hast, sieh, er tauft nun auch, und alles läuft ihm zu."
२६ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”
27 Johannes sprach: "Ein Mensch kann sich nichts nehmen, was ihm nicht vom Himmel gegeben ist.
२७योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
28 Ihr selbst müßt mir bezeugen, daß ich gesagt habe: 'Ich bin nicht der Christus, ich bin nur vor ihm hergesandt.'
२८मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
29 Wer die Braut hat, ist Bräutigam; der Freund des Bräutigams indes steht da und hört ihn und freut sich herzlich ob der Stimme des Bräutigams. Diese Freude ist mir in vollem Maße zuteil geworden.
२९ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
30 Er muß wachsen und ich abnehmen.
३०त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
31 Wer von oben kommt, steht über allen; wer von der Erde ist, ist irdisch und redet irdisch. Wer vom Himmel kommt, steht über allen.
३१जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.
32 Und er bezeugt, was er gesehen und gehört hat; jedoch sein Zeugnis nimmt ja niemand an.
३२जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
33 Wer aber sein Zeugnis annimmt, der bestätigt, daß Gott wahrhaftig ist.
३३ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे.
34 Denn der von Gott Gesandte redet Gottes Worte; er spendet den Geist nicht kärglich.
३४कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
35 Der Vater liebt den Sohn und hat alles in seine Hand gegeben.
३५पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.
36 Wer an den Sohn glaubt, hat ewiges Leben, wer aber auf den Sohn nicht hört, wird das Leben nicht schauen; es lastet vielmehr Gottes Zorn auf ihm." (aiōnios g166)
३६जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (aiōnios g166)

< Johannes 3 >